पोटचं मूल नसल्याचं दुःख दूर करून झाडांचीच आई झालेली सालूमरडा थिमाक्का

फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दिवशी एका फोटोने पूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. जगातील सोशल मिडिया मग तो फेसबुक असो वा ट्विटर किंवा ‘व्हाट्स अप’ सगळ्यावर एक फोटो खूप व्हायरल झाला.

तो फोटो होता ‘झाडांची आई’ सालूमरडा थिमाक्का ह्यांनी आपला पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांना डोक्यावर हात ठेवून दिलेला आशीर्वाद.

भारतीय संस्कृतीत आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, कर्तृत्वाने श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्ती पुढे आपलं डोकं झुकवून त्यांना प्रणाम करताना त्यांचे आशीर्वाद मिळणं हे सगळ्यात मोठं भाग्य समजलं जाते. हा सन्मान कोणालाही कोणाकडून मिळणं हा दोघांच्याही कर्तृत्वाचा सन्मान समजला जातो.

मला वाटतं की ह्या वर्षीच्या पद्मश्री वितरण सोहळ्यात हा योग अनुभवायला मिळणं हा नुसत्या त्या दोन व्यक्तींचा नाही तर पूर्ण भारतीय संस्कृतीचा जागतिक पटलावर झालेला सन्मान आहे.

देशाचे प्रथम नागरिक आणि देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीला एक सामान्य पण असामान्य कर्तृत्व असणाऱ्या स्त्रीने दिलेला आशीर्वाद हा कुठेतरी भारतीय संस्कृतीला वरच्या पातळीवर नेणारा क्षण होता.

‘झाडांची आई’ सालूमरडा थिमाक्का ह्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन खरे तर पद्मश्री पुरस्काराचा मान वाढवला आहे. सालूमरडा थिमाक्का भारताच्या कर्नाटक राज्यातील एक सामान्य स्त्री!

एक सामान्य गरीब आयुष्य जगताना वयाच्या ४० वर्षापर्यंत मातृत्वाच्या सुखापासून वंचित राहिल्याने त्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. आई बनण्याचा क्षण आपण अनुभवू शकत नाही हे शल्य कुठेतरी त्यांना आत्महत्येचा विचार करायला प्रवृत्त करत होतं.

पण थिमाक्का च्या जोडीदाराने त्यांना आजूबाजूच्या निसर्गाची आई बनण्याचा सल्ला दिला. मग सुरु झाला एक असा प्रवास ज्याने सालूमरडा थिमाक्काचं आयुष्य तर पूर्ण बदललंच पण त्यासोबत निसर्गाला जोपासण्याची एक चळवळ सुरु झाली.

आपल्या त्या कटू अनुभवानंतर सालूमरडा थिमाक्का ह्या झाडांची आई बनल्या. नवीन झाडं लावणं, त्यांना जोपासणं, त्यांना पाणी देणं ही सगळी कामं त्यांनी एका आईचं कर्तव्य मानत सुरु केली.

जिकडे स्त्रीला एक, दोन किंवा फार फार तर तीन मुलाचं मातृत्व मिळते तिकडे थिमाक्का तब्बल ८००० पेक्षा जास्त झाडांची आई बनली. आई बनण्याचा तिचा हा प्रवास न तिचं शिक्षण रोखू शकलं न तिचं वय!

चाळिशीत सुरु झालेला हा प्रवास आजही अखंड सुरु आहे. ‘हुलुकल’ आणि ‘कुडूर’ ह्या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या ४ किलोमीटरच्या पट्ट्यात तिने जवळपास ३६५ वडाची झाडं लावली आहेत. अतिशय गरीब परिस्थिती आणि जवळ पैसे नसताना तिने जी संपत्ती उभी केली आहे त्याचा आपण विचारही करू शकत नाही.

एका सर्वेक्षणाच्या मते सालूमरडा थिमाक्का ने लावलेल्या झाडांची आजमितीला किंमत तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांच्या घरात जाते.

गेली ७५ वर्ष अव्याहतपणे, निस्वार्थीपणे आपल्या डोळ्यासमोर एकच लक्ष ठेवून त्याचा ध्यास घेतलेली सालूमरडा थिमाक्का आज १०६ व्या वर्षात ही तितकीच कणखर आहे.

तिच्या ह्या कार्याची दखल पूर्ण जगभर घेतली गेली आहे. सालूमरडा थिमाक्का ला आजवर ५० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले असून त्यात भारत सरकारचा पद्मश्री हा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.

त्यांनी ‘थिमाक्का फौंडेशन’ ची ही स्थापना केली आहे. ह्या संस्थेमार्फत झाडांची लागवड, त्यांची जपणूक आणि एकूणच निसर्गाला पुन्हा एकदा त्याचं वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी पारंपारिक साडी नेसून आपल्या पायावर चालत जेव्हा ‘सालूमरडा थिमाक्का’ ने हातात पद्म पुरस्कार स्वीकारला तेव्हा गेल्या ७५ वर्षाच्या कामाचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आपला हात राष्ट्रपतीच्या डोक्यावर ठेवून सालूमरडा थिमाक्का ने म्हटलं,

“ए देशाक्के देवारू वल्लेयाडू मडाली” ह्याचा अर्थ होतो “ह्या देशावर देवाची कृपा असू दे.”

देशाचा प्रथम नागरिक ह्या नात्याने तिच्या आशिर्वादाने कृतकृत्य झालेल्या भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना वाटलेल्या त्या क्षणाच्या भावना व्यक्त केल्या तेव्हा ते शब्द खूप काही सांगून गेले. राष्ट्रपती म्हणाले,

At the Padma awards ceremony, it is the President’s privilege to honor India’s best and most deserving. But today I was deeply touched when Saalumarada Thimmakka, an environmentalist from Karnataka, and at 107 the oldest Padma awardee this year, though it fit to bless me, Saalumarada Thimmakka represents the resilience and determination and perseverance of the ordinary Indian citizen, especially of women in our country. May her example, and that of every Padma awardee, inspire our India to greater heights.

राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्विकारल्यावर सालूमरडा थिमाक्काने राष्ट्रपती भवनातही एक झाडं लावून आपल्या कार्याचं एक पान देशाच्या इतिहासात सोनेरी क्षणांनी कोरलं. अशा ह्या मातेस माझे कोटी कोटी प्रणाम!!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय