आपली बचत वाढवण्याची मानसिकता तयार करण्यासाठी १० परफेक्ट उपाय

‘ये जो थोडेसे है पैसे…’ आणि असं असताना बचत कशी करावी, हि अडचण जर तुमची असेल तर हा लेख तुमच्यासाठी… यात सांगितलेले दहा उपाय करून बघा. माझा पक्का विश्वास आहे काही महिन्यांतच तुमची बचत वाढायला सुरुवात होईल…

पैशांची बचत हा प्रत्येक कुटुंबात चर्चिला जाणारा एक महत्वाचा विषय असतो. क्रेडिट-डेबिट याचे गणित महिन्याच्या सुरुवातीलाच मांडले जाते आणि अमुक एक रक्कम बचतीची म्हणून बाजूला ठेवली जाते. म्हणजे निदान आर्थिक घडी नीट बसण्यासाठी असे केले पाहिजे…

अडीअडचणीच्या काळात वापरायला, एखादी नवी वस्तू, गाडी घ्यायला किंवा रिटायरमेंटची सोय म्हणून आपण बचत करत असतो, किंबहुना करायला हवी.

पण नक्की बचत कशी करायची हा अनेक जणांना पडलेला प्रश्न असतो, खूप जणांना हे कोडे सुटत नाही. काही लोकांना उधळपट्टी करायची सवय असते तर काहींना अजून बचतीचे महत्त्वच पटलेले नसते.

गमतीचा भाग म्हणजे मनाचेTalks च्या बचत आणि आर्थिक विषयांशी संबंधित सर्व लेखांवर, एका वाचक मित्राचा नेहमीच असा कमेंट असतो कि खर्च करायलाच पैसे पुरत नाही तर बचत कुठून करायची. अर्थात फक्त एकाच कुणाची नाही सर्वांचीच हि अडचण असते कि, ‘ये जो थोडेसे है पैसे, खर्च किसपर करूं कैसें-कैसें??’

वेळ काही सांगून येत नाही आणि हौसेला मोल नसते त्यामुळे जमा-खर्चाचा हिशोब नीट मांडून आवडत्या गोष्टींसाठी मन न मारता, समतोल राखून बचत करायची सवय आपण लावून घेतली पाहिजे.

कंजूसी न करता पैसे वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स खास तुमच्या साठी

जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमच्याकडून व्हायला हवी तितकी पैशांची बचत होत नाही तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
पैशांची बचत कशी करायची हे शिकण्यासाठीचा आजचा हा लेख.

१. स्वतःशी खोटे बोलू नका

आपल्याला आपल्या चुका मान्य न करायची सवय असतेच. आपल्याकडून एखाद्या महिन्यात जरा जास्त खर्च झाला किंवा विनाकारण खर्च झाला तर ते मान्य करायच्या ऐवजी आपण स्वतःची समजूत काढतो की आहेत आपल्याकडे पैसे तर का नाही वापरायचे?

किंवा झाला एखाद्या महिन्यात जास्त खर्च तर होऊदे, पुढच्या महिन्यात जास्त पैसे बाजूला ठेऊ असा विचार करतो आणि प्रत्यक्षात मात्र पुढच्या महिन्यात जास्तीची बचत करत नाही उलट ही मग एक सवयच होते.

पैसे आहेत म्हणून वापरायचे. तुम्हाला जर स्वतःला बचतीची सवय लावून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमची ही चूक मान्य करायला शिकले पाहिजे.

आपल्याकडून जास्त खर्च होतो आहे, आपण विनाकारण खर्च करतो किंवा आपण आपल्या ‘स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग’ वर फारसा परिणाम न होऊ देता सध्या करतोय यापेक्षा नक्कीच जास्तीची बचत करू शकतो या गोष्टी आपण मान्य करून त्यावर काम करायची इच्छा ठेवली पाहिजे. असे केल्याने आपले अर्धे काम झालेच म्हणून समजा.

२. तुमची पैशांबाबतची मेन्टॅलिटी कशी असते?

महिन्याच्या सुरुवातीला पगार झाल्या झाल्या तुम्ही त्यातली अमुक एक रक्कम सरळ बचतीच्या खात्यात टाकता, का पैसे आल्या आल्या ही वस्तू घे, या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जा अशी उधळपट्टी करता आणि महिन्याच्या शेवटी जे उरतील ते किंवा जर उरले तर ते पैसे बचतीच्या खात्यात टाकता?

तसेच बचत करताना तुमच्या मनात काय हेतू असतो? घर किंवा गाडी घेणे का रिटायरमेंटची सोय म्हणून?

आपण बचत का करतोय आणि कशी करतोय हे प्रश्न स्वतःला विचारून त्याची ठोस उत्तरे मिळवली पाहिजेत. असे केल्याने आपले आपल्यालाच आपली विचार करायची पद्धत समजेल आणि त्यात काय सुधारणा करायची हे लक्षात येईल.

३. आपल्याला जे हवं आहे ती गरज आहे कि हौस आहे?

काहींना उगाच ब्रँडेड गोष्टींची हौस असते. आपण वापरतो ती प्रत्येक गोष्ट ब्रँडेड हवी या हट्टापायी बराच पैसा खर्च होतो.

बऱ्याचदा ही ब्रँडेड वस्तूंची हौस ही लोकांना दाखवण्यासाठी ही असते. आपल्या मित्रमंडळीत जर असे शौकीन असतील तर आपण त्यांच्यात उठून दिसायला सुद्धा हा शौक पाळत असतो. हे

आपण टाळायला हवे. या गोष्टींची आपल्याला गरज नसते पण हाव मात्र असते.

आपल्या हौसेला मुरड घालत जगून बचत करायची असा मात्र याचा अर्थ नाही. या दोन्ही मध्ये गरज या गोष्टीला प्राधान्य देत जमेल तशी स्वतःची हौस पुरवली तर पैशांचा अपव्यय टळतो आणि आपले मन मारून जगणे सुद्धा बंद होते.

गरजेच्या सर्व वस्तू घेऊन आपल्या हौसेच्या वस्तूंची यादी करायची आणि एखाद्या खास प्रसंगाच्या निमित्ताने त्या वस्तू एकेक करून घ्यायच्या हा अजून एक पर्याय असू शकतो.

आणि साहजिकच आहे जशी तुमची आमदनी वाढते तसे त्या प्रमाणात खर्च करणं किंवा बँडेड वस्तूंकडे वळण तुम्ही जुळवून आणू सुद्धा शकताच कि!!

४. बचत खाते आणि खर्चाचे खाते वेगळे ठेवा

महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या अकाउंटमध्ये एक रक्कम जमा झाली की त्यातून खर्चाला लागणारे पैसे लागतील तसे काढायचे आणि उरलेले पैसे त्याच खात्यात बचत म्हणून ठेऊन द्यायचे ही सवय खूप जणांना असते पण ही एक अतिशय धोकादायक सवय आहे हे लक्षात घेऊन ती बदलली पाहिजे.

शिवाय आजच्या फोन पे, गुगल पे च्या जमान्यात तर या बाबतीत सावधानच असलेलं बरं…

पैसे असे असतील तर ते खर्च होणारच हे आपण मान्य केले पाहिजे. महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम आपण वेगळ्या बचतीच्या खात्यात टाकून उरलेल्या रकमेतून आपले खर्च भागवायला हवेत.

दर महिन्याला ठरविक रकमेची एफ. डी. करणे किंवा ती शक्य नसल्यास आर. डी. करणे हे पर्याय सुद्धा आपण निवडू शकतो. गुंतवणुकीची क्षमता जास्त असेल तर SIP, Mutual Fund, किंवा शेअर मार्केट मधील ब्लू चिप कम्पन्यांचे शेअर्स यात लॉन्ग टर्म साठी गुंतवणूक हाही एक उत्तम पर्याय आहे.

https://www.manachetalks.com/10600/financial-planning-30-days-chellange-for-financial-health-marathi-arthasakshar/

५. बचतीचा हेतू ठरवा

आपण बचत का करतो आहे? हा प्रश्न स्वतःला वारंवार विचारला पाहिजे. श्रीमंत होण्यासाठी कुणी बचत करत नसतो. बचत करण्यामागे काहीतरी ठराविक हेतू असतोच.

कदाचित तुम्ही म्हातारपणाची सोय म्हणून बचत करत असाल किंवा इतका पुढचा विचार न करता कदाचित तुम्हाला नवीन गाडी, नवीन फोन असे काहीतरी घ्यायचे असेल ज्यासाठी तुम्ही बचत करत असाल.

तसे असेल तर तुम्हाला घ्यायच्या असलेल्या या गीष्टींचे फोटो तुमच्या टेबलवर लावले तर ती तुमच्या बचतीसाठीची मोठी प्रेरणा होऊ शकते. काही असेल तरी आपल्याला पैसे का साठवायचे आहेत याचे उत्तर आपले आपल्याला देता आले पाहिजे.

६. जमा खर्चाची डायरी ठेवणे

बचत करण्याची पद्धत सुधारण्यासाठी अनेक वाईट सवयींचा जसा त्याग करावा लागतो तशा अनेक चांगल्या सवयी लावून सुद्धा घ्याव्या लागतात.

जमा खर्चाची नोंद ठेवणे ही अशीच एक चांगली सवय आहे जी लावून घेतली तर महिन्याच्या शेवटाला आपण नक्की किती खर्च केला, त्यातला किती खर्च गरजेचा होता आणि किती वायफळ होता याचा आढावा घेऊन विनाकारण होणारा खर्च टाळता येईल.

७. तुमच्या बिलांचा आढावा घ्या

एकदा का तुम्ही जमा खर्चाची नोंद ठेवायला लागतात की तुम्हाला तुमच्या सगळ्या खर्चाचा नीट अंदाज येईल. एखाद्या गोष्टीसाठी आपण त्या गोष्टीच्या मूळ किंमतीपेक्षा जास्त पैसे मोजतो आहोत का?

हा प्रश्न महिन्याच्या शेवटी तुमचा तुम्हाला विचारून त्याचे उत्तर शोधले पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला लागतच नसेल तरी केवळ वर्षानुवर्षीची सवय म्हणून ती आपल्या घरात दर महिन्याला येते का?

या आणि अशा किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींचा आढावा घेऊन नको असलेले खर्च टाळता येतील. प्रत्येक महिन्याला जरी ही रक्कम किरकोळ वाटली तरी ती तशी नसून तिचा आपल्या बचतीमध्ये मोलाचा वाटा ठरू शकतो.

८. क्रेडिट कार्डाचा उपयोग करणे आपल्याला नीट जमते का?

क्रेडिट कार्ड जितकी सोयीस्कर असतात तितकीच धोकादायक सुद्धा असतात. सगळ्यांसाठीच हा नियम लागू होईल असे नाही पण ज्यांना खूप खर्च करायची सवय असते त्यांनी क्रेडिट कार्ड वापरणे कटाक्षाने टाळले पाहिजे.

अशा लोकांना नंतरचे नंतर बघू असे म्हणून खर्च करण्याची सवय असते त्यामुळे खर्च करताना लक्षात येत नाही आणि क्रेडिट कार्डचे बिल येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

त्यामुळे ज्यांना वायफळ खर्च करायची सवय असते त्यांनी क्रेडिट कार्डचा उपयोग न केलेलाच बरा.

याऊलट नीट वापर केला, तर क्रेडिट कार्डने गरजेची खरेदी करून नो कॉस्ट EMI, वेगवेगळ्या बँकांच्या बचतीच्या स्कीम्स वापरून ‘समझदारी कि खरीदारी’ करण्याचा योग सुद्धा तुम्ही साधू शकता.

अशाच वेगवेगळ्या वस्तू म्हणजे पुस्तके, किराणा सामान इथपासून सध्या मुलांच्या ऑनलाईन शाळेसाठी मोबाईल, लॅपटॉप, वायफाय राउटर यासारख्या गरजेच्या निवडक वस्तू, चांगल्या बचतीच्या पर्यायांसह सुरक्षितपणे खरेदी करायच्या असल्यास येथे क्लिक करा.

९. तीस दिवसांचा नियम

तुम्हाला एखाद्याकडे एखादी नवीन गोष्ट दिसली की लगेच असे वाटते का, की आपल्याकडे सुद्धा ही गोष्ट हवी आणि लगेच तुम्ही ती जाऊन विकत सुद्धा घेता का?

अनेकांना ही सवय असते पण ती गोष्ट विकत घेतल्यावर सुरुवातीचा उत्साह संपला की ती घराच्या एका कोपऱ्यात पडून राहते आणि आपण मात्र ती गोष्ट, आपण मुळातच विकत का घेतली याचा पश्चताप करत बसतो.

अशावेळेला काय करायचे?

आपल्याला एखादी नवीन गोष्ट घ्यावीशी वाटली की तीस दिवसांसाठी त्या गोष्टीचा विचार बाजूला ठेवायचा, वाटेल त्या क्षणी ती गोष्ट घेणे टाळायचे. समजा जर तीस दिवसानंतर सुद्धा आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे असे वाटत असेल तरच ती गोष्ट विकत घ्यायची.

१०. नवीन मार्ग स्वीकारा

आपण बचतीचे साधे, सोपे व सरळ मार्ग स्वीकारत असतो. आपल्याला रिस्क घेणे बऱ्याचदा जमत नाही कारण आपले वाचन कमी पडते.

जास्तीतजास्त बचत करायची असेल तर आपली नवीन गोष्टी शिकायची तयारी पाहिजे आणि त्या अमलात आणण्याकडे आपला कल हवा.

फक्त एफ.डी. किंवा आर.डी किंवा अन्य गुंतवणूक करण्यापेक्षा स्टॉक मार्केट मधल्या इन्व्हेस्टमेंट ने प्रचंड फायदा होऊ शकतो पण त्यासाठी स्टॉक मार्केटबद्दल शिकणे, त्याबद्दल सतत वाचन करून सतर्क राहणे या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आपल्याला यातले फार कळत नसेल तर यासाठी आपण प्रोफेशनल मदत सुद्धा घेऊन गुंतवणूक करू शकतो.

वरील दहा मार्ग एकदा का आपण आपल्या रोजच्या जीवनात अमलात आणले तर निश्चितच आपण आपली बचत करायची सवय सुधारू शकतो.

काही नवीन सवयी लावून घेणे, वाईट सवयी सोडून देणे आणि काही नवीन गोष्टी शिकणे या एवढ्यानेच आपण आपल्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो व योग्य ती बचत करून आपल्याला हवे असलेले आपले हेतू साध्य करू शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला बचतीच्या सवयींसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद…

शेअर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना लेख जरूर शेअर करा.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय