वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे का? मग हे करा

आजची शहरातील जीवनशैली ही वेगवान व दगदगीची झाली आहे. नोकरवर्ग कायम कामाच्या तणावाखाली वावरत असतो. पूर्वीची पिढी एकाच नोकरीमध्ये ३०–३५ वर्षे काढून निवृत्त होत असे आणि मग निवृत्तीपश्चात आपले साधे आयुष्य जगत असत.

मात्र आताच्या नवीन पिढीला आपल्या नोकरी व्यवसायात वेगवान प्रगती करायची असते. अशावेळी ते दर २–३ वर्षांनी नवीन नोकरी पकडून आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करतात.

आजच्या नवीन पिढीचे स्वप्न असते की आयुष्यभर नोकरी न करता शक्यतो पन्नाशी अगोदर निवृत्ती स्वीकारायची आणि त्यानंर आपले छंद, स्वप्ने जोपासायची, वर्ल्ड टूरला जायचे वगैरे.

आजच्या तरुण पिढीने जास्त पगाराच्या नोकऱ्या बदलत असताना त्याच्या जोडीला व्यवस्थित आर्थिक नियोजन केले तर नक्कीच ते पन्नाशीला वेळेच्या अगोदर निवृत्ती स्वीकारून आपल्या आयुष्याचा जास्त आनंद घेऊ शकतात.

तुम्ही जर २५–३० च्या वयोगटात असाल तर तुमचे आर्थिक नियोजन कसे कराल? याचा सविस्तर आढावा आपण या लेखात घेऊ.

हा वयोगट असा असतो की आपल्याकडून वायफळ खर्च जास्त होत असतात. कारण बऱ्याच वेळा घरी आपले पालक कमावते असतात आणि आपल्यावर काही जबादारीही नसते.

(काही तरुणांच्या बाबतीत अगदी कॉलेज काळापासूनच घराची जबाबदारी असते) अशा वेळी सर्वप्रथम आपल्या वायफळ खर्चांना आळा घातला पाहिजे.

आपला पहिला पगार आल्यापासून आपण काटेकोर पणे बचतीला सुरुवात केली पाहिजे. जो पर्यंत आपण अविवाहित आहोत तोपर्यंत आपल्या उत्पनाच्या कमीतकमी ३०% आपण बचत केली पाहिजे, लग्न झाल्यावर २०% आणि कुटुंब वाढल्यावर कमीतकमी १०% बचत करायला हवी.

आपण केलेली बचत जर आपण योग्य गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये वळती केली व शिस्तबद्ध पद्धतीने त्यात वाढ केली तर आपण निश्चितच आपले पन्नाशीतील निवृत्तीचे स्वप्न साकार करू.

आपल्या आर्थिक नियोजनाची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आपला टर्म इन्शुरन्स किंवा मुदतीचा विमा. आपण आपल्या तरुण वयात जर मुदतीचा विमा उतरविला तर आपल्याला तो खूप कमी किमतीत मिळतो.

उदाहरणार्थ १ करोडचा विमा जिथे विम्याचा हप्ता वयाच्या ६० वर्ष पर्यंत भरायचा आहे आणि विमाछत्र वयाच्या ८० वर्षापर्यंत आहे, वयाच्या २५ व्या वर्षी वार्षिक प्रीमियम साधारण रु १२०००/- असेल तो वयाच्या ४० व्या वर्षी रु ३५०००/- झालेला असेल.

बऱ्याच लोकांची मानसिकता अशी असते की टर्म इन्शुरन्समध्ये विमा कंपनी कडून काहीच परतावा मिळणार नाही तर टर्म इन्शुरन्स का घ्यावा? असाच विचार आपण आपल्या गाडीचा विमा घेताना करतो का?

गाडीचा अपघात झाला नाही आणि माझा विम्याचा हप्ता फुकट गेला; असा विचार आपण कधीही करत नाही.

आपले आयुष्य हे अनमोल आहे त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी जास्तीत जास्त रकमेचा मुदतीचा विमा आपण घेतला पाहिजे.

विम्याच्या हप्त्यापोटी पुढील ३५ वर्षात म्हणजेच वयाच्या ६० पर्यंत तुम्ही साधारण रु. ४,२५,००० विमा कंपनीला भरणार जे तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीत, पण जर तुम्ही फक्त रु ५०० ची म्युच्युअल फंडची एसआयपी (SIP) चालू केलीत तर ३५ वर्षात तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये भरणार रु १,५०,००० व म्युच्युअल फंडने अगदी १२% परतावा जरी दिला तरी तुमची गुंतवणूक वाढून साधारण रु. ११,५०,००० होईल. हे सर्व करीत असताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी रु १ करोडचे विमाछत्र राहील.

म्हणजेच तुम्ही अविवाहित असताना सुध्दा आणि नंतर तुमचे कुटुंब झाल्यावर तुम्ही कोणत्याही आर्थिक तणावाखाली राहणार नाही.

आर्थिक नियोजनाची दुसरी पायरी म्हणजे योग्य आरोग्य विमा असणे अतिशय महत्वाचे आहे.

तरुण वयात, “मी एकदम तंदुरुस्त आहे आणि मला १०–१५ वर्ष कोणताच आजार होणार नाही”, असा विचार करून चालणार नाही. कोणतेही आजारपण हे सांगून येत नसते.

आणि जेव्हा आजारपण येते तेव्हा आपल्या बचतीमधला मोठा हिस्सा आजारपणात खर्च होतो आणि आपल्या आर्थिक नियोजनात आपण ४–५ वर्षे किंवा कधी त्याहून जास्त मागे जातो.

काहीवेळा आपण जिथे नोकरी करत असतो तिथे आपल्याला कार्यालयाकडून आरोग्यविमा असतो पण तरीही आपण आपला वैयक्तिक किंवा कुटुंबाचा आरोग्य विमा घेतला पाहिजे.

जेंव्हा आपण तरुणपणी तंदुरुस्त असतो व आपला आरोग्यविमा वापरला जात नाही तेव्हा ‘NO CLAIM BONUS’ च्या स्वरूपात आपले आरोग्य विमाछत्र वाढत जाते.

मात्र त्यापटीने विम्याच्या हप्त्यांमध्ये वाढ होत नाही. योग्य आरोग्य विमा घेऊन आपण आपल्या बचतीचे संरक्षण करू शकतो.

मुदतीचा विमा आणि आरोग्य विमा घेतल्यानंतर आपली जी बचत आहे ती योग्य गुंतवणूक पर्यायांमध्ये वळती केली पाहिजे. आपली गुंतवणूक जोमाने वाढावी तसेच गुंतवणुकीतील वाढ महागाईवर मात करणारी असावी यासाठी म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करावी.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपण शिस्तबद्ध एसआयपी केली तर जोखीम कमी होते व दीर्घावधीमध्ये आपल्याला चक्रवाढ वाढीचा चांगला फायदा होतो.

समजा म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ ने पुढील २०-२५ वर्षात १४% परतावा दिला तर ‘एसआयपी’ मधून किती वेल्थ क्रिएशन होईल ते पाहू.

वयाच्या २५ व्या वर्षी जर तुम्ही रु १५,०००/- ची एसआयपी चालू केलीत व त्यात दरवर्षी ‘एसआयपी’ मध्ये १०% वाढ केली तर वयाच्या ५० व्या वर्षी तुमची संपत्ती रु ८.५१ करोड इतकी होईल, मात्र दरवर्षी १२% ‘एसआयपी’ ची रक्कम वाढविली तर रु १०.२३ करोड इतकी होईल.

वयाच्या २५ व्या वर्षी जर तुम्ही रु १०,०००/- ची एसआयपी चालू केलीत व त्यात दरवर्षी ‘एसआयपी’ मध्ये १०% वाढ केली तर वयाच्या ५० व्या वर्षी तुमची संपत्ती रु ५.६७ करोड इतकी होईल, मात्र दरवर्षी १२% ‘एसआयपी’ ची रक्कम वाढविली तर रु ६.८२ करोड इतकी होईल.

वयाच्या ३० व्या वर्षी जर तुम्ही रु १५,००० ची ‘एसआयपी’ चालू केलीत व त्यात दरवर्षी ‘एसआयपी’ मध्ये १०% वाढ केली तर वयाच्या ५० व्या वर्षी तुमची संपत्ती रु ३.७२ करोड इतकी होईल, मात्र दरवर्षी १२% ‘एसआयपी’ ची रक्कम वाढविली तर रु ४.३२ करोड इतकी होईल.

वयाच्या ३० व्या वर्षी जर तुम्ही रु १०,००० ची एसआयपी चालू केलीत व त्यात दरवर्षी एसआयपी मध्ये १०% वाढ केली तर वयाच्या ५० व्या वर्षी तुमची संपत्ती रु २.४८ करोड इतकी होईल, मात्र दरवर्षी १२% ‘एसआयपी’ ची रक्कम वाढविली तर रु २.८८ करोड इतकी होईल.

वरील आकडेवारीतून असे दिसून येईल की जितक्या लवकर आपण एसआयपी चालू करू व जेवढी जास्त वर्ष आपण एसआयपी चालू ठेवू तेवढा चक्रवाढ वाढीचा जास्त फायदा होईल.

इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वरील आकडेवारी ही १४% चक्रवाढ वाढीने सलग २५ -३० वर्षे अंदाजित आकडेवारी आहे, मात्र येणाऱ्या ८-१० वर्षात आपला देश जगातील आर्थिक महासत्ता होईल तेव्हा दीर्घकाळामध्ये शेअर बाजारातील परतावा कमी कमी होत जाईल, त्यामुळे आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियमितपणे आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेत राहिला पाहिजे.

महागाई आणि आपल्या जीवनशैलीचा विचार करता ही रक्कम अपुरी ही पडू शकते. त्यासाठी म्युच्युअल फंडाच्या जोडीला शेअर बाजारातील “A” कॅटेगरी मधील ज्या कंपन्या आहेत त्यातील ८-१० कंपन्यांचे शेअर जसे जमतील तसे थोडे थोडे आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जमा करत जावे. या चांगल्या कंपन्यांच्या वाढीचा आपल्या ‘वेल्थ क्रिएशन’साठी चांगला फायदा होऊ शकेल.

तरुणांना शिस्तबद्ध आर्थिक नियोजनासाठी शुभेच्छा!!

सौजन्य: www.arthasakshar.com

Picture Credit: pixabay

लेखन: निलेश तावडे

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे का? मग हे करा”

  1. Hi,

    Thanks for providing such information,
    I am turning 30th in April.. please explain A category company and how can i by shares of those companies so that i can save some money to buy n invest in share market..

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय