वाचा तुमच्या हसण्याची पद्धत तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगते?

तुम्हाला माहितीये?? तुमच्या हसण्याची पद्धत तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगते ते?

तुम्ही अगदी दिलखुलास म्हणजे तोंडभरून हसता का कधी?

का घोडा खिंकळल्या सारखं खवचट हसता? का कितीही मोठा जोक झाला तरी फक्त स्माईल देता? का त्याच जोकवर तुमच्या चेहेऱ्यावरची रेष सुद्धा हलत नाही? कशी आहे तुमच्या हसण्याची पद्धत????

हे मी का विचारतोय माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या हसण्यावरून तुमचा स्वभाव समोरच्या व्यक्तीला कळतो हे आता एका नवीन संशोधनावरून सिद्ध झालंय.

म्हणजे तुम्हाला कसं हासायचंय तसं हसा. नाही हसलात तरी बिघडत नाही. तुमच्या हसण्याला कुणाचं बंधन नाही.

पण संशोधकांच्या निष्कर्षा वरून तुमच्या हसण्यावरून तुमचा स्वभाव कसा आहे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे दुसऱ्याला अगदी स्पष्ट कळू शकतं. ते कसं कळतं???

हसण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, कोण कसा हसतो तर कोण कसा. हे तुमच्या ओळखीचे, नात्यातले, शेजार – पाजारचे लोक कसे हसतात ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल ना?

त्यातलेच हे काही हसण्याचे प्रकार बघा……

१- हा हा हा हा हा हा……

२- हें हें हें हें हें हें हें…….

३- हाssssssss हाssssssss हाsssssssssssss हाsssss……

४- शांत…..काही जोक बिक काही झालाच नाही असं…..

सर्वसामान्य लोकांबद्दल बोलायचं झालं तर काही लोक काही ठराविक पद्धतीने हसतात, म्हणजे त्यांची तशी सवयच असते, त्यातले हे वरती दाखवलेले चार प्रकार म्हणता येतील.

मग आता तुम्ही कसं हसता हे लक्षात घ्या. कारण तुम्ही जसे हसता त्याच्यावरून समोरच्या व्यक्तीला कळेल की तुम्ही कोण आहात, कसे आहेत.

ह्या हसण्यातून आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत की आपलं व्यक्तिमत्व कसं आहे?

आपला स्वभाव कसा आहे. हे जाणून घेण्या आधी हे लक्षात घ्या की आपण का हसतो? तर आपल्याला कोणीतरी एखादा भन्नाट जोक सांगितला असेल म्हणून आपण हसतो.

पण तो कोणत्या प्रकारचा जोक होता हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. तो जोक तुम्ही कसा एन्जॉय करता हे पण महत्वाचं असतं, चला तर मग बघू हसण्याच्या काही पद्धती……

१- अगदी खळखळून हसणं…

असं हसणं म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून पटली म्हणून, अगदी तोंड संपूर्ण उघडून घशातून आवाज काढून आपलं पोट अगदी गदा गदा वर खाली होईल असं हसणं.

अगदी दिलखुलास हसणं म्हणू आपण ह्या हसण्याच्या प्रकाराला.

ज्या लोकांना मज्जा करायला आवडतं ना तेच लोक असं हसतात. अगदी दिल खुलास, आनंद घेतात.

हे लोक तसे स्वतःमध्ये सुरक्षित असतात. हसताना अगदी मोकळं चाकळ, म्हणजे बिनधास्त असतात.

समोरच्या जोक संगणाऱ्याला टाळी पण देतात. हसून आपल्या भावना हे लोक अगदी सहज मोकळ्या करतात. कमी हसणाऱ्या लोकांना बरेचदा असंहि वाटतं का बरं हे लोक उगाचच हसतात. पण दुसरीकडे कुठेतरी त्यांना असंही वाटतं मला का कधी असं हसायला येत नाही.

थोडक्यात म्हणजे असं हसणाऱ्यांचा इतरांना हेवाच वाटतो.

२- सौम्यपणे खिंकाळणे…….

हा जो हसण्याचा प्रकार आहे ना तो साधारणपणे जे लोक जरा विचित्र असतात ना त्या लोकांमध्ये पहायला मिळतो.

विचित्रपणा आणि दुष्टपणा हा अशा लोकांमध्ये भरलेला असतो.

म्हणून असे लोक सतत कोणाच्या काही चुका होतात का तेच शोधत असतात आणि त्याच्यावर काहीतरी कोटी करून स्वतःचं समाधान करून असं सौम्यपणे खिंकाळत हसतात.

ह्या हसण्यात त्यांचा कुत्सित भाव असतो. टिंगल टवाळी करणारे हे लोक सतत काहीतरी टवाळी करून हसण्यासाठी संधी शोधतच असतात.

नाही मिळालं काही तर, खोड्या काढून स्वतःचं मनोरंजन करून घेतात. दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी दर्जा देतात.

३- आवाज न करता हसणे…..

काही लोकांना मोठ्याने हसायची हिम्मत नसते, ते जरा घाबरट असतात किंवा बुजरे असतात. म्हणून ते मोठ्या आवाजात हसत नाहीत.

ते मजा, वगैरे करतील पण स्वतःला कोणी असभ्य म्हणू नये ह्याची काळजी घेतात म्हणून हसणं सुद्धा मर्यादित ठेवतात.

अशा लोकांमध्ये थोडा आत्मविश्वास कमी असतो. किंवा अजिबात नसतो म्हणून दुसऱ्याशी हसून पंगा घेत नाहीत. हसू आलंच तर तोंडावर हात ठेवून आपण हसलो नाही असं दाखवतात.

ह्या हसण्याच्या प्रकारातला तुम्ही कोणता हसण्याचा प्रकार निवडता त्यावर तुम्ही कसे आहात हे कळेल. पण बरेचदा या हसण्याला इतरही गोष्टी कंट्रोल करतात.

कारण काही व्यक्तींवर वेगवेगळ्या घटकांचे प्रभाव दिसून येतात. कशाचे प्रभाव असतात हे?

तर संस्कृती, घरातल्या किंवा समाजातल्या चालीरीती, सामाजिक प्रभाव किंवा अनुकरण, ह्या सगळ्या घटकांचा त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यावर, हसण्यावर सुद्धा प्रभाव पडतो.

आणि त्यांचं हसणं मर्यादित होतं. किंवा कधी कधी हे लोक हसायचं सुद्धा टाळतात.

ह्या हसण्याच्या प्रकारावरून तुमचं व्यक्तिमत्व कसं ओळखलं जातं ह्या गोष्टीवर सुद्धा मोठं संशोधन झालंय.

कालिफोर्नियातल्या काही संशोधकांच्या टीमने वेगवेगळ्या लोकांना बोलवून एक गंमतशीर टेस्ट घेतली. ह्या टेस्टचे दोन वेगवेगळे भाग ठरवले गेले.

पहिल्या भागात ह्या टेस्ट साठी संशोधकांनी ४० वेगवेगळे जोक्स तयार केले.

हे जोक्स वेगवेगळ्या विषयांवरचे होते, म्हणजे काही तत्वज्ञान विषयक होते, तर काही सामाजिक विषयांवर होते, तर काही अगदी मूर्खपणाचे होते, काही जरा चावट होते, तर काही जोक्स ऐकून डोकी भडकतील असे होते.

तर काही पुरुष जातीचा अपमान करणारे होते, काही स्त्री जातीचा अपमान करणारे होते, तर काही आजारी लोकांवर होते. असे सगळ्या प्रकारचे जोक्स त्या स्पर्धेत भाग घेतलेल्या लोकांच्या पुढे ठेवले.

प्रत्येक जोक वाचून त्या सगळ्या सहभागी लोकांना खूप मजा वाटली, त्यांनी ते सगळे जोक अगदी मनसोक्त एन्जॉय केले.

त्यानंतर प्रत्येकाला त्या संशोधकांच्या टीमने एक काम दिलं. हे काम म्हणजे ह्या ४० जोक्स पैकी तुम्हाला आवडलेल्या जोक्स ची श्रेणी ठरवायची.

१ ते ५ असे क्रमांक लावायचे. प्रत्येकानं तसं केलं. क्रमांक लावून जोक्स ची श्रेणी ठरवून दिली. ते श्रेणी लावलेले कागद संशोधकांनी आपल्या ताब्यात घेतले.

दुसऱ्या भागात संशोधकांच्या टीमने १६ घटकांवर आधारलेली प्रत्येकाची पर्सनॅलिटी टेस्ट घेतली.

ह्या टेस्ट मध्ये अनेक प्रश्न विचारले गेले. हे प्रश्न सुद्धा जोक्स प्रमाणेच वेगवेगळ्या विषयांवर होते. त्यातला एक प्रश्न आणि त्याचं दिलं गेलेलं उत्तर इथं उदाहरण म्हणून देतो.

हा प्रश्न मूर्खपणा ह्या विषयावरचा होता.

प्रश्न: जर तुमचा पाय एका द्राक्षावर पडला तर द्राक्ष काय म्हणेल? (निव्वळ मूर्खपणाचा प्रश्न)

उत्तर: काही नाही, ते द्राक्ष थोडी वाइन देईल. (उत्तर सुद्धा तसंच)

(यावर एक गम्मत म्हणून आपण असं करू कि याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतं? तसं तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये लिहून द्यायचं)

असे भरपूर प्रश्न आणि त्यांची उत्तरं संशोधकांच्या टीमला मिळाली. ह्या प्रश्नांच्या उत्तरात सुद्धा त्या लोकांच्या पर्सनॅलिटी प्रमाणे काही वैशिष्ट्ये दडलेली संशोधकांना दिसली.

नंतर पहिल्या भागातल्या जोक्स च्या आवडीचे क्रमांक आणि पर्सनॅलिटी टेस्ट ची उत्तरं ह्यांची सांगड संशोधकांनी घातली.

त्यातून निष्कर्ष काढला की कोणत्या प्रकारच्या जोक्स ची आवड कोणत्या प्रकारच्या व्यक्तीला आहे. आणि ते सगळे जोक्स कोणी कशा पद्धतीने एन्जॉय केले…

पूर्ण आत्मविश्वास असलेले लोक जोक एन्जॉय करताना कसे हसत होते? आणि घाबरट, किंवा आत्मविश्वास नसलेले, लोक त्याच जोक्स ना कसा प्रतिसाद देत होते, खोडकर किंवा दुष्टपणा स्वभावात असलेले लोक कसं चुका शोधायचं काम करत होते, आणि जोक्सवर कसं हसत होते, हे समोर बसून त्या संशोधकांनी शोधून काढलं.

मग संशोधकांनी शोधून काढलेल्या ह्या हसण्याच्या प्रकारांना ओळखून तुम्ही पण समोरच्या व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व कसं असेल ह्याची खात्री करून घेऊ शकता.

किंवा तुमच्यात सुद्धा काही बदल करून तुमच्या व्यक्तिमत्वाला आकर्षक करू शकता…!!

बरं आता एक करायचं लेख वाचून झाला कि कमेंटबॉक्स मध्ये एक जोक लिहून सांगायचा!!

Image Credit: Mostly Sane You Tube

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय