आर्मी डॉग युनिटच्या श्वानांबद्दल आणि त्यांच्या सेनेतील सेवेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती

साठ वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष होतं आहे या मुक्या सैनिकांच्या शौर्याकडे.

हो दुर्लक्ष्य होतं आहे आर्मी डॉग युनिटच्या या मुक्या जनावरांकडे…..

कितीतरी सैनिकांचे जीव वाचवले आहेत या मुक्या प्राण्यांनी…. वास घेऊन माग काढण्याच्या त्यांच्या शक्तीने कितीतरी दहशतवाद्यांना पकडण्यात मोलाचा वाटा उचलतात हे आर्मी डॉग युनिटचे प्रशिक्षित कुत्रे पण या शहिदांच्या बाबतीत मात्र आपल्याला कुठेच ऐकायला किंवा वाचायला मिळत नाही.

या मुक्या सैनिकांच्या शाहिद झाल्याच्या बातम्या दाखवून मीडियाला टी. आर. पी. मिळणार नाही कि त्याचं राजकारण करून नेत्यांना मतं सुद्धा मिळणार नाहीत. आणि कुठल्या फायद्याशिवाय कशाला ठळक बातम्या होतील या मुक्या शहिदांच्या!!!

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आर्मी डॉग युनिटच्या काही शूर श्वानांच्या शौर्याच्या कहाण्या सांगणार आहोत.

१) रॉक

१९९० ला बर्फाळ पहाडात चार विदेशी दहशतवाद्यांना पकडण्यात रॉक नावाच्या लॅब्राडोरने सेनेची मदत केली होती. त्यानंतर काश्मीरमध्ये ४ ए.के. ४७ रायफल, २ रेडिओ सेट आणि विस्फोटकं शोधून काढली. या सारख्या कित्येक मोहिमा रॉकच्या मदतीने फत्ते झाल्या. रॉकचा सेनेच्या सेवेत राहण्याचा काळ पूर्ण झाला तेव्हा दुर्दैवाने रॉक मारला गेला. एका आर. टी. आय. च्या माहितीनुसार आर्मी युनिटच्या डॉग्सना रिटायरमेंटनंतर अनफिट असल्यास मृत्यू दिला जातो. सरळ शब्दात सांगायचे तर मारले जाते. (संदर्भ: Times of India – Retirement means death for army’s canine comrades)

२) रॅक्स

मिरतच्या RVC Center आर्मी स्कुल मध्ये १९९३ ला रॅक्स नावाच्या गोल्डन लॅब्रॉडॉरचा जन्म झाला. याला १४ व्य्या आर्मी डॉग युनिट मध्ये सामील केले. हे डॉग युनिट आर्मीच्या डेल्टा फोर्स युनिटच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. दहशतवाद्यांना ट्रॅक करून पकडण्यात सैनिकांना मदत करण्याचं काम रॅक्सकडे होतं. १९९५ मध्ये एका दहशतवाद्याला त्याच्या शस्त्रास्त्रांचा माग घेऊन रॅक्सने पकडवून दिले. १९९८ साली पहाडी भागात झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांना पकडण्याच्या मोहिमेत रॅक्सने महत्त्वाची कामगिरी बजावली. अश्याच एका आर्मी ऑपरेशन च्या वेळी गंभीर दुखापत झाल्यांनतर रॅक्सला आर्मीच्या वॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. पण २२ सप्टेंबर १९९९ ला रॅक्स हे जग सोडून गेला. आणि आर्मीचा एक वीर शाहिद झाला.

३) रॉकेट

९ जून १९९८ ला काश्मीरच्या बनिहाल जवळ भारतीय सैनिकांची दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली होती. या अभियानात रॉकेटने महत्वपूर्ण कामगिरी बजावली. दहशतवाद्यांच्या एका स्कार्फच्या वासाने रॉकेटने त्यांचे मशिनगन, तीन ए. के. ४७, दोन ए. के. ५६ आणि इतर काही हत्यारं शोधून काढली. हा खरं तर एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट होता. आणि तो रॉकेटने उधळून लावला होता.

udali

४) रुदाली

रुदाली खोडकर आणि खेळकर लॅब्रॉडॉर होती. कुठल्याही श्वानप्रेमींना श्वानांचा हा गुण भुरळ घालतो. रुदालीला विस्फोटकांच्या शोधासाठी विशेष ट्रेनिंग दिले गेले होते. १६ सप्टेंबर १९९८ ला रुदालीने सुनार कोर्ट भागात मोठ्या प्रमाणात विस्फोटकांचा माग घेतला. या मोहिमेने रहिवाशी भागातला मोठा दहशतवादि हल्ला टाळता आला आणि कत्येक निरपराधांचा जीव वाचला. त्यानंतर ज्या ठिकाणी राजकारणी आणि व्ही. आय. पी. लोकांचे दौरे असायचे त्या ठिकाणी रुदालीला तैनातील ठेवण्यात आले.

mansi

५) मानसी

मानसी लॅब्रॉडॉर आर्मी डॉग होती. ती चार वर्षांची असल्यापासूनच सेनेच्या सेवेत होती. ऑगस्ट २०१५ ला कुपवाडाच्या तंगधार भागात मानसी सुरक्षेसाठी तैनात होती. या वेळी तिने आपल्या वास घेण्याच्या शक्तीने दहशतवाद्यांच्या हालचाली टिपल्या आणि आपल्या हॅग्लर मशीर अहमदला तिकडे ओढायला सुरुवात केली. दहशतवाद्यांचा शोध घेतला. पण त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मानसी आणि बशीर दोघांना गोळ्या लागल्या आणि दोघेंहो जागीच मृत्युमुखी पडले. पण शाहिद होण्याआधी मानसीने जे काम केले त्यामुळे दहशतवाद्यांचा एक तळ उजेडात आला.

Alex

६) ऍलेक्स

१९६५ साली मीरत आर्मी बेसचा आर्मी डॉग ऍलेक्स विदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. पाहुणे होते भूतानचे राजा जिग्मे दोरजी वांगचुक. या वेळी ऍलेक्सच्या चालकीने मोठा हल्ला टाळला होता. ऍलेक्सने हत्याऱ्याच्या वासाचा मग घेत घेत एका मंदिरात लपलेल्या हत्याऱ्याला शोधून काढले. या नंन्तर भूतानच्या राजाने ऍलेक्सला भेट म्हणून एक सोन्याची अंगठी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांचे ऋण जसे आपल्यावर आहे तसेच या मुक्या सैनिकांचे सुद्धा आहे. आर्मी डॉग युनिटच्या या श्वानांना त्यांच्या शौर्यासाठी सलाम!!!

मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय