रसगुल्ल्याचा गोडवा, वाद आणि काही रंजक कहाण्या

कलकत्ता असो कि ओरिसातलं पुरीचं मंदिर असो, आपल्या महाराष्ट्रातलं कानाकोपऱ्यातलं मिठाईचं दुकान असो कि एखादं तारांकित हॉटेल असो रसगुल्ला हे नेहमी लोकप्रिय मिठाईमधलं एक नाव!! एकीकडे बंगाली लोक रसगुल्ल्याला आपला वारसा मानतात तर दुसरीकडे ओडिसी लोक रसगुल्ल्याला आपल्या मातीतलं संशोधन असल्याचं सांगतात. नावातच रस असलेल्या ता टेम्पटिंग मिठाईला कुठे रॉशोगुल्ला म्हणतात तर कुठे रसबरी.

या रसगुल्य्याचे जर तुम्ही दिवाने असाल तर या लेखात वाचा, हि मिठाई का इतकी खास आहे? मायथॉलॉजि पासून तर रेसिपीच्या संशोधनापर्यंत रसगुल्ल्याचा इतिहास सुद्धा कसा चविष्ट आहे पहा…

रसगुल्ल्याचा गोडवा

ओडिसी लोक मानतात कि ७०० वर्षांपूर्वी तेथे या मिठाईचा जन्म झाला. भगवान जगन्नाथाने देवी लक्ष्मीला रथयात्रेत न येण्यास मनवण्यासाठी रसगुल्ला खाऊ घातला होता. म्हणजे प्रेमरस हा पुराणकाळापासूनच रसगुल्ल्यात मुरला होता.

११ व्य्या शतकात आपल्या पांढऱ्या रंगामुळे या मिठाईला’ खीर मोहन’ या नावाने ओळखले जात होते. आणि म्हणूनच या मिठाईला देवी लक्ष्मीच्या प्रसादात अनिवार्य मानले जाऊ लागले. रसगुल्ल्याला बनवण्याची रेसिपी या काळात पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या पुजाऱ्यांनी गुप्त ठेवली होती असे सांगितले जाते.

हि रेसिपी मंदिराच्या बाहेर कशी गेली याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. खरंतर नक्की यातलं तथ्य समजून घेणं तसं कठीणच. यावर काही लोक असेही म्हणतात कि मंदिराच्याच एका पुजाऱ्याने जेव्हा पाहिले कि ‘पहाला’ गावात दुधाची खूप नासाडी होत आहे. तेव्हा त्याने लोकांना छेना (फाटलेल्या दुधाचा घट्ट हिस्सा) काढून त्याचा रसगुल्ला कसा बनवायचा हे शिकवलं.

गाववासीयांना रसगुल्ला म्हणजे साक्षात देवाचा आशीर्वाद वाटू लागला. या गावात माणसांपेक्षा गाईंची संख्या जास्त होती. त्यामुळे दूध दुभत्याला तोटा नव्हता. लोकांनी छेना काढून रसगुल्ला बनवायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता “पहाला” हे रसगुल्ल्याचं जन्मस्थान बनलं.

रसगुल्ल्याचा गोडवा
पाहला चे रसगुल्ले

कलकत्त्याचे रसगुल्ले सफेद तर इथले रसगुल्ले काहीसे भुरे असतात इतकाच काय तो फरक. ओडिसा मध्ये आणखी दुसरा रसगुल्ल्याचा प्रकार प्रसिद्ध आहे तो म्हणजे सालेपुरी रसगुल्ला. यात फाटलेल्या दुधाच्या काढलेल्या घट्ट भागाच्या म्हणजे ‘छेना’च्या गोळ्यांना वाफ देऊन पाकात बुडवतात. सालेपुरच्या ‘बिकलानंदर’ नावाच्या हलवायाने रसगुल्य्याचं हे तंत्र विकसित केलं.

परंतु रसगुल्ल्याला आपलं हेरिटेज सांगणारे पश्चिम बंगालचे लोक मात्र या गोष्टी सपशेल चुकीच्या असल्याचं मानतात किंवा सांगतात. आता ऐका बंगल्यांच्या रॉशोगुल्ल्याच्या गोष्टी.

बंगल्यांच्या मान्यतेनुसार १८६८ साली कलकत्त्याच्या नवीनचंद्र दास यांनी रॉशोगुल्ल्याचा शोध लावला. आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी या मिष्टान्नाला पुढे नेलं.

रसगुल्ल्याचा गोडवा

नवीनचंद्र दास यांचे नातू धिमन दास रसगुल्ल्याच्या निर्मितीची कहाणी सांगतात, “१८६४ ला नवीन चंद्र दासांनी जोराशंकोमध्ये आपलं पहिलं मिठाईचं दुकान चालू केलं होतं. परंतु लवकरच हे दुकान बंद करावं लागल्याने नंतर पुन्हा बागबाजार भागात त्यांनी दुसरं मिठाईचं दुकान चालू केलं. आता मात्र त्यांनी ठरवलं कि आता कोणत्याच जुन्या मिठाईच्या भरवशावर आपलं दुकान चालवायचं नाही. आणि त्यांनी स्वतः एका मिठाईची रेसिपी शोधून काढली आणि ती मिठाई म्हणजे कलकत्त्याच्या प्रसिद्ध रॉशोगुल्ला’.

धिमन दास सांगतात कि कित्येक लोकांनी नवीचंद्रांना या मिठाईचं पेटन्ट घेण्यासाठी सुचवलं पण त्यांना वाटत होतं कि हा अविष्कार देशभर पोहोचला तरच सफल होईल. आणि म्हणूनच त्यांनी रॉशोगुल्ल्याचं पेटन्ट घेणं टाळलं.

थांबा जरा, वाचता वाचता कंटाळू नका रॉशोगुल्ल्याची आणखी एक रसभरीत गोष्ट ऐका. या नुसार कलकत्त्याच्या रणघाटच्या हराधन मोयरा या हलवायाकडून चुकून पाकात ‘छेनाचे’ गोळे पडल्यानंतर त्यांनी रॉशोगुल्ल्याचा शोध लावला.

काहीही असो ओडिशाचा ‘खीर मोहोन’ असो ‘रसबरी’ असो किंवा कोलकत्त्याचा ‘रॉशोगुल्ला’ असो ज्या रसगुल्य्याच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटतं त्या रसगुल्य्याच्या मुळाचा वाद चघळण्यात काय अर्थ. बरं आता रसगुल्ल्याची आठवण झालीच आहे तर कोपऱ्यावरच्या मिठाईच्या दुकानात जाऊन खाल्ल्याशिवाय काही मला राहवणार नाही.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।