मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE) साम्य आणि फरक काय?

मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE) हे भारतातील दोन प्रमुख शेअर बाजार असून जवळजवळ सर्वच शेअर, रोखे किंवा कर्जरोखे यांचे व्यवहार या दोनपैकी कोणत्यातरी एका बाजारात होतात. हे दोन्ही बाजार मुंबईतच आहेत. यातील मुंबई शेअरबाजार हा आशियातील सर्वात जुना शेअरबाजार आहे, त्याची स्थापना 1875 साली झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराची स्थापना 1992 साली झाली. सध्या दोन्ही शेअरबाजारात 100% व्यवहार संगणकामार्फत होतात. या दोन्ही बाजारातील साम्य आणि फरक खालीलप्रमाणे.

मुंबई शेअर बाजारातील विविध क्षेत्रातील 30 प्रमुख कंपन्यांच्या व्यवहारास उपलब्ध समभागांच्या उलाढाल आणि बाजारमूल्य यावर आधारित निर्देशांक असून त्यास सेन्सेक्स असे म्हणतात तर अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअरबाजारातील 50 कंपन्या असलेल्या निर्देशांकास निफ्टी असे म्हणतात.

मुंबई शेअरबाजार हा जगातील सर्वात मोठा असा 10 वा शेअरबाजार असून राष्ट्रीय शेअरबाजार 11 व्या स्थानी आहे.

मुंबई शेअरबाजाराचे 30 नोव्हेंबर 2018 रोजीचे बाजारमूल्य 205600 अमेरिकन डॉलर होते तर राष्ट्रीय शेअरबाजाराचे त्याच दिवशीचे बाजारमूल्य 203000 कोटी अमेरिकन डॉलर एवढे होते. मुंबई शेअर बाजाराची मासिक उलाढाल 21000 अमेरिकन डॉलर असून राष्ट्रीय शेअरबाजाराची मासिक उलाढाल 19600 अमेरिकेन डॉलर आहे.

मुंबई शेअरबाजारात 5000 हून अधिक कंपन्यांची नोंदणी झाली असून राष्ट्रीय शेअरबाजारात 1900 अधिक कंपन्यांची नोंदणी झालेली आहे.याशिवाय विविध कंपन्यांच्या कर्जरोख्यांची नोदणी करण्यात आली आहे.

मुंबई शेअर बाजाराची स्थापना ब्रोकर्स असोसिएशन म्हणून झाली. सन 1956 च्या सिक्युरिटीज काँट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट द्वारे त्यास सन 1957 मध्ये कायदेशीर मान्यता देण्यात आली. येथील सौदे कागदी प्रमाणपत्रांच्या साहाय्याने होत होते. सन 1995 पासून सर्व सौदे संगणकाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होवू लागले. या असोसिएशनचे टप्याटप्याने सार्वजनिक कंपनीत रूपांतर होऊन आतातर BSE चे शेअर खरेदी विक्रीस उपलब्ध आहेत. अनेक उपकंपन्या स्थापून धोका व्यवस्थापन, मार्केट डेटा सर्व्हिस, डिपॉझिटरी सर्व्हिसेस या क्षेत्रांत त्यांनी व्यवसायास सुरुवात केली आहे.

राष्ट्रीय शेअरबाजाराची स्थापनाच सर्व व्यवहार कागद विरहित संगणकामार्फत आणि पारदर्शक व्हावेत या हेतूनेच सन 1992 साली झाली आणि सन 1994 पासून त्यामुळे गुंतवणूकदारांना कोठूनही असे व्यवहार करण्याची संधी प्रत्यक्षात प्राप्त झाली. याचे समभाग सर्वसाधारण गुंतवणूकदारांना लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मुंबई शेअरबाजारात नोंदणीकृत शेअर्सची संख्या जास्त त्यामानाने उलाढाल कमी तर राष्ट्रीय शेअरबाजारात नोंदणीकृत शेअर्सची संख्या कमी पण उलाढाल जास्त त्यामुळे तेथे अधिक चांगला खरेदी किंवा विक्री भाव मिळण्याची शक्यता असते. दोन्हीकडे नोंदवण्यात आलेल्या शेअर्सबाबत ही शक्यता आहे. कंपनी कायद्याप्रमाणे ज्यांचे व्यवहार देशभरातून कोठूनही करता येतील अशा एका बाजारात नोंदवणे गरजेचे आहे. त्यामुळे यातील एकाच बाजारात नोंदवलेल्या शेअर्सची खरेदी विक्री त्याच बाजारात करता येते. सर्व व्यवहार T+2 या पद्धतीने म्हणजे व्यवहार झाल्यापासून त्याचे पैसे अथवा शेअर मिळण्यास 2 कामाचे दिवस लागतील या पद्धतीने होतात आणि शेअरबाजाराची त्यास हमी असून सेबी या भांडवलबाजार नियंत्रकाचे त्यावर लक्ष असते.

सध्या डे ट्रेडिंग करताना ज्या बाजारातून शेअर खरेदी केले तेथेच ते विकावे लागतात किंवा विक्री केल्यास तेथूनच खरेदी करून द्यावे लागतात. तसे तांत्रिकदृष्ट्या कोणत्याही बाजारातील शेअर्स या शेअर्सची नोंदणी असलेल्या कोणत्याही बाजारात खरेदी करता येणे अथवा विकता येणे शक्य असून सध्या उपलब्ध नसलेली ही सेवा दोन्ही बाजारात लवकरच उपलब्ध होऊ शकते.

हे दोन्ही शेअरबाजार हे भारतीय भांडवल बाजाराचे प्रतिनिधित्व करतात येथे समभाग, कर्जरोखे, रोखे यांची नोदणी होऊन त्यांचे यातील समभाग, निर्देशांकाचे रोखीचे आणि भविष्यातील व्यवहार केले जातात. येथे रोज प्रचंड मोठया प्रमाणावर उलाढाल होत असल्याने मोठया स्वरूपात कररूपाने सरकारला महसूल मिळत असतो. त्यामुळेच या बाजारावरील लोकांचा विश्वास वाढावा असा प्रयत्न सरकारकडून केले जातात. हे बाजार सुस्थितीत असणे हे भारत प्रगतीपथावर असल्याचे लक्षण समजले जाते. भारतात सर्व मिळून असे 21 शेअरबाजार असले तरी या दोन बाजारातच सर्वाधिक सौदे होतात. या दोन्ही बाजारांना कमोडिटी व्यवहार करण्याची परवानगी मिळाली असून पूर्ण भारतभर त्यांचे दलाल, उपदलाल यांचे जाळे पसरलेले असून तेथून रोखीचे, वायद्यांचे आणि भविष्यातील व्यवहार कोणीही कोठूनही करू शकतो.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय