सकारात्मकतेला आपली रोजची सवय कशी बनवता येईल?

positivity

हा ‘जाने दे’ एटिट्युड एखाद्याला स्पेशल बनण्यापासुन रोखतो, दुर ठेवतो, स्वप्नांना अधुरं ठेवतो आणि नंतर नंतर ह्याची मनाला सवयच होऊन जाते. कधीतरी शेवटी आयुष्यच सांगतं, खुप काही करायचं राहुन गेलं, मनासारखं जगायचं राहुन गेलं, आता विचार करुन काय फायदा?..’जाने दे’……

काल अचानकच एका अवलियाशी भेटण्याचा योग आला. तसा तर हा आमचा जुना ग्राहक, वर्षभरापासुन ओळख पण का कोण जाणे, काल तो औपचारिकता सोडुन खुप मनमोकळेपणाने बोलला आणि लिहण्याला निमीत्त देऊन गेला.

बोलता बोलता गप्पा वळल्या माझ्या आवडीच्या विषयावर. यशस्वी माणसं असं वेगळं काय करतात, ज्यामुळे ते आपल्या स्पर्धकांच्या अनेक पावलं पुढे असतात?

आणि त्यावर त्यानं मला जे सांगीतलं ते मनात घर करुन राहीलं. तो म्हणाला, या जगात दोन प्रकारचे लोक राहतात, ‘जान दे’ आणि ‘आन दे’, कॅटीगिरी.

एखादी गोष्ट सहजासहजी मिळत नसली तर ती मिळवण्यासाठी आपल्या आरामदायक कोषातुन बाहेर पडायला नकार देणारे ते ‘जाने दे’ कॅटिगीरी वाले.

इन्कम सोर्स वाढवायचा आहे, नवी कल्पनाही सुचलिये पण ‘जाने दे”…..

फक्त स्वतःला थोडंस स्ट्रेच केल्याने अचिव्हमेंट्स वाढतील हे स्पष्ट दिसतेय, पण ‘जाने दे’……..

खुप काही मिळवण्याची क्षमता आहे, परफेक्ट योजनाही आहे पण ‘जाने दे’……….

इतरांसाठी, समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी आतुन सळसळतेय पण ‘जाने दे’……….

म्हणे, हा ‘जाने दे’ एटिट्युड एखाद्याला स्पेशल बनण्यापासुन रोखतो, दुर ठेवतो, स्वप्नांना अधुरं ठेवतो आणि नंतर नंतर ह्याची मनाला सवयच होऊन जाते.

कधीतरी शेवटी आयुष्यच सांगतं, खुप काही करायचं राहुन गेलं, मनासारखं जगायचं राहुन गेलं, आता विचार करुन काय फायदा?…..’जाने दे’……

बरोबर ह्याच्या उलट आहे ती ‘आने दे’ कॅटॅगिरी…

यांच्या दिवसाची सुरुवातचं होते ती प्रसन्नतेने, प्रार्थनेने…

जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते सर्व मला मिळु दे असं ते नियतीला सांगतात.

आणि यांची विशेषता म्हणजे यांच्याकडे येणार्या प्रत्येक गोष्टीचं हे मनापासुन स्वागत करतील, एखादी आयडीया, एखाद्याने केलेली स्तुती/कौतुकं, अपेक्षित/अनपेक्षितपणे मिळणारा पैसा, नातेसंबंधातुन मिळणारं प्रेम, थोडक्यात कायं सुख, समृद्धी, भरभराट…..सगळ्यांनी यांच्याकडे रांग लावावी असेच ते वागतात…

नवी स्वप्नं, नव्या कल्पना यासाठी, यांचे दरवाजे सतत उघडे…….

आणि नुसते मनातले मनोरे नाही तर आनंदाने, उत्साहाने अंमलबजावणी करण्यावर भर…

मग आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाने हे संपत्ती आणि माणसं खेचुन घेणारे शक्तिशाली चुंबक बनले तर त्यात नवल ते काय?

हे सतत स्वीकारतात कारण यांची ग्रहणक्षमता उच्च प्रतीची असते.

‘जाने दे’, वाल्यांनी नाकारलेल्या साऱ्या गोष्टी आपसुकच ‘आने दे’ वाल्यांकडे स्वतःहुन चालत जातात.

वेदांमधल्या भद्रसुक्ताची सुरुवातच होते ती ‘आनो भद्राः’ ह्या ओळीने…

म्हणजे “Let the good things come from all directions of the world” असे सांगणाऱ्या संस्कृतीचे आपण वारस आहोत मग ‘जाने दे’ म्हणण्याचा करंटेपणा कशाला?…

मी तर माझ्या मनावर ‘आन दे’ अशी प्रोग्रामिंग केलीये……आणि तुम्ही?….

वाचण्यासारखे आणखी काही…..

अपमानाला बनवूया “हार के आगे जीत”…..
ब्लॉक आणि बल्क डील म्हणजे काय आणि त्यात फरक काय?
असीम आनंद कि और (Happiness Unlimited) – सिस्टर शिवानी

Image Credit: https://pixabay.com/

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

2 Responses

  1. Anita Rathod says:

    ज्या गोष्टींचा आपण सकारात्मकतेने,सातत्याने विचार करतो व ती मिळविण्यासाठी प्रयत्न करतो ती आपल्याला मिळतेच.

  2. शरद देवरुखकर says:

    खूप छान… वास्तववादी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!