जाणून घ्या ह्या कोरोना महामारीने आपल्याला काय काय शिकवले..

कोरोनाने आपल्याला काय शिकवले??? आपण जिवंत आहोत ही सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे..

आणि हा आनंद साजरा करायला शँपेन नसली तरी लिंबू सरबत तरी नक्कीच असेल… हे आणि बरेच काही वाचा या लेखात.

सध्याच्या आयुष्यावर काही बोलण्याआधी आपण जरा मागे जाऊयात..

साधारण डिसेंबर २०१९ चा विचार केला तर आपण तेव्हा कसे होतो आणि आज कसे आहोत ह्यातला फरक जाणवला का..??

काही रोजची उदाहरणं घेऊयात जरा..

ख्रिसमसच्या सुट्टीत मुलांना फिरायला न्यायचे म्हणून प्लॅन केले होते.. मात्र बॉसने अचानक क्लाएन्ट मिटींग्स ठरवल्या आणि सुट्ट्या कॅन्सल केल्या म्हणून कोणीतरी चिडचिड केली असेल..

कधी प्रवासात असलेल्या ट्राफिक वर कोणी वैतागला असेल. किंवा बायकोने केलेल्या भाजीवर कोणी नाखूष असेल..

इतकेच काय तर भव्यदिव्य लग्नसोहळा होऊनही कोणीतरी असमाधानी असेल..

आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपण नाराज होतो, नाखूष होतो आणि चिडचिडही करतो..

मात्र ही कोरोनाची महामारी सुरू झाली आणि आपण किती बदलत गेलो..

स्वच्छता, काळजी आणि दया ह्या हरवलेल्या गोष्टी पुन्हा अंगीकारायला लागलोय..

ते पर्यावरण वाचवणारे तीन R (reduce, reuse, recycle) आपल्या जीवनाचा भाग खऱ्या अर्थाने होऊ लागलेत. किती तरी लहान लहान बाबतीत आपण समाधान मानायला लागलोय..

ज्या ज्या गोष्टी गृहीत धरल्या त्याची किंमत आज कळायला लागलीये.

आधी जे आयुष्य बिनाकामाचे किंवा बेकार वाटायचे तेच अचानक सुंदर वाटायला लागले आहेत.

जी माणसे आवडत नव्हती त्यांच्या बरोबरही थोडे सूर जुळवून घ्यायला लागलो आहे..

अशाच आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याची किंमत आपल्याला आत्ता कळायला लागली आहे..

ह्या गोष्टींबद्दल वाचा तर खरं.. तुम्हालाही हे नक्कीच पटेल..

१. स्वातंत्र्य:

आधी आपल्याला कुठेही फिरायची मुभा होती. कधीही मनात आले की घराबाहेर पडून आपण कुठेही जाऊ शकत होतो..

जो पर्यंत आपण कोणतेही कुकर्म करत नव्हतो तो पर्यंत आपल्यावर कोणीही वचक ठेवून बसले नव्हते.

आपल्या आयुष्याला आपण हवे तसे जगत होतो.. माणूस म्हणून जगायचे नियम पाळले तर आपण जणू एक स्वतंत्र पक्षी होतो..

पण आता ह्या कोरोनापासून स्वतःला वाचवायला मात्र आपल्याला स्वतःच्याच घरात कोंडून बसायला लागत आहे.. जणू आपले घराबाहेर जायचे, आयुष्य मनाप्रमाणे जगायचे स्वातंत्र्य कोणीतरी हिरावून घेतले आहे..

हे आपले स्वातंत्र्य संपुष्टात आल्यापासून आपल्याला त्याची उणीव जाणवत आहे.. पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्षाप्रमाणे आपली अवस्था झाली आहे.. कधी एकदा नेहमी प्रमाणे स्वतंत्र आयुष्य जगायलला मिळणार असे झाले आहे..

२. सुखसोई आणि आराम:

घरातल्या सुख सोई आणि आराम जरी भरपूर मिळत असला तरी आता घराबाहेरच्या सुखसोईंना आपण मुकलो आहे..

रोजच्या जीवनाला फोडणी देणारे कोणतेच कार्यक्रम आपण करू शकत नाहीये.. ना हॉटेल, ना जिम, ना स्पा, ना मसाज.. अगदी स्वयंपाकाचा कितीही कंटाळा आला तरी बाहेरून जेवण मागवायची सोय राहिली नाही.. आपण सगळे नक्कीच हे मिस करतोय..

३. विविधता:

आपल्या आयुष्याला आधी एकसुरीपणा नव्हता.. खूप विविधता आपल्या जीवनात होती..

कोणत्या हॉटेलात जेवायला जायचे, कोणत्या मॉल मधून शॉपिंग करायची.. हे सगळे चॉईस आपल्या हातात होते..

इतकेच काय तर भाजीवालीकडे जाऊन आपल्याला हवी तशी भाजी निवडून आणायची सुद्धा आपल्याला सूट होती..

अश्या विविध गोष्टी करायला आपल्याला कसलीच आडकाठी नव्हती..

आता मात्र ऑनलाइन भाज्या मागवणे, धान्य मागवणे हे काम आपल्या नशिबी आले आहे..

आणि ते जसे असेल तसे नखरे न करता स्वीकारावे लागत आहे.. रिसोर्सेस एकदम मोजकेच आहेत.. जे आहे त्यातच आपली हौस भागवायला लागत आहे.. कसलेही स्वतःचे निवड स्वातंत्र्य नाही, कसली विविधता नाही..

आयुष्य कसे एकसुरी झाले आहे..

४. माणसांशी असलेले संवाद:

आपल्या नातेवाईकांना भेटणे, मित्रमंडळींसोबत पार्टी करणे, फॅमिली सोबत फिरायलला जाणे आणि ह्यातून सगळ्यांशी संवाद साधणे हे देखील गेले दोन महिने आपण करू शकलो नाही..

इतकेच नव्हे तर रोजच्या भाजीवाल्याशी केलेली घासाघीस, कामवाल्या मावशीबरोबरचे गॉसिप हे देखील सगळे गायब झाले आहे.. जगापासून तुटल्यासारखे वाटत आहे..

ऑफिसचे काम घरबसल्या करतो आहे, पगार मिळत आहे हे नशीब समजावे की, काही टक्के पगार कपात झालीये किंवा ऑफिसच्या कलिग्स ना भेटताही येत नाही ह्या गोष्टींमुळे उदास व्हावे तेही समजेनासे झाले आहे..

सगळा वर्चुअल संवाद सुरू आहे.. समोरासमोर जाणे अशक्य झाले आहे..

५. घराबाहेरची मौज मजा:

कधी नाटक-सिनेमा बघायला जायचो आपण.. ते तर आता स्वप्नवत झाले आहे.. आपल्याच सोसायटीच्या कंपाउंड मध्ये क्रिकेटही खेळता येईना.. ना नवीन सिनेमा येणार ना नवीन नाटके.. आयुष्यातून मनोरंजन सुद्धा हद्दपार झाले आहे..

दर शुक्रवारी ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ तर दूरच राहिला.. आता फार तर घरी बसून टीव्ही बघणे, पत्ते खेळणे सापशिडी खेळणे ह्याव्यतिरिक्त कसलीही मौज उरली नाहीये..

६. कामावरच्या माणसांची टीम:

ऑफिसात एका प्रोजेक्ट वर काम करत असताना आपल्या कालिग्स बद्दल आपल्या किती कुरबुरी असायच्या..?? पण तरीही एकमेकांच्या साहाय्याने आपण प्रोजेक्ट सक्सेस करून चांगले प्रोमोशनही एकमेकांच्या मदतीने मिळवायचो..

आता एकटेच घरात बसून प्रोजेक्ट वर काम करताना अनंत अडचांणींना स्वतःच तोंड द्यावे लागत आहे.. टीम मीटिंग नाही की ज्ञानाची, जोक्स ची, पदार्थांची देवाण घेवाण नाही.. सगळेच दुरावले..

७. अर्थव्यवस्था:

समाजातले सगळेच घटक कसे देशाच्या व्यवस्थेला हातभार लावत होते.. आता तर कामवाली बाई आणि कष्टकरी मजुरांची सुद्धा निकड भासत आहे.. आपले घरातले काम सुद्धा त्यांच्या मुळे खोळंबले आहे..

आपण सगळेच आर्थिक आणि भावनिक दृष्ट्या एकमेकांवर अवलंबून आहोत ह्याची आज जाणीव होत आहे..

हे वरील सगळे प्रॉब्लेम्स बघता.. प्रत्येकाला आता आयुष्य, त्यातील माणसे, त्यातील शिकवणी सगळेच महत्वाचे वाटू लागलेय.. शिकवणी म्हणाल तर वरील अडचणींमुळे आपण खरेच खूप काही शिकत आहोत.. आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा बदलत चाललाय.

ह्यातून घेतलेले हे काही धडे आपण आयुष्यभर विसरणारही नाही..

१. वर्तमानात जगा:

स्वप्न नक्की बघा.. भविष्यकाळाची थोडीफार तरतूद करा. मात्र हे सगळे करत असताना आपल्या वर्तमानाचा चुराडा करू नका.

आत्ताच्या घडीला समोर काय आहे तेही पहा.. त्याचाही आनंद घ्या. फक्त भविष्यकाळाच्या मागे लागून आयुष्यातला ‘आज’ गमावू नका.

प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्यायला शिका.. कारण वेळ सतत बदलत राहते.. जे आज आहे ते उद्या असेलच असे नाही.. त्यामुळे जे आज आहे तेही अनुभवा.

२. आपल्याहातून काही निसटले तरच त्याची किंमत कळते:

आपण आपले आयुष्य खूप अपेक्षांच्या ओझ्या खाली दाबून टाकलेले असते..

माझा पिझ्झा तीस मिनिटातच आला पाहिजे, माझ्या नवऱ्याने मला दिवाळीला सुंदर पैठणी घेतलीच पाहिजे. किंवा मला हवी तशीच शॉपिंग आज झाली पाहिजे..

मात्र हे सगळं दर वेळी शक्य होते का..?? नाहीच.. आणि ह्या अपेक्षांखाली आपण आपल्या हातून निसटणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बघतच नाही…

म्हणजे पिझ्झा थोडा उशिरा आला असला तरी किती गरम आणि उत्कृष्ट आहे हे आपण बघत नाही..

नवऱ्याने अगदीच महागाची पैठणी नाही पण आपल्यासाठी दुसरे काही चांगले गिफ्ट आणले आहे ह्याच्याकडे आपण पाहतच नाही..

आपल्याला फक्त तक्रारी करायच्या असतात.. आणि मग आनंदावर विरजण पडते..

आनंद आयुष्यातून गेल्यावर आता आपण त्याची किंमत समजून घेतली आहे.. मात्र ते दिवस पुन्हा कधी येतील हे आता परमेशवरच जाणे.. त्यामुळे सध्या जे समोर आहे हातून निसटून जाऊ द्यायचे नाही.. हा धडा महत्वाचा..

३. तुम्ही परिस्थितीकडे कसे बघता त्यावर तुमचा दृष्टिकोन अवलंबून आहे:

आनंदाच्या वेळी सगळ्यांची एकच रिऍक्शन असते.. आनंद मस्त साजरा करायचा..

पण आताच्या ह्या महामारीने सगळे जगच बदलून टाकले आहे.. आनंद सहजासहजी मिळवणे खूपच अवघड झाले आहे.

त्यामुळे आत्ता असलेल्या परिस्थितीकडे आपण कसे बघणार ह्यावर आपले पुढचे काही महिने, वर्ष किंवा आयुष्यही अवलंबून आहे.

आपण जिवंत आहोत ही सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे.. आणि हा आनंद साजरा करायला शँपेन नसली तरी लिंबू सरबत तरी नक्कीच असेल…

काय नाहीये ह्यापेक्षा काय आहे हे बघुयात.. हेच आपल्या आयुष्याची दिशा बदलणार आहे..

कोरोनाच्या ह्या बिकट प्रसंगी सुद्धा जगायला शिकूयात कारण आयुष्य क्षणभंगुर असले तरी खूप सुंदर आहे..!!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय