स्वयंस्फूर्ती आणि स्वयंप्रेरणेचे १३ प्रभावी मूलमंत्र

काही अपवाद वगळता प्रत्येक जण आशावादीच असतो.

मात्र, आयुष्यात अनेकदा नकारात्मकता मनाचा ताबा घेते.

आयुष्याच्या संघर्षात अशा वेळा येणे अगदी स्वाभाविक असते.

अशावेळी आपण काहीही न करता शांत बसणे पसंत करतो.

अशावेळी तेच योग्य आहे. अशावेळी शांत राहून स्वतःला विश्राम देणे आणि तात्पुरत्या नैराश्यातून सावरण्यासाठी वेळ देणे आवश्यकच असते.

मात्र, हे नैराश्य आणि नकारात्मकता आणि त्यामुळे येणारा आळस आणि निष्क्रीयता, जेव्हा सगळे जगणेच व्यापून टाकते तेव्हा परिस्थिती अत्यंत गंभीर बनते.

अशावेळी माणूस आपल्याष्क्रीयतेला झटकून देण्याऐवजी, त्याची कारणे देऊन समर्थन करू लागतो.

त्यामुळे सगळे आयुष्यच साचलेल्या डबक्यासारखे होऊन जाते.

ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

कोणत्याही परिस्थितीत आणि कोणतीही किंमत मोजून, या स्थितीतून बाहेर येणे आवश्यकच आहे.

अशा स्थितीतून बाहेर पाडण्यासही हे आहेत १३ प्रभावी उपाय….

१) मनाला शांतता द्या

नैराश्यग्रस्त अवस्थेत माणसाची ऊर्जा संपून जाते.

त्यामुळे साहजिकच मनात कोलाहल निर्माण होऊन ते क्षीण आणि गोंधळलेले होऊन जाते.

अशा गोंधळलेल्या मनाला शांत करण्यासाठी काही उपाय आहेत.

ध्यान- धारणा, व्यायाम, दूरवर पायी फेरफटका मारणे, शास्त्रीय संगीत ऐकणे हे त्यापैकी काही!

आपल्या प्रवृत्ती आणि प्रकृतीला अनुरूप प्रकार निवडा आणि त्याद्वारे मनाला शांतता द्या.

२) निवडीच्या स्वातंत्र्याचा उपयोग करा

प्रत्येक माणसाला निवडीचे स्वातंत्र्य आहे.

या स्वातंत्र्याचा उपयोग करून स्वतःशी ठरवा की मला कसे जगायचे आहे; रडत रडत की हसत हसत!!

सुस्तावलेले की उत्साहाने मुसमुसलेले!

निवड करा आणि त्याबद्दल आपल्याच मनाला बजावा. ही निवड आपल्या मनाला बळ देईल.

३) नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर रहा

नकारात्मक माणसांच्या सान्निध्यात राहिल्याने त्यांच्या नकारात्मकतेला प्रतिरोध करण्यासाठी आपली ऊर्जा खर्च होते आणि तिची जागा नकारात्मकता घेऊ लागते.

त्यामुळे नकारात्मक विचारांच्या लोकांना दूर करा आणि सकारात्मक विचारांच्या लोकांच्या सान्निध्यात रहा.

त्यामुळे आपल्यातील सकारात्मक ऊर्जाही वाढत राहील.

४) सोप्या कृतीने सुरुवात करा

अनेकदा नैराश्यग्रस्त अवस्थेत आपण काही करणेच सोडून देतो.

अशावेळी पुढे जाण्यासाठी सोप्या छोट्या छोट्या कृतींनी सुरुवात करा.

अशी छोटी सुरुवात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते आणि मोठी कार्य करण्यासाठी बळ मिळते.

५) ज्या गोष्टी आपण बदलू शकत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा

आपल्या आयुष्यात अपयशाचे, दुःखाचे असे अनेक प्रसंग असतात.

जेव्हा आपण निराशेच्या अवस्थेत असतो अशावेळी अशा निराशाजनक प्रसंगांच्या आठवणी उचल घेतात.

आणि त्यामुळे आपली ऊर्जा कमी कमी होत जाते.

वास्तविक घडून गेलेल्या अशा गोष्टी आपण बदलू शकत नाही.

त्यामुळे त्यांच्या आठवणींकडे दुर्लक्ष करणेच उचित ठरते.

त्यामुळे अशा निराशाजनक आठवणींकडे दुर्लक्ष करा आणि सकारात्मक आठवणींना उजाळा देऊन पुढे जाण्यासाठी ऊर्जा प्राप्त करा.

६) कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय करा

अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्या संपर्कात आसलेल्या लोकांचे कौतुक करायला, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिका.

त्यासाठी सुरुवातीला अगदी ठरवून एक आठवडा दररोज लोकांचे कौतुक करा.

त्यांचे आभार माना.

हेच पुढे महिनाभर करा. हळू हळू हा तुमच्या वागण्याचा,

जगण्याचा भाग होऊन जाईल. कौतुक करण्याने, आभार व्यक्त करण्याने इतरांबरोबरच आपल्यालाही आनंद मिळतो.

हा आनंद आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो.

७) आनंद देणाऱ्या उपक्रमात सहभागी व्हा

आपले मनोबल जेव्हा क्षीण झालेले असते तेव्हा स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करणाऱ्या गोष्टी करण्याची, नकारात्मक विचारात गढून जाण्याची बुद्धी होते.

हे टाळणे आवश्यक आहे. त्याऐवजी आपल्याला आनंद देणाऱ्या उपक्रमात सहभागी व्हा.

त्यामुळे सकारात्मकतेत वाढ होऊन ऊर्जाप्राप्ती होईल.

८) धीर धरायला शिका

आयुष्यात बदल घडवून आणणे ही एका रात्रीत साध्य होणारी बाब नाही.

तो एक मोठा व्यक्तिगत प्रवास आहे. या प्रवासात कधीतरी थोडेसे थांबून पुढे जाण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, कोणत्या दिशेने जावे लागेल याचा विचार करावा लागेल.

त्यासाठी धीर धरणे आवश्यक आहे.

९) आपण कोण आहोत आणि आपल्याला काय हवे आहे; याचा विचार करा

आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी आपण नक्की कोण आहोत, आपल्याला नेमके काय हवे आहे आणि ते कशासाठी हवे आहे, याची जाणीव असणे आवश्यक आहे.

अन्यथा संपूर्ण आयुष्य दिशाहीन बनून जाईल. त्यामुळे आपल्या क्षमता, कमतरता, आपले उद्दीष्ट, ते साध्य करण्याचे मार्ग याचा निश्चित विचार करा आणि त्यावर निष्ठेने आणि ठामपणे वाटचाल करा.

१०) नवनवीन गोष्टी शिकत राहा

सकारात्मक ऊर्जा असलेल्या व्यक्तींमध्ये सतत काही तरी नवे शिकण्याची आस असते आणि ही आसच त्यांना अधिक सकारात्मक ऊर्जा प्रदान करते.

स्थिर आणि थबकलेले आयुष्य आपली ऊर्जा निष्कारण खर्च करते.

त्यामुळे ते नकारात्मकतेकडे जाते.

आयुष्यात रंग भरण्यासाठी नवनवीन आव्हाने आवश्यकच आहेत.

त्यासाठी नवे काही शिकण्याची संधी अजिबात सोडू नका.

त्यामुळे आपल्या विचारांना आणि जगण्यालाही नवे आयाम मिळतात.

११) गरजूंना मदत करा

इतरांना मदत करण्याने, विशेषतः गरजूंना मदत करण्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.

त्यामुळे आपल्यालाही आनंद मिळतो आणि इतरांनाही आनंद मिळतो.

दयाळूपणा, इतरांना सहकार्य करण्याची भावना ही अतिशय प्रबळ सकारात्मक भावना आहे.

त्यामुळे जीवनात आनंद आणि ऊर्जा निर्माण होते.

१२) नियमित व्यायाम करा

नियमित व्यायाम हा अखंड ऊर्जेचा स्रोत आहे.

व्यायामामुळे शरीर आणि मनातील नकारात्मकतेचा निचरा होऊन सकारात्मक ऊर्जेचा पुरवठा होतो.

जर कधी मनावर निराशेचे मळभ दाटून आल्यासारखे वाटले तर समुद्रकिनारी, बागेत, झाडाझुडपात फिरायला जा आणि ऊर्जा मिळवून परत या.

१३) सकारात्मक आणि आशावादी प्रवृत्ती ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक कष्ट करा

आयुष्यात निराशाजनक आठवणी उगाळत बसण्याएवढी वाईट गोष्ट नाही.

या आठवणी आणि विचार आपली ऊर्जा खर्च करतात आणि मनाला निराशेच्या गर्तेत लोटतात.

आपल्या आयुष्यात काही चुका घडल्या असतील काही वाईट गोष्टी घडून गेल्या असतील.

पण तो भूतकाळ आहे. त्याचा विचार करणे सोडा वर्तमानात जगा.

सकारात्मक विचार ठेवा. आपल्या आयुष्यात सध्या काय चांगले घडत आहे, कोणत्या गोष्टी सुरळीतपणे सुरू आहेत, आपल्याला कोणते लक्ष्य गाठायचे आहे; असे प्रश्न स्वतःला विचारत रहा.

यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास मिळेल आणि आशावाद वाढीला लागेल. आणि तोच आपल्या जगण्यात आनंद निर्माण करेल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “स्वयंस्फूर्ती आणि स्वयंप्रेरणेचे १३ प्रभावी मूलमंत्र”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय