तुमच्यातले हे सात गुण तुम्हाला इतरांपेक्षा ‘स्पेशल’ बनवतील!!

तुमच्यातले हे सात गुण तुम्हाला इतरांपेक्षा 'स्पेशल' बनवतील!!

अशा काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपण कमी लेखतो.

आपल्याजवळ जे काही आहे त्यामधे खुश राहणारे, असे खूप कमी लोक आहेत.

मात्र आपल्याजवळ जे काही आहे त्याची किम्मत असणारे देखिल तितकेच आहेत.

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला याच गोष्टींचा विसर पडला आहे.

आपल्या आयुष्यात असणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद घेण्याऐवजी आपण भविष्याची काळजी करत बसतो.

आणि मग त्या काळजीमधे आयुष्य कधी निघून जाते याचा थांगपत्ता देखिल लागत नाही.

काही लोकांना तर ठाऊक देखिल नसते, की आपल्या जवळ जे आहे ते किती अनमोल आहे.

अशा गोष्टी ज्या पैशाच्या बाजारात विकत मिळत नाहीत.

ज्यांच्याजवळ पैसे असून देखिल त्यांना मिळू शकत नाहीत.

आज तशाच काही गोष्टींवर आपण नजर टाकणार आहोत:

१. दयाळूपणा

कोणाच्या आयुष्यात काय चालू असेल हे आपल्याला माहीत नाही, आणि ते जाणून घेणे गरजेचे आहेच असे नाही.

गरजेचे आहे ते, हे की कोणत्याही व्यक्तीशी बोलताना, वागताना प्रेमाने वागलो, तर आपण बोललेले चार प्रेमाचे शब्द त्या व्यक्तीसाठी कदाचित खूप महत्वाचे असू शकतात.

कदाचित तुम्ही दाखवलेल्या दयाळूपणामुळे त्या व्यक्तीचा विश्वास बसेल, की सगळेच लोक वाईट नसतात, किंव्हा त्याच्या आयुष्यात जे काही चालू असेल त्यातून त्याला थोडा धीर मिळेल.

आपण एखाद्या व्यक्तीवर, दाखवलेला दयाळूपणा ही कदाचित आपल्यासाठी मोठी गोष्ट नसेल, मात्र त्या व्यक्तीला तो प्रसंग नेहमी लक्षात राहील.

आपण विचार देखिल करू शकत नाही की, कधी आणि कोणाला आपल्या त्या दोन प्रेमळ शब्दांची गरज असू शकते.

२. लक्ष केंद्रित करणे

कदाचित खूप लोकांना हे ठाऊक नसेल, पण जर तुम्ही असे ठरवले की ‘पुढच्या सहा महिन्यांसाठी मी या एका विशिष्ठ गोष्टीवरच माझे लक्ष केंद्रित करेन’ तर तुम्ही खूप कमी वेळात खूप काही साध्य करू शकता.

अशी एखादी गोष्ट जी खूप महत्वाची आहे मात्र त्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे, असे होत असेल तर हे नक्की करून पहा.

मग ते अभ्यासाच्या बाबतीत असो किंवा आपल्या व्यवसायाच्या बाबतीत, किंवा मग ते आपले करिअर असो.

एखाद्या गोष्टीमध्ये घेतलेली सततची मेहनत ही कधीच वाया जात नाही, मात्र आपण त्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे मानायला हवे.

३. नवीन अनुभव

जेव्हा आपण एखादा नवीन अनुभव घेत असतो, तेव्हा थोडी भीती वाटणं सहाजिकच आहे.

मात्र त्या भीतीवर मात करून तो अनुभव घेतल्यानंतर जो

आनंद मिळतो तो शब्दात सांगणे देखिल कठीण आहे. अनुभव हा माणसाला काही ना काही शिकवत असतो.

जुना किंवा नवीन त्यामधून जे शिकायला मिळते ते घ्यायचे आणि पुढे चालत राहायचे.

आपण घेतलेला नवीन अनुभव हा आयुष्यात पहिल्यांदा येत असतो, ती पहिली वेळ एकदाच येते ती पुन्हा येणार नाही.

त्यामुळे त्या पहिल्या वेळेचा आनंद घ्यायला कधीच विसरू नका.

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ ही कधी ना कधी येतेच.

४. गुंतवणूक

पैसे कमावणे, आणि पैसा असणे इतकेच पुरेसे नाही.

जर आपल्याकडे पैसे असेच राहिले तर त्यांची वाढ होणार नाही, उलट ते संपून जातील.

त्यासाठी योग्य गुंतवणूक गरजेची आहे.

खूप लोकांना गुंतवणुकीबाबत फारसे ठाऊक नसते, अशा वेळी महिन्याला १०००/- किंवा ५०००/- इतके गुंतवावे, या छोट्या गुंतवणुकीचा देखिल भविष्यात फायदा होऊ शकतो.

आपल्याला महिन्याला मिळणारा पगार किंवा महिन्याला आपल्याला जितके पैसे मिळतात त्याचा अगदीच छोटा भाग हा गुंतवणुकीसाठी ठेवावा, या छोट्या भागाचा अडचणीच्या वेळी उपयोग होऊ शकतो.

जोपर्यंत आपल्याला गुंतवणुकीच्या बाबतीत पूर्ण माहीत मिळत नाही तोपर्यंत हा एक सुरक्षित मार्ग आहे पैसे गुंतवण्याचा.

५. हास्य

हसल्याने आयुष्य वाढते असे म्हणतात, पण कधी – कधी आपल्याला देखिल आठवत नाही की आपण शेवटचं मनमोकळे पणाने कधी हसलो होतो.

आयुष्याच्या शर्यतीमध्ये इतकी महत्वाची गोष्ट देखिल आपण विसरून जातो.

हास्य, आपला मानसिक आणि शारीरिक ताण कमी करायला मदत करते.

आपल्या आजू बाजूला जर विनोदी लोक असतील तर, असे लोक आपल्याला नकळत मदत करत असतात.

हसल्याने मन प्रसन्न राहते, आणि त्यामुळे आपली मनःस्थिती देखिल स्थिर राहायला मदत होते.

आपण विचार देखिल करू शकत नाही तितके फायदे आहेत फक्त आपल्या हसण्याचे.

आपल्या नकळत आपण आपले आणि आपल्या भोवतीचे वातावरण प्रसन्न ठेवत असतो.

६. अपेक्षा न करता मदत करा

कोणतीही अपेक्षा न ठेवता एखाद्याला मदत करा.

आपल्या चांगल्या कर्माचे चांगले फळ आपल्याला नक्की मिळते.

कोणत्यातरी हेतूने केलेली मदत, मदत नसते तो आपला स्वार्थीपणा असतो.

आपल्याला त्या गोष्टीचे चांगले फळ मिळेल अशी अपेक्षा ठेऊन लोक मदत करतात.

आपण कोणाला तरी मदत केली आहे, या गोष्टीबद्दल आपल्याला चांगले वाटावे म्हणून देखिल लोक मदत करतात.

मात्र कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेने केलेली मदतच मनाला शांती देऊन जाते, काही लोकांच्या, तर लक्षात देखिल राहत नाही की आपण कोणाला मदत केली होती, आणि काही लोक अनेक अपेक्षा ठेऊन मदत करतात.

७. प्रामाणिकपणा

हल्ली प्रामाणिकपणा तर जसा लोप पावत चालला आहे.

या बाबतीत होते असे की, ‘कोणी प्रामाणिक नाही तर मी तरी का राहू?’ किंवा जर कोणी प्रामाणिक असेल, तर त्या व्यक्तीला देखिल ते काम प्रामाणिकपणे करण्यापासून मागे खेचले जाते.

प्रामाणिकपणा हा गुणधर्म असणे म्हणजे चूक आहे असे वाटू लागते.

आपल्याला प्रामाणिकपणे वागायचे तर आहे मात्र तसे आपल्याला कोणी वागू देत नाही, मग अशा लोकांपासून लांबच राहिलेले बरे.

चांगल्या वृत्तीचे लोक आपल्या भोवती असणे गरजेचे नसेलही, मात्र आपल्या अंगी चांगले गुणधर्म असणे खूप गरजेचे आहे.

काळाच्या ओघात अशा खूप गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या तर आहे मात्र त्या हळू हळू लोप पावत चालल्या आहेत.

आतून आपण कसे आहोत यापेक्षा, बाहेरून आपण कसे दिसतो याकडे जास्त लक्ष देऊ लागलो.

आपल्याकडे किती आहे हे जगाला दाखवण्यामध्येच आपल्याला आनंद वाटू लागला, जास्तीत जास्त चैनीच्या वस्तू कशा खरेदी करता येतील याकडे जास्त लक्ष केंद्रित केले जाते.

वर – वर जे आपल्याला दिसते ते नेहमीच खरे असते असे नाही.

त्यामुळे आपल्या अंगी जे चांगले गुण असतील ते कोणासाठी कधीच बदलू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

1 Response

  1. December 25, 2020

    […] आपल्याजवळ जे काही आहे त्यामधे खुश राहणारे, खूप कमी लोक आहेत. तुमच्यातले हे सात गुण तुम्हाला इतरांपेक्षा 'स्पेशल' बनवतील!.. Source […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!