#Boycott_Chinese_Product ‘मेड इन चायना’ ला हद्दपार कसे करता येईल?

कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या आजाराशी संबंधित प्रार्थमिक माहिती किंवा पुरावे नष्ट केल्याची कबुली चीन सरकारने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनचा यातला सहभाग, भारताची अर्थव्यवस्था आणि आपल्या बाजारात पसरलेलं चिनी वस्तूंचं जाळं याचा मागोवा घेणारा हा लेख.

असं सगळे च्या सगळे कटुंब इतके दिवस घरात हे या पूर्वी तरी कधी झालं नव्हतं….

एका व्हायरस मुळे संपूर्ण देश आज लॉकडाऊन मध्ये आहे. व्हायरस कडे बघायचं कि अर्थव्यवस्था सांभाळायची या डेलिमा मध्ये शेवटी हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्याच्या पर्यायाची चाचपणी आपल्या देशात, इतकंच काय जगभरात सुरु झाली.

एका धुळीच्या कणा एवढा हा व्हायरस जगाचा नाश करायला सरसावलाय….

संपूर्ण जगात त्याची खूप मोठी दहशत निर्माण झाली आहे. इतकी दहशत कधी एखाद्या देशाने दिलेल्या अणूयुद्धच्या धमकीने सुद्धा निर्माण झाली नव्हती…

कीटक नाशक फवारल्यावर शेतात कीड मरते तशी दोन तीन देशातले असंख्य नागरिक ह्या व्हायरस च्या कचाट्यात सापडून अक्षरशः किटकांसारखे मृत्युमुखी पडले.

ह्या अचानक आलेल्या वैश्विक संकटाला महामारी हे नाव आपोआप मिळालं, इतका मोठा परिणाम जगाच्या कानाकोपऱ्या पर्यंत झाला.

अनेक राष्ट्रांना हे कळे पर्यंत मोठी जीवित हानी झाली होती. लोकांचा अंत्य संस्कार सुद्धा ती राष्ट्र करू शकली नाही.

किंवा प्रेतं उचलायला सुद्धा माणसं कमी पडली अशी दयनीय अवस्था काही राष्ट्रांमध्ये झाली. पण ह्या महामारीवर अजूनही औषध सापडलं नाही म्हणून ह्या महामारीची दहशत संपूर्ण जगावर पसरली आहे.

इतक्या लोकांचा जीव घेणारा हा व्हायरस आला कसा? तयार कसा झाला? कुठे तयार झाला ह्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हती…

काही गोष्टी जगाच्या समोर उघड झाल्या. चीनवर सगळ्याच देशांचा संशय होता. पण हे आरोप आजपर्यंत चीनने फेटाळून लावले होते.

आता या कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या आजाराशी संबंधित प्रार्थमिक माहिती किंवा पुरावे नष्ट केल्याची कबुली चीन सरकारने दिली आहे.

Manachetalks

गेल्या वर्षी आपण मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केल्या नंतर, गुलाबी थंडीचे दिवस जेव्हा सुरु होते तेव्हा तिकडे चीनच्या वुहान शहरात या व्हायरसने खलनायकासारखी एंट्री केली होती…

डिसेंबर 2019 ह्या महिन्यात चीन मधल्या वुहान शहरातल्या “इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी लॅब” मध्ये साईनटिस्ट रिसर्च करत असताना एक वेगळा दिसणारा व्हायरस त्यांच्या पाहणीत समोर आला.

हा व्हायरस इबोला किंवा सार्स सारखा दिसत होता म्हणून हा व्हायरस “वटवाघूळ” ह्या पक्षाकडून आला असावा अशी त्या साईनटिस्ट्सची खात्री झाली.

इबोला किंवा सार्स चा व्हायरस सुद्धा खोकणे, शिंकणे, ह्या मुळे पसरतो तसाच हा व्हायरस त्यांना जाणवला.

ह्या साईनटिस्ट्सनी जबाबदार सरकारी व्यक्तींना ह्या व्हायरसची माहिती दिली. पण ह्या अधिकाऱ्यांनी ही माहिती लपवून ठेवली. कोणालाही काहीच कळू दिलं नाही.

डिसेंबर 2019 च्या पहिल्याच आठवड्यात वुहान शहरातल्या मासळी बाजाराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना अचानक ताप येऊन बरेच लोक आजारी पडले.

एकदम तापाने एवढे लोक आजारी पडले म्हणून त्यांची लॅब मध्ये तपासणी केली गेली. आणि ह्या भयानक व्हायरस ने ह्या लोकांना ताप आलाय हे उघड झालं.

चिनी लोक कोणतेही प्राणी, पक्षी खातात.

ह्या लोकांनी ‘वटवाघूळ’ खाल्लं असेल म्हणून हा व्हायरस त्यांच्या शरीरात गेला असेल असं अनुमान शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी काढलं.

पण ह्यांच्यावर औषध नव्हतं. सुरुवातीला सात लोकांना ह्या व्हायरसमुळे बाधा झाली होती, आणि एक महिन्याच्या आत ही संख्या शंभराच्या पटीत वाढली.

सगळं जग नवीन वर्षाच्या आगमनाचं स्वागत करत होतं पण वुहान शहरात कोरोना बाधित लोकांची संख्या झपाट्यानं वाढत होती.

त्यातही चायनीज ल्यूनार इयर च्या सेलिब्रेशनसाठी चीनमधून बाहेर आणि बाहेरून चीनमध्ये होणारे पर्यटन हे बिनदिक्कतपणे चालूच होते.

आणि फेब्रूवारी महिन्याच्या सात तारखेला ह्या व्हायरसवर रिसर्च करणारे ‘डॉ.ली’ ह्याचाच मृत्यू झाला.

चीन च्या काही सरकारविरोधी साईनटिस्ट्सच्या म्हणण्या नुसार ‘डॉ. ली’ यांनी व्हायरस ची बातमी पसरवली म्हणून त्यांना सरकार कडून मारण्यात आलं.

अखेर हजारो लोक ह्या व्हायरसचे शिकार बनले. तरी सुद्धा चीन ने ही बातमी जगापासून लपवून ठेवली.

चीन चा मीडिया चीन गव्हर्नमेन्ट च्या ताब्यात आहे म्हणून ही बातमी कुठेही पसरली नव्हती.

पण ज्या शास्त्रज्ञाने ह्या व्हायरस वर रिसर्च केलं होतं, त्याने ही माहिती एक मोठं संकट म्हणून त्याच्या माहितीतल्या लोकांना दिली, त्याचा स्क्रीन शॉट पाठवला, आणि ही बातमी उघड झाली.

सगळ्या जगाने चीनच्या ह्या कृतीचा धिक्कार केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

चीन मधली परिस्थिती खूपच वाईट झाली होती. मृत्यू पावलेल्या लोकांच्या अंत्य विधीला जागा उरली नाही इतके झपाट्याने मृत्यू होत होते.

हजाराने मृत्यू एकाच शहरात होत होते. आणि हा व्हायरस झपाट्यानं सगळीकडे पसरत होता.

चिनी लोकांनी मृत्यूचं थैमान आपल्या डोळ्यांनी बघितलं. चिनच नाही तर संपूर्ण जगात हा व्हायरस लोकांच्या भेटी गाठी, प्रोग्रॅम, पर्यटन, ह्या सगळ्या माध्यमातून पसरला.

सगळ्या जगात ह्या व्हायरसचा प्रभाव, होणाऱ्या मृत्यूतून दिसायला लागला. चीनबरोबर जास्त मोठ्या प्रमाणावर इटली चे व्यापारी संबंध असल्यामुळे चीन नंतर इटली मध्ये मोठ्या प्रमाणावर हा व्हायरस पसरला.

चीन पेक्षा जास्त लोकांचे मृत्यू इटलीमध्ये ह्या व्हायरसने झाले. इटली आणि इराण ह्या दोन राष्ट्रांना ह्या व्हायरस ने पार बरबाद करून टाकलं.

जगातल्या सगळ्याच देशांना ह्या व्हायरसने गुडघे टेकायला लावले.

बघणं आणि सहन होणं अशक्य झालं अशी परिस्थिती आज आपल्या देशात सुद्धा येऊन ठेपली.

अमेरिकेला सुद्धा ह्या विषाणू चा मोठा फटका बसलाय. मोठी आर्थिक हानी ह्या सगळ्याच देशांची झाली, सगळ्याच सेवा, बाजारपेठा, दळणवळण, सोयी-सुविधा, व्यापार उत्पादन, ठप्प झालं.

ह्यात आपला देश सुद्धा ह्या मोठ्या संकटात सापडला आहे. सगळा देश जागेवर थांबला.

पूर्ण लॉकडाऊन मुळे देशात शुकशुकाट अनुभवायला मिळतोय, ध्वनी, पाणी हवा, ह्यांच प्रदूषण सुद्धा ह्या व्हायरस च्या दहशती मुळे थांबलं आहे.

म्हणजे विचार करा की किती मोठी हानी ह्या व्हायरस मुळे सगळ्या जगाला झाली असेल.

चीन ने ही मोठी चूक केली की ह्या व्हायरसच्या प्रसाराची बातमी लपवून ठेवली. आणि तेवढ्याच काळात लोकांच्या भेटी, मीटिंग्ज, कार्यक्रम, थिएटर, मार्केट, वाहतूक सेवा, विमान सेवा ह्यातून हा व्हायरस जगभर पसरला.

आणि प्रचंड मोठी जागतिक हानी झाली.

चीन च्या सरकार विरोधात असलेल्या दोन साईनटिस्ट्स नी अशी माहिती दिली आहे की हा व्हायरस वुहान च्या मासळी बाजारातून पसरला नसून तो वुहान च्याच इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजि रिसर्च लॅब मधून पसरवला गेलाय.

लॅब मध्ये रिसर्च साठी ६०० च्या वर वटवाघळे बंद करून ठेवली होती. काही वटवाघूळांनी एका शास्त्रज्ञावर हल्ला केला त्यावेळी हा व्हायरस त्या शास्त्रज्ञाच्या शरीरात गेला, आणि रिसर्च दरम्यान हा व्हायरस सगळीकडे पसरला गेला.

पण एवढी वटवाघळे लॅब मध्ये का आणून ठेवली गेली होती? तर त्याचं उत्तर म्हणजे चीन कित्येक वर्षांपासून जैविक अस्त्र (बायलॉजीकल वेपन) बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

चीन स्वतःला महा शक्तिशाली बनवण्याची तयारी करत आहे. त्यासाठी वुहान च्या लॅब मध्ये त्याच्यावर संशोधन चालू होतं.

वटवाघळा चा उपयोग ह्या बायलॉजीकल वेपन साठी केला गेला अशी माहिती दोन शास्त्रज्ञांनी उघड केली.

आणि ह्या जैविक अस्त्राचं संशोधन करणाऱ्या एक्सपर्ट साईनटिस्ट्स ची नेमणूक त्याच लॅब मध्ये झाली म्हणून चीनचं संशोधन हे बायलॉजीकल वेपन तयार करण्यासाठीच होतं असाही अमेरिकेचा दावा आहे.

चीन कबुली देणार नाही. पण चीन हे स्वार्थासाठी करू शकतो ही खात्री आता सगळ्या देशांची झाली आहे.

अमेरिकेने चीन वर सरळ सरळ आरोपच केले की चीन च्या म्हणण्या नुसार ह्या व्हायरस चा प्रसार कोणत्याही पक्षी किंवा प्राण्याकडून झाला नाही तर जगाच्या संहारासाठी हे चीन ने तयार केलेलं जैविक अस्त्रच आहे, आणि ह्या व्हायरस ची निर्मिती चीन ने वुहान च्या लॅब मध्ये केली आहे.

चीन ने एक तर ह्या व्हायरस मुळे पहिल्या रुग्णाचा नोव्हेंबर २०१९ मध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर डिसेम्बर पर्यंत हा व्हायरस पसरून झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची बातमी लपवून ठेवली, सगळे सुरुवातीचे पुरावेच नष्ट करून टाकले.

पण अमेरिकेचे सगळे आरोप चीन ने फेटाळून लावले होते.

त्यामुळे अमेरिकेला जास्त दबाव आणता आला नाही. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) देणं जरुरीचं होतं पण त्यांना सुद्धा ही माहिती दिली नाही.

अमेरिकेच्या आरोपांमुळे WHO ने चौकशी केली त्यावेळी चीन ने इतके मृत्यू झाल्याचे कबूल केलं आणि हळूहळू पूर्ण जगच अवघ्या काही महिन्यात बदलून गेलं.

पण आता या कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या आजाराशी संबंधित प्रार्थमिक माहिती किंवा पुरावे नष्ट केल्याची कबुली सुद्धा चीन सरकारने दिली आहे.

यावर आता पुढे ‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस’ माहिती घेऊन कारवाई करेल.

‘एवढी मोठी जागतिक हानी झाली ती फक्त चीन सरकारच्या विचित्र धोरणामुळे. चीनला हे जैविक अस्त्र वापरून जगात सर्व शक्तिमान व्हायचं होतं. अमेरिकेला ह्या व्हायरस च्या मदतीने खिळखिळे करून टाकण्यासाठी ही योजना चीनची असावी’ असा डोनाल्ड ट्रम्प यांचा उघड उघड आरोपच आहे.

पण ह्या व्हायरस चा झटका चीनला ह्या जैविक युद्धाच्या आधीच बसला आणि चीन चं सगळंच पितळ उघडं पडलं.

जगातल्या अनेक देशांनी चीन शी असलेले त्यांचे व्यापारी संबंध तोडून टाकले आहेत. चीन बरोबर केलेले करार संपुष्टात आले आहेत. काही देशांनी चीनला जागतिक कोर्टात खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

आपल्या देशावर सुद्धा मोठं आर्थिक संकट ह्या चीन च्या कृती मुळे आलं आहे. देशातले सगळे च्या सगळे व्यवहार ठप्प झाले, अर्थ व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला.

पुढे ही काही दिवस तो त्रास संपूर्ण देशाला सहन करायला लागणार आहे. गरिबांचे जीवन उध्वस्त झालं, सर्व सामान्य माणसाच्या घराची अवस्था दयनीय झाली.

आता ह्यासाठी प्रत्येक नागरिकाने एकमेकांना सहकार्य करायचं आहे, गरिबांना जमेल तशी मदत करून त्यांच्या जीवनात नवीन उमेद निर्माण करायची आहे. आपले आपणच एकमेकांना उभारी द्यायची आहे.

आणि पुढे येणाऱ्या आर्थिक संकटाला धीराने तोंड द्यायचं आहे. आता सरकारांवर आणि प्रशासनावर सगळी जवाबदारी टाकून मोकळे होण्याची हि वेळ नाही.

एक गोष्ट आपल्याला कधीच विसरायची नाही. आणि ती म्हणजे चीनवर कधीच विसंबून राहायचं नाही.

आपल्याकडे बरेचदा ‘मेड इन चायना’ वस्तूंवर बहिष्कार टाका असे सगळेच म्हणतात. पण हे शक्य केव्हा होईल?

आजही आपण आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू नीट पहिल्या तर ५० % पेक्षा जास्त वस्तू या चीनमधून आलेल्या किंवा चीनमध्ये ऍसेम्बल केल्या गेलेल्या असतात.

यासाठी गरज आहे ती चीनकडून होणारी आयात पूर्णपणे थांबण्याची.

आयात थांबणं हेही तेव्हाच शक्य होईल जेव्हा या गरजेच्या वस्तूंची निर्मिती आपल्याकडे होईल. म्हणजे आपण आत्मनिर्भर होऊ!!

आता हेच बघा तुम्ही जर ‘वायफाय राउटर’ खरेदी करायला बाजारात गेले तर ‘मेड इन चायना’ शिवाय काहीही पर्याय तुम्हाला मिळणार नाही.

अहो इतकंच काय, आता हे लिहीत असताना माझा ऍपल चा मॅकबुक मी खालच्या बाजूला पहिला तर प्रॉडक्ट सिरीयल नम्बर च्या ठिकाणी लिहिलेले आहे, ‘Designed by Apple in California and Assembled in China’

हे मॅकबुकच्या काही मॉडेल्सच्या बाबतीत होत असेल म्हणून माझ्याकडचा दुसरा मॅकबुक चेक केला तर त्यावरही तसेच.

देशातल्या सरकारांनी व्यापारातली सरलता आणि लोकांनी तो व्यापार उभा करण्याची इच्छाशक्ती दाखवली तरच आपल्याला चीनला हरवता येऊ शकेल.

नारायण मूर्तींनी सांगितल्या प्रमाणे या व्हायरसबरोबर राहण्याची सवय करून आत्मनिर्भर बनणं हाच यावर उपाय आहे.

जास्त दिवस घरात बसणं या देशाला इतकंच काय जगाला सुद्धा परवडणारं नाही. म्हणून सोशल डिस्टंसिंग, स्वच्छता, हेल्थ अवेअरनेस या सगळ्या गोष्टी आपल्या सवयींचा भाग बनवून आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला लागणं हाच एक उपाय आहे.

‘थ्री इडियट्स’ चे खरे होरो सोनम वांगचुक यांनीही चीनला बुलेटने नाही तर वॉलेटने उत्तर द्यायचं अशी मोहीम काही दिवसांपूर्वी चालू केली.

चिनी प्रॉडक्ट्स अगदी लगेचच आपल्या जीवनातून आपण हद्दपार करू शकत जरी नसलो तरी त्याची सुरुवात आताच केली तर येत्या दीड ते दोन वर्षात ते नक्की शक्य होईल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय