सुखी जीवनाचे आनंदी मार्ग

मनोव्यापार हा बिगर भांडवली व्यापार आहे. कोणत्याही इतर व्यापारापेक्षा महत्वाचा. समजा आपण एखाद्या व्यापारात करोडो रुपये संपत्ती कमावली पण तरीही मनोव्यापारामुळे सारं संप्पन्न जीवन शून्य होऊ शकतं.

पैसा असून मनःशांती नाही. पैसा असून शरीर विविध रोगाचे माहेरघर. पैसा असेल किंवा नसेल तरी चालेल पण मन मात्र सुदृढ असले पाहिजे कारण ‘मन हेच धन’ आहे. जीवनातील सर्वच दशा आणि दिशा मनावर अवलंबून असतात. जे मनी ते ध्यानी किंवा मनात ते जनात. ध्यानी ते स्वप्नी. असं असतांना ही आपण मनाची मशागत करत नाही.

मनाचे स्वप्नशी असलेले नाते साक्षात्कारात परावर्तित होऊन प्रतिबिंबित होतात. साक्षात्कार हेच व्यक्ती जीवनात खरं धन असतं सुख दुखाचे मुळ कारण मनच आहे. जसा सुदृढ राहण्यासाठी आपण व्यायाम करतो तसाच मन सुदृढ राहण्यासाठी मनाचा व्यायाम नियमित केला गेला पाहिजे. त्यासाठी प्राणायाम, योग आणि व्यायाम अशा तीन पायर्‍या आहेत.

प्राणायाम :- प्राण म्हणजे त्राण जीव जगण्याची शक्ती व व्यायाम म्हणजे जगण्यास वश करणारी किंवा नियंत्रित ठेवत दिर्घ आयुषमान वाढवण्याची शक्ती. आपल्या शरीरास ऑक्सिजनची नित्तान्तं आवश्यकता आहे. आपल्या शरीरातील सुक्ष्म व अतिसूक्ष्म मसल्स, पेशी व ईतर सर्व घटकांना ऑक्सिजन म्हणजे प्राण वायूचीची आवश्यकता असते.

श्वसनातून प्राणावर नियंत्रण मिळवणे म्हणजे प्राणायाम होय. या प्रक्रिया नासिकारंध्राव्दारे श्वास घेण्यावर विसंबून असतात. जर प्राणाची पातळी उत्तम असेल. त्या प्रवाहात लयता व सलगता, संथ आणि सहजता असेल तर त्याचे मन शांत, सकारात्मक, उत्साही व आनंदी राहते. त्या विषयी जागृतता व सजगता नसणे यामुळे शरीरातील नाडी व चक्रे यांच्यात अडथळा येतो. श्वसन अपूर्ण राहते. या सर्व बाबींमुळे तणाव, थकवा, असुरक्षितता, भिती या सारख्या गोष्टींचा प्रत्येय येऊ लागतो.

प्राचीन भारतीय आयुर्वेदात श्वसन प्रक्रिया व तिचे महत्त्व ते जाणून होते. कपालभाती, नाडीशोधन व भस्त्रिका हे प्राणायाम आहेत. यांच्या सतत व नियमित सरावाने नाडी, चक्रे व व्याधी यामधील अडथळे दूर होतात. यामुळे उत्साह, सकारात्मकता वाढीस लागते. मन शांत संयमी होऊन मन आत्म्यापर्यंत जावून पोहचते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले व केलेले प्राणायाम सुख समृद्धीची प्रचिती देते. मन व शरीर हलके भासू लागते.

योगासने: – सुक्ष्म हालचालींवर नियंत्रण ठेवत शरीराला लवचिक, हलके व आतून सशक्त व मनाला शांत बनवण्यासाठी शरीराची कृती म्हणजे योगासने.

अष्टांग योगामध्ये योगाचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. काही योगाचे प्रकार मोक्ष, आनंद व आरोग्य मिळवण्यासाठी व शरीर अरोग्य करण्यासाठी केला जातो. योगाचे मुख्य सहा प्रकार आहेत.

  • राजयोग:- प्राणायाम, नियम, आसन, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी ह्या पतंजली योगाच्या आठ अंगास अष्टांग म्हणतात.
  • लययोग :- यम, नियम, स्थूल क्रिया, सूक्ष्म क्रिया, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी असे लययोगाचे आठ अंग आहेत.
  • ज्ञानयोग :- अशुध्द आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे, हाच ज्ञानयोग किंवा यास ध्यानयोग असे ही म्हणतात.
  • कर्मयोग :- कर्म करणेच कर्मयोग व कर्मानेच आपल्यात कौशल्य आत्मसात करणे. हा त्यामागील खरा उद्देश व यास सहजयोगही म्हणतात.
  • हठयोग :- षट्कर्म, आसन, मुद्रा, प्रत्याहार, ध्यान व समाधी. हठयोगीचा जोर हा आसन किंवा कुंडलिनी जागृतीसाठी आसन, बंध, मुद्रा व प्राणायमावर असतो. यास क्रियायोग म्हटले जाते.
  • भक्तियोग :- भक्ति, स्मरण, कीर्तन, पादसेवन, अर्चन, दास्य, वंदन, आत्मनिवेदन व सौख्य असे नऊ गुण असणार्‍या व्यक्तीला भक्त म्हणतात. व्यक्ती त्याची आवड, प्रकृत्ती व साधना यांच्या योग्यतेनुसार त्याची निवड करू शकतो. भक्ती योगानुसार सौख्य, समन्वय, आपुलकीचे भावनात्मक गुण निर्माण होतात. भक्त भक्तीभावात तल्लीन होऊन समाजात आनंदाची पेरणी करत असतो.

याशिवाय ध्यानयोग, सहज योग, क्रिया योग, कुंडलिनी योग, साधना योग, मुद्रायोग, मंत्रयोग व तंत्रयोग आदी प्रकार आहेत. पण वरील सहा प्रकार मुख्य असून योगाचे अनेक प्रकार त्यात सामावलेले आहेत. ते सर्व प्रकार मनुष्याच्या मनशांती व आनंदमय जीवनाचे रहस्य बनून जातात.

व्यायाम :- जगण्यासाठी जेवढे ऑक्सिजनचे व पाण्याचे महत्त्व आहे. तेवढेच व्यायामाचे महत्व आहे. प्राणायाम केल्याने मनावर ताबा मिळतो. मनाची चलबिचल थांबून स्थिरता येते. योगासनाने शरीरातील सर्वच अवयव क्रियाशील होतात. सकारात्मक जीवनाची सुरूवात होते. व्यायामाने स्फूर्ती, तन्यता व मसल्सला बळकटी वाढून दिर्घ आयुष्य लाभते. मरगळ व सर्व बिमार्‍या दूर पळून जातात.

गांधीजींच्या मतानुसार, ‘शरीर हेच धन आहे. त्याची किंमत सोन्याच्या नाण्याने भरून काढता येणार नाही. ‘आनंदी सुदृढ व प्रफुल्लित जीवन म्हणजे प्राणायाम, योगा व व्यायाम यांनी परीपूर्ण जीवन. प्राणायाम प्राण भरतो. योगासने तनाव दुर करतात. व्यायाम शरीरास पूर्णःता बळकटी देतो. अशा परिपूर्ण शरीरात आनंद ओतप्रोत भरून ओसंडून वाहू लागतो. मनाच्या आनंदी अभ्यासात शरीराच्या कसरतीचा अभ्यास हा मुख्य भुमिकेत वावरत असतो आनंदी आनंद घेऊन.

आनंदी जगण्यातले काही तत्व:-

एकाग्रता :- शारीरिक व्यायामाने जशी शरीराची शक्ती वाढते. तसेच एकाग्रता ही मनाची शक्ती वाढवते. एकाग्रता ही वर्तमान स्थिती आहे. ती सुख व सफलतेची कुंजी आहे.

सकारात्मक विचार :- प्रत्येक घटना सकारात्मक पध्दतीने बघण्याची सवय बनवली पाहिजे. संकटांना सकारात्मक व विकासाची संधी या दृष्टीने पाहिल्यास दुःखाची तीव्रता कमी होते. सकारात्मकता एक जीवन कवच बनते जे की इतरांनी सोडलेल्या नकारात्मक उर्जेपासून स्वतःचे स्वरक्षण करते.

मौन :- मौन हा शारीरिक शक्तीतून मनाची शक्ती वाढवणारा उत्तम मार्ग आहे. प्रत्येक कृतीचे एक निश्चित उत्तर असते. सकारात्मक कृती सकारात्मक उत्तर व नकारात्मक कृती किंवा भाष्य नकारात्मक उत्तर असते. मौनामुळे हे टाळता येते. मौनामुळे मनुष्य आत्मिक विचारातून आत्मनिरीक्षण करून स्वतःत बदल घडवून आणू शकतो. आनंदी होऊ शकतो.

एकांत :- मौनासोबत एकांत जर बाळगला तर आपल्या कामाचे सिंहावलोकन होऊन सकारात्मक जगण्याला आनंदी सुरूवात होऊ शकते. एकांत हा आनंदी मार्ग बनतो.

आत्मनिरीक्षण:- मौन आणि एकांत ह्या आत्मनिरीक्षणासाठीचे मुख्य मार्ग आहेत. आपल्या दैनंदिन कामाचे बरे वाईट परिणाम आपणास लक्षात येतात. अशावेळी स्थिर मौन व एकांत धारण करून आत्मनिरीक्षण केल्यास आपल्यात सकारात्मक बदल होऊन आनंदी राहण्यास मदत होईल. सुखी जीवनाचे आनंदी मार्ग आपणास निश्चितच यशाकडे घेऊन जातील. आपले आहे आपणापाशी आपण का उदाशी? ह्या गोष्टी जेव्हा मनास कळू लागतात तेव्हा वरील सर्व मार्गाचा आवलंब यशस्वीतेने आनंदी मार्गावर मार्गक्रमणा करण्याची चावी होईल.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “सुखी जीवनाचे आनंदी मार्ग”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय