अडचणीच्या काळासाठी ठेवलेला राखीव/आणीबाणी निधी कसा गुंतवावा?

राखीव/आणीबाणी ( Emergency) निधी म्हणजे काय?

महिनाअखेरपर्यंत आपले रहानीमान सांभाळून आपल्याकडे काहीतरी किमान रक्कम शिल्लक रहावी असे बहुतेक व्यक्तींना वाटत असते.

अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडावेत म्हणून प्रत्येक व्यक्ती किमान शिल्लक म्हणून आपल्याकडे काही रक्कम बाळगून असतात.

ही रक्कम आपल्या मासिकखर्चाच्या सहापट असावी असा सर्वमान्य निकष आहे.

एवढी मोठी रक्कम आपण घरी ठेवू शकत नाही. बहूतेक ती बँकेत ठेवलेली असते यावर सध्याच्या नियमाप्रमाणे ३.५% व्याज मिळते.

अशा प्रकारे फारसा रिटर्न न मिळवता मोठी रक्कम बचत खात्यात ठेवणे हे तितकेसे बरोबर नाही. यावर सदर रक्कम कुठे ठेवावी ज्या योगे आपली रक्कम जेव्हा गरज असेल तेव्हा उपयोगी पडेल आणि त्यावर सुयोग्य रिटर्न मिळेल.

धोका आणि उतारा यांचे एकमेकांशी व्यस्त असलेले नाते पहाता जास्त धोका न घेता हे पैसे एफ. डी./मुदत ठेव म्हणून ठेवणे किंवा लिक्विड फंड योजनेत गुंतवणे हे पर्याय आहेत. याविषयी जाणून घेवूया.

फिक्स डिपॉझिट (Fixed Deposite) हा बचतीचा पर्याय आहे तर लिक्विड फंड (Liquid Fund) हा गुंतवणूक पर्याय आहे.

फिक्स डिपॉझिटमधून निश्चित असा रिटर्न मिळेल तर लिक्विड फंडामध्ये यापेक्षा जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता असून तो मिळेलच याची हमी नाही.

फिक्स डिपॉझिट : एका विशिष्ट काल मर्यादेचे असल्याने त्यास टर्म डिपॉझिट या नावानेही ओळखले जाते. हा एक बचतीचा लोकप्रिय प्रकार आहे.

याची मुदत ७ दिवसांपासून २० वर्षापर्यंत कितीही असू शकते. ५ वर्षे मुदतीच्या डिपॉझिटला आयकर कायद्याच्या मर्यादेत ८०/C ची सवलत मिळते.

आपले पैसे बचत खात्यात ठेवण्याऐवजी फिक्स डिपॉझिटमधे ठेवणे केव्हाही चांगलेच. पैसे फिक्स डिपॉझिटमधे ठेवण्यापूर्वी —

 • मुदत, व्याजदर, किमान/कमाल रक्कम याची माहिती करुन घ्या. सध्या मुदतीनुसार व्याजदर ४ ते ८% असून जेष्ठ नागरिकांना १/४ ते १/२% जास्त व्याज मिळते.
 • डिपॉझिट आधी मोडण्याची वेळ आली तर त्यावर दंड लागणार की नाही, असेल तर किती ते माहीत करून घ्या.
 • काही बँका डिपॉझिट सेव्हिंग खात्याशी स्वीप इन करून देतात यामुळे आपल्या गरजे एवढे डिपॉझिट मोडता येते. जेथे ही सुविधा नसेल तेथे एका मोठ्या डिपॉझिटऐवजी लहान लहान डिपॉझिट विभागून घ्यावेत ज्या योगे आपणास अडचणीत पूर्ण डिपॉझिट मोडण्याची वेळ येणार नाही.
 • डिपॉझिटवरील व्याज करपात्र असून जर ते १००००/- रूपयाहून अधिक होत असेल तर मुळातून कर कपात केली जाते. आपले उत्पन करपात्र असेल तर आयकर विवरण पत्रक दाखल करताना ते दाखवा. जर आपले उत्पन्न करपात्र मर्यादेहून कमी असेल तर करकपात टाळण्यासाठी आवश्यक तो फॉर्म २ प्रतीत भरून द्या. १ एप्रिल २०१८ नंतर जेष्ठ नागरिकास ५००००/- व्याजास कर द्यावा लागणार आहे. तेव्हा ही सवलत विचारात घेवून त्यांनी आवश्यकतेनूसार फॉर्म भरावे. फॉर्मची एक स्थळ प्रत आपल्याकडे ठेवावी.
 • कोणत्याही बँकेत ठेवलेल्या डिपॉझिटला सेव्हिंग सह एक लाख रुपयांपर्यंत मुद्दल व व्याज यांची हमी आहे हे लक्षात ठेवा.
 • डिपॉझिट शक्य असल्यास संयुक्त नावाने घ्या, वारस नोंदणी करा.
 • डिपॉझिट पावती घेतल्यावर त्यावरील नाव, मुदत, व्याजदर, व्याज घेण्याची पद्धत, वारसनोंद तपासून त्यात तफावत आढळल्यास दुरूस्त करून घ्या.

लिक्विड फंड: तीन ते सहा महिन्याच्या कालावधीकरीता रक्कम ठेवण्यास एफ डी इतकाच तुल्यबळ असा, लिक्विड म्यूचुअल फंडाचे यूनिट घेणे हा पर्याय होवू शकतो.

या मध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आणि अल्प मुदतीच्या कर्जांमधे (Money Market Securities) केली जाते. यातून प्राप्त झालेला नफा यूनिट धारकाना वाटला जातो. याची वैशिष्ट्ये अशी —

 • ही गुंतवणूक प्रमुख्याने सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, ट्रेजरि बिल, कमर्शियल बिल आणि शॉर्ट टर्म डिपॉझिटमधे गुंतवण्यात येते.
 • याचा कालावधी कमी मुदतीचा असल्याने यातून मिळणारा रिटर्न कमी असतो.
 • या योजनेत कधीही प्रवेश करता येतो कधीही बाहेर पडता येते (Open Ended) त्यासाठी कोणतीही फी द्यावी लागत नाही (Entry / Exit load).
 • यातून मिळणारा परतावा एफ डी हून अधिक असला तरी तो खात्रीने मिळेलच असे नाही.
 • चांगल्या फंड हाऊस मिळणारा परतावा फिक्स डिपॉझिट पेक्षा अधिक असतो.

चांगले लिक्विड फंड फिक्स डिपॉझिट एवढेच सुरक्षित असून ते त्यापेक्षा आकर्षक परतावा देतात. जरूर पडल्यास एक दिवसात यातील पैसे काढून घेता येतात.

वाचण्यासारखे आणखी काही…..

बँकांकडून केली जाणारी एकतर्फी शुल्कवसुली
सेवा / स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे असावे?
गोष्टी सांगेन युक्तीच्या चार….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “अडचणीच्या काळासाठी ठेवलेला राखीव/आणीबाणी निधी कसा गुंतवावा?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय