मानवी जीवनाचा कल्पतरु : जीवनातला आकर्षणाचा नियम

काही दिवसांपुर्वी मी आर्ट ऑफ लिवींगचा बेसीक कोर्स केला होता. त्याला हॅपीनेस कोर्स असेही म्हणतात. मनाचे खेळ फारच मजेशीर असतात, हे समजवण्यासाठी तिथले टीचर्स वेगवेगळ्या कृती करायला लावतात. अगदी गोड आवाजात ते सुचना देतात.

(दिलेल्या सुचनेनंतर मनात उमटलेली नैसर्गिक प्रतिक्रीया मी कंसात देत आहे.)

डोळे बंद करा….. (हं…. केले)

आता कुठलाही एका प्राण्याचं चित्र मनात आणा…… (आता हे काय नवीन?)

‘माकड’ सोडुन कुठल्याही प्राण्याच्या चित्राची कल्पना करा……. (डोळ्यासमोर पटकन माकडच येतं, कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा येत राहतं.)

काळी टोपी घातलेलं माकड अजिबात मनात आणु नका…… (काळी टोपी घातलेलं माकड अगदी स्पष्टपणे दिसतं, डोळ्यासमोरुन ते काही केल्या जात नाही.)

आहे ना गंमत, सुचना संपेपर्यंत ते माकड फेर धरुन नाचायला लागतं, तर असं विचीत्र आहे आपलं मन. जे नको म्हण्टलं, त्याचीच कल्पना करायला लावणारं..

इथे एका फेमस गाण्याचे बोल आठवतात, ‘’जिसका हमे डर था वोही बात हो गयी”

असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.

एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापसंच होतो.

पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो?

आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोच बसतो.

कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंच असतं.

का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं?

आणि एखादीला मनातुन मुलगी नको, मुलगी नको असा सतत धावा करुनही मुलगीच होते?

का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?

तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे,
आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन..

तुम्हाला माहीतीय?…जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…

जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.

उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं…….माझं वजन वाढतयं, म्हण्टलं की वजन अजुन वाढतं….. माझे केस गळतायत म्हण्टलं की अजुनच केस गळतात, वगैरे वगैरे…

ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.

हेच ते सुरवातीला सांगितलेलं काळं माकड…

मग मनात उजळणी चांगल्याच स्वप्नांची केली तर…

आपलं मन अगदी कल्पतरुचचं काम करतं.

म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.

फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.

ह्या सिद्धांताचा फायदा घेऊन रॉबर्ट शुलर ह्या अमेरीकन फिलोसोफर ने कॅलिफोर्नियात जगातला सर्वांत उत्तुंग आणि सर्वात महागडा पण विलोभनीय असा, अख्ख्या जगाला आशेचा किरण दाखवणारा होप टॉवर नावाचा संपुर्ण काचेचा चर्च बांधला.

ह्याच एका विचाराचा वापर करुन ‘चिकन सुप फॉर द सोल’ च्या लेखकाने अगदी थोड्या अवधीत अब्जावधी डॉलर कमावले.

मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडुन दिलेली पण हे रहस्य जाणणारी, माणसं फक्त सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली.

आपल्याही ऋषींनी आणि संतांनी हे रहस्य जाणलं होतं आणि ईश्वर प्राप्तीसाठी त्यांनी या रहस्याचा वापर केला.

विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

अशाच काही माणसांच्या, चालत्या बोलत्या, जिवंत, चमत्कारी, दंतकथाचं वर्णन आहे, ‘द सिक्रेट’ नावाचा अफलातुन सिनेमा. तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी पाहिलाच असेल हा मुव्ही………नसला पाहीला तर आवर्जुन पहाच.

वाचण्यासारखे आणखी काही…..

कृतज्ञता आणि थॅंक यु!…
निवड तुमची आहे!..
शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु…

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “मानवी जीवनाचा कल्पतरु : जीवनातला आकर्षणाचा नियम”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय