मागील अनेक वर्षांपासून पुरुषांमधील वंध्यत्वाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
अशा परिस्थितीत गुणसूत्रांना प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार धरता येत नाही.
मद्यपान आणि धूम्रपानासारख्या त्रासदायक सवयींनाही त्यासाठी सर्रास दोष दिला जातो. ते योग्यच आहे.
मात्र, बहुतेकांना माहित नाही की असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांचा आपल्या नियमित आहारात समावेश असतो आणि तेच पदार्थ आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम करतात.
असे पदार्थ आहारात असल्याने वंध्यत्वाचा धोका वाढतो.
आपल्याला असे वाटत असेल की वंध्यत्व आणि आहाराचा एकमेकांशी काही संबंध नाही, तर तो मोठा गैरसमज आहे.
आपला आहार आपल्या केवळ लैंगिक जीवनाचेच नुकसान करतो असे नाही तर पितृत्वाच्या स्वप्नांनाही अक्षरशः सुरुंग लावत असतो.
आम्ही आपल्याला अशा ६ पदार्थांची माहिती देत आहोत की ज्यामुळे पुरुषांमधील वंध्यत्वाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
१) प्रक्रिया केलेले मांस (प्रोसेस्ड मीट)
समाजात मांसाहार करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.
शाकाहारी चळवळ हळू हळू का होईना, जोर धरत असली तरीही जेवणात मांसाचा समावेश नसेल तर बेचैन होणारे ही अनेक जण आहेत.
मांसाहारींनी आपल्या आहारासाठी ‘मांसाची’ निवड अतिशय काळजीपूर्वक करणे अत्यंत आवश्यक आहे.
ताजे मांस खाणे हे उत्तम आहे.
मात्र, प्रक्रिया केलेले मांस खाणे आपल्यासाठी अजिबात चांगले नाही.
ते प्रजननक्षमतेवर परिणाम करते.
वास्तविक, प्रक्रिया केलेले मांस शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करून त्यांची संख्या घटविते आणि त्यांना दुबळेही बनविते..
हॅमबर्गर, हॉटडॉग आणि सलामीमध्ये वापरले जाणारे मांस पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या २३ टक्क्यांपर्यंत कमी करू शकते.
या शिवाय प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये हानिकारक हार्मोन्सचे अवशेष असण्याची शक्यता असते.
हे हार्मोन्स प्रजननक्षमता क्षीण करतात.
२) चरबीयुक्त डेअरी उत्पादने
दूध हे पूर्णान्न मानले जाते.
शरीराला बळकटी देणारा पदार्थ म्हणून त्याला आहारात महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.
ते योग्यच आहे. मात्र, कोणत्या प्रकारच्या दुधाचा आहारात समावेश असावा याचा विचार करणेही तेवढेच आवश्यक आहे.
दूध आणि चीज यासारख्या चरबीयुक्त पदार्थांच्या अतिरिक्त सेवनाने शुक्राणूंच्या हालचालीस हानी पोहोचते दररोज पूर्ण चरबीयुक्त दूध पिणे देखील शुक्राणूंची संख्या कमी होण्याचे एक प्रमुख कारण असू शकते.
दिवसातून दोनदा पूर्ण चरबीयुक्त डेअरी उत्पादन आहारात घेतल्यास तरुणांना या प्रकारचे नुकसान होऊ शकते.
३) शर्करायुक्त पेय
हल्लीच्या काळात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना कार्बनयुक्त शीतपेयांचे मोठे आकर्षण आहे.
धनदांडग्या शीतपेय उत्पादक बहुराष्ट्रीय कंपन्या सातत्याने जाहिरातींचा मारा करून त्यांचा खप वाढवीत आहेत.
मात्र, जर आपल्याला अशी शीतपेय, सोडा, एनर्जी ड्रिंक्स यासारख्या शर्करायुक्त पेयांची आवड असेल, तर हे लक्षात घ्या की त्याचे आपल्या आरोग्यावर किती गंभीर दुष्परिणाम होता आहेत.
एका संशोधनात असे आढळून आले आहे की, एका दिवसात एकापेक्षा जास्त शर्करायुक्त कार्बोहायड्रेट पेय पिण्यामुळे शुक्राणूच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होतो.
अतिरिक्त साखर शरीरात गेल्यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार वाढतो आणि ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होतो.
परिणामी, शुक्राणूंची शक्ती कमी होते.
४) रसायनयुक्त अन्नधान्य
सध्याच्या काळात सेंद्रीय धान्य आणि भाजीपाला याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात आहे.
लोकांमध्येही सेंद्रीय उत्पादने वापरण्याबाबत जनजागृती होत आहे.
खरोखरच सेंद्रीय उत्पादनांचा अधिकाधिक वापर करून रासायनिक खते आणि कीटकनाशके फवारलेल्या अन्नधान्य आणि भाजीपाल्याचा वापर टाळणे अत्यंत महत्वाचे आहे.
कीटकनाशके फवारणीने तयार केलेले फळ आणि भाज्यांचा समावेश आहारामध्ये होत असल्यास शुक्राणूंची संख्या कमी होत असते.
यात प्रक्रिया केलेले मांस, सफरचंद, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त असे सॅलेड, टोमॅटो, द्राक्ष, पालक आणि काकडी यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
कीटकनाशके आणि संप्रेरकांचा प्रभाव या फळे आणि भाज्यांवर सर्वाधिक प्रमाणात होत असतो.
अर्थातच बाजारपेठेत आपल्या मागणीनुसार सेंद्रीय फळे आणि भाजीपाला उपलब्ध असेलच असे नाही.
शिवाय सेंद्रीय म्हणून विकला जाणारा भाजीपाला आणि फळे खरोखरच सेंद्रीय आहेत किंवा नाही याची खातरजमा करण्याचा कोणता मार्गही उपलब्ध नाही.
अशावेळी जे मिळेल त्याचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध असणार नाही.
अशा वेळी फळे आणि भाजीपाला पाण्याने स्वच्छ धुवून घेणे योग्य ठरेल.
६) कॅफिन
चहा आणि कॉफी ही जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेली पेय आहेत.
आपल्यापैकी बहुतेकांना चहा किंवा कॉफीचा कप हातात घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही.
मात्र, आपल्याला चहा आणि कॉफी खूप आवडत असेल तर नंतर आपला हा छंद चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे.
चहा आणि कॉफीमध्ये असणारा कॅफीन हा घटक मानवी शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम करत असतो.
तसाच तो लैंगिक आरोग्यासही हानी पोहोचविणारा आहे.
दिवसातून दोन कपपेक्षा अधिक चहा आणि कॉफी पुनरुत्पादक पेशींचे आरोग्य धोक्यात आणतात.
शक्यतो चहा आणि कॉफीचे कमी करावे.
अगदी कमी करणे शक्य नसेल तर, एका दिवसात फक्त एक किंवा दोन कप किंवा कॉफी घ्या.
६) जंक फूड
सध्या लहान मुले आणि तरुणाईमध्येही ‘जंक फूडची मोठी चलती आहे.
स्ट्रीट फूड जॉईंटसपासून ते मोठमोठ्या आलिशान उपाहारगृहांच्या साखळीमध्ये उपलब्ध असलेले पिझ्झा, पास्ता, बर्गर, हॉट डॉग आणि वडापावसारखे पदार्थ अनेकांना भुरळ घालतात.
चरबी आणि साखर जास्त असलेले हे पदार्थ आपल्या पाचक प्रणाली, हृदय आणि पुनरुत्पादक पेशींसाठी अतिशय घातक आहेत.
या प्रकारचे अन्न खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यावर विपरीत परिणाम होतो.
या पदार्थांमध्ये ‘स्टिरॉइड’ हा अतिशय घटक घटकाचाही समावेश असतो.
त्यामुळे या पदार्थांपासून चार हात दूर राहणेच योग्य ठरणार आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.