कोकणातील कातळशिल्पांमधून कोणता इतिहास उलगडतो?

“येवा कोकण आपलचं असा” असं म्हणत पर्यटकांना आकर्षित करणारं कोकण सध्या त्याच्या प्रसिद्ध अश्या रत्नागिरी (देवगड) हापूससाठी ह्या उन्हाळ्यात चर्चेत नसून जगाच्या पातळीवर कोकणच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे.

रत्नागिरीत आज-उद्या कातळशिल्प महोत्सव होतोय. या कातळशिल्पांमधून कोणता इतिहास उलगडणार?

कोकण प्रांताला मिळालेल्या सह्याद्रीच्या वरदहस्तावर इतिहासात लुप्त झालेल्या भारतीय संस्कृतीचे जवळपास १०,००० ते ४०,००० वर्ष जुने दाखले सापडले आहेत. हे दाखले सह्याद्रीच्या पठारांवर चित्राच्या रुपात कोरलेले असून जवळपास १२०० पेक्षा जास्त दगडीचित्र किंवा ज्याला पेट्रोग्लिफ असं म्हणतात ते मिळाले आहेत. सुधीर रिसबुड आणि धनंजय मराठे ह्या दोन मराठमोळ्या व्यक्तींनी हा खजिना शोधला असून जागतिक पातळीवर त्यांच्या ह्या शोधाची दखल घेतली गेली आहे.

कोकणात सापडले हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे दाखले

ह्या दगडी चित्रांमध्ये प्रामुख्याने प्राणी जीवन, शिकार, देवांची चित्रे आहेत. प्राण्यांमध्ये हरीण, मासे, कासव, वाघ, हत्ती ह्यांचा समावेश आहे. ह्या चित्रांसोबत काही नक्षीकाम ही मिळालं आहे. जगभरात माणसाच्या पूर्व संस्कृतीचे दाखले देणारी अनेक भित्तिचित्रं किंवा दगडावर कोरलेली चित्रं आढळून येतात.

कोकणात मिळालेली दगडी चित्रं मात्र ह्याला अपवाद आहेत कारण सामान्यतः अशी चित्रे उभ्या भिंतीवर, दगडावर आढळून येतात पण कोकणातली चित्रे मात्र सपाट दगडावर कोरण्यात आली आहेत. ह्यामुळे ती खूप दुर्मिळ आहेत. काही दगडी चित्रे तर प्राण्यांच्या मूळ आकाराएवढी मोठी काढण्यात आलेली आहेत. तसेच त्यात त्यांचा आकार ते त्याचं लिंग हे आज जवळपास १०,००० हजार पेक्षा जास्त वर्षांनी आपण बघू आणि ओळखू शकतो. इतके वर्ष निसर्गाच्या सगळ्या प्रवासाला पुरून उरत आजही ही दगडी चित्रं स्पष्टपणे त्या काळच्या संस्कृतीचे दाखले आपल्या पर्यंत पोहचवत आहेत.

konkan-katalshilpa

हि दगडी चित्रे काहीतरी उद्देश्य ठेवून काढली आहेत. ह्यावरून नक्कीच स्पष्ट होते की कोकणात तब्बल १०,००० ते ४०,००० वर्षापूर्वी एक संस्कृती नांदत होती. ज्या कोकणाचा आपण केलिफोर्निया करायला निघालो आहोत त्या कोकणाने केलिफोर्नियाचा शोध लागायच्या आधीपासून माणसाला आपल्याकडे आकर्षून घेतलं होतं. माझ्या मते इजिप्त मधील पिरॅमिडला जेवढं महत्व त्यांच्या संस्कृतीत आहे तितकीच महत्वाची ही दगडीचित्रं आपल्या संस्कृतीसाठी असायला हवीत.

काळाच्या ओघात आलेल्या सात बारा आणि मालकी हक्कामुळे ज्या जागेवर ही दगडी चित्रं आहेत त्या जागा लोकांच्या मालकीच्या आहेत. इतकंच काय ह्याचा शोध लागल्यावर त्याची दखल घेण्याची पात्रता ही आपल्याकडे नाही.

आजही ह्या चित्रांबद्दल अपुरी माहिती उपलब्ध आहे. रत्नागिरी टुरिझम च्या साईटवर ह्याची चित्रं उपलब्ध असली तरी त्या ठिकाणी कसे जायचे ह्याची जास्त माहिती उपलब्ध नाही. ह्यासाठी आजही तिथल्या स्थानिक लोकांचा आधार घ्यावा लागतो ही आपली शोकांतिका आहे.

कोकणात सापडले हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे दाखले

रत्नागिरीच्या ‘देवचे गोठणे’ या गावी हे एक दगडी चित्र असून त्या चित्रावर कोणतंही होकायंत्र काम करत नाही. होकायंत्राने काम न करणं किंवा चुकीची दिशा दर्शवणं याला कारणीभूत हे त्या ठिकाणचं चुंबकीय क्षेत्रं असतं. पण त्याकाळी अश्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र आहे अथवा त्याचा प्रभाव ह्या ठिकाणी पडतो ह्याची जाणीव कशी झाली असेल? जर विचार केला तर चुंबकीय क्षेत्रं त्याचा होणारा प्रभाव वगैरे गोष्टी त्याकाळी ज्ञात असाव्यात कारण ते माहित असल्याशिवाय त्याच ठिकाणी अशी चित्रे का बरं कोरली जाणार!! अर्थात ह्या जर तर चा शोध अजून सुरु आहे.

कोकणातल्या ह्या दगडी चित्रांवर अजून संशोधन होणं गरजेचं आहे. पण ९९%-१००% च्या शर्यतीत जुंपलेली पिढी ह्याचा अभ्यास करू शकेल का? ह्या बद्दल मन मात्र सांशक आहे. जगाचा इतिहास शिकून तो बदलवायला निघालेली पिढी आपल्याच इतिहासाबद्दल किती उदासीन आहे ते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. जगातील इतिहास दाखवणाऱ्या जागांबद्दल सजग असलेला भारतीय मात्र स्वतःच्या संस्कृतीने उभारलेल्या आणि मागे सोडलेल्या खुणांच्या बाबतीत तितकाच निष्क्रिय आहे.

कोकणात सापडले हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे दाखले

आयफेल टॉवर च्या समोर असो वा पिसा च्या कललेल्या मनोऱ्या समोर उभा राहून सेल्फी घेणारा भारतीय मात्र वेरुळच्या कैलास लेण्या समोर किंवा कंबोडिया इथल्या अंगकोर वाट च्या समोर सेल्फी घेण्यात तितकाच उदासीन असतो हे टोचणारं पण सत्य आहे. त्यामुळे कोकणातल्या ह्या ठेव्याची दखल बी.बी.सी. ते न्यूयॉर्क टाईम्स ने घेतल्यावर पण भारतातल्या सजग मिडीयाला ह्यावर काही लिहावसं वाटलं नाही ह्यातच सगळ आलं.

दोन मराठी माणसांनी आपल्या भूमीवर एकेकाळी नांदणाऱ्या संस्कृतीच्या खुणा शोधण्यात मोलाची भूमिका बजावली आहे ही खूप समाधान देणारी गोष्ट आहे. आज ह्या ठेव्याला सरकार ते स्थानिक अश्या सगळ्याच पातळीवर जपून तो समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची गरज आहे. ह्या शोधाच्या मागे महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सगळ्यांना माझा सलाम. आपलं कोकण हे इतिहास जागवणारा एक महत्वाचा दुवा आहे हे पुन्हा एकदा ह्या निमित्ताने ठळकपणे अधोरेखित झालं आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय