ईसोप….. Employees Stock Option Plans

‘ईसोप’ हे आपल्याला माहीत असलेल्या प्रचलित शेअर, निर्देशांक, कमोडिटी आणि करन्सी यांच्या कॉल ऑप्शनहून वेगळ्या प्रकारचे कॉल ऑप्शन असून याद्वारे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भविष्यात कंपनीचे समभाग कमी किमतीत देऊ करतात. एक प्रकारे छुपी वेतनवाढ देण्याचा हा प्रकार आहे. यामध्ये त्यांची कंपनीबद्धल आत्मीयता वाढावी. आपण कामगार नसून या कंपनीचे मालक आहोत ही भावना प्रबळ व्हावी. त्यांचा आर्थिक फायदा व्हावा त्यांनी नोकरी सोडून जाऊ नये असा हेतू असतो.

हा कंपनी व कर्मचारी यांच्यात झालेला एक करार असून काही अटींसह भविष्यात विशिष्ट कालावधीत, कंपनीने ठरवलेल्या किमतीत त्यांनी देऊ केलेले शेअर किंवा त्याहून कमी शेअर त्यांना विकत घेता येतात. असे असले तरी हे शेअर घेतलेच पाहिजेत अशी सक्ती नसते. असे शेअर खरेदी करणाऱ्या प्रत्येकास अंशिक प्रमाणात कंपनीचा मालकीहक्क आपोआपच प्राप्त होतो.

सेबीच्या मार्गदर्शनक तत्वानुसार ईसोप मिळण्याची पात्रता असणारी व्यक्ती–

  • कंपनीच्या किंवा तिच्या उपकंपनीच्या पे रोल वर असावी अथवा पूर्णवेळ, अर्धवेळ संचालक असावी आणि प्रवर्तकांपैकी नसावी. ती भारतात अथवा परदेशात कार्यरत असावी. तिच्याकडे १०% हून अधिक भागभांडवल नसावे. १०% हून अधिक भांडवल असणारी व्यक्ती जरी कर्मचारी, संचालक असेल तरी ईसोपसाठी अपात्र ठरते.
  • ईसोपचे निकष ठरवण्यासाठी एक भरपाई मंडळाची (Compensation Cummittee) स्थापना करण्यात यावी. जी प्रचलित सर्व नियमांचे पालन करुन ईसोपद्वारे शेअरचा भाव ,कोणाला किती ईसोप द्यायचे, ते कोणत्या कालावधीत द्यायचे ते ठरवेल. त्यांनी या सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवावे तसेच तक्रार उद्भवल्यास तिचे निराकरण होईल याची व्यवस्था करून सर्व संबंधितांना योग्य वेळात माहिती करून द्यावी. अशा प्रकारे कमिटीची स्थापना न करता कर्मचाऱ्यांना परस्पर ईसोप देता येणार नाहीत.
  • ईसोप देण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा देऊन भागांधारकांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. एक वर्षात कंपनीच्या वसूल भागभांडवलाच्या १ % किंवा त्याहून कमी शेअर्स परिवर्तित होतील एवढेच ईसोप वितरित करता येतात.
  • ईसोपद्वारे शेअरची खरेदी किंमत ठरवण्यासाठी सेबीची निश्चित अशी पद्धत असून त्याहून कमी किमतीत ईसोप देऊ नयेत.
  • ईसोप हे जरी शेअरचे कॉल ऑप्शन असले तरी ते विकता येत नाहीत, गहाण ठेवता येत नाहीत किंवा हसत्तांतरीत करता येत नाहीत. ईसोप मंजूर झाल्यापासून त्यापासून मिळणारे शेअर्स एक वर्षाच्या आत खरेदी करावे लागतात. त्यानंतर ही ते अन्य कोणास हस्तांतरित करता येत नाहीत. जोपर्यंत ईसोपने मंजूर झालेले शेअर खरेदी केले जात नाहीत तोपर्यंत कर्मचारी हा भागधारक होत नाही. त्यामुळे भागधारकांचे कोणतेही हक्क त्याला प्राप्त होत नाहीत. त्याचप्रमाणे त्याद्वारे घेतलेले शेअर्स किमान एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विकता येत नाहीत. मंजूर कालावधीत ते न घेतल्यास अथवा कमी घेतल्यास शिल्लक ईसोप आपोआपच रद्द होतात.
  • ईसोप मंजूर कालावधीत सदर कर्मचारी नोकरी सोडून गेल्यास तरीही ते रद्द होतात.

ईसोपवर दोन प्रकारे करआकारणी होते….

  • ईसोपद्वारे ज्यादिवशी शेअर घेतले त्यादिवशीचा बाजारभाव आणि खरेदी किंमत यातील फरक हा प्रोत्साहन भत्ता (perks) समजून वेतन या सदराखाली मोडून त्यावर नियमानुसार कर कापला जातो.
  • ईसोपद्वारे मिळालेल्या शेअरची विक्री आणि खरेदी किमतीतील फरक (येथे खरेदी किंमत ही ईसोपद्वारे ज्यादिवशी शेअर्स खरेदी केले त्यादिवशीचा बाजारभाव धरण्यात येईल) हे शेअर्स एक वर्षानंतरच विकता येत असल्याने त्यातून होणारा दीर्घकालीन फायदा/ तोटा समजण्यात येऊन त्यावेळच्या कररचनेनुसार त्यावर करआकारणी केली जाते.

ईसोप संबंधित शब्दावली:

  • देकारपत्र (Offer Of Grant): या देकारपत्राद्वारे पात्र व्यक्तीला ईसोपचा देकार देण्यात येतो.
  • वेस्टिंग: हा एक निश्चित असा कालावधी असतो या कालावधीत पात्रताधारक व्यक्ती त्याला उपलब्ध शेअर खरेदी करू शकतो. अश्या प्रकारे शेअर घेणे मान्य म्हणजे वेस्टिंग करणे. एकदा देण्याचे मान्य केलेले हे शेअर कोणत्याही कारणाने नाकारता येत नाहीत. यात काही बदल करता येऊ शकतो जो अंतिमतः त्या कर्मचाऱ्यांला फायदेशीर असतो.
  • एक्सरसाईज: जेव्हा पात्रताधारक ईसोप शेअरमध्ये रूपांतरित करतो त्यास एक्सरसाईज असे म्हणतात.४. एक्सरसाईज पिरियड: ज्या कालावधीत हे ईसोपचे शेअरमध्ये रूपांतर शेअरमध्ये करता येते तो कालावधी.

भारतात आपल्या कर्मचाऱ्यांना ईसोप देण्याचे सर्वाधिक प्रमाण आय टी कंपन्यात आहे. त्याखालोखाल खाजगी बँक आपल्या कर्मचाऱ्यांना ईसोप देऊ करीत आहेत.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।