उत्साह वाढवणाऱ्या या पाच सवयी तुमच्यात आहेत का?

आयुष्यात चढ उतार येणे, दु:ख येणे, त्रास होणे, अपयश पचवणे हे सगळ्यांनाच करावे लागते.

आयुष्याच्या अशा खडतर काळात अनेकांचा उत्साह गळून पडतो.

कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायला, प्रोत्साहन काय हातातील आहेत तेच काम संपवण्यासाठी सुद्धा उत्साह शिल्लक राहत नाही….

काहीवेळा अपयशाने, सारखे डाववले जाण्याने खचून जायला होते…

झाले असेल ना कधीतरी असे तुमच्याबरोबर?

अशा वेळी आजूबाजूला प्रोत्साहित करणारे कोणी नसेल तर अजूनच त्रास होतो.

आणि तुमच्या बाबतीत सुद्धा हे झाले असेल तर तुम्ही एकटे नाही आहात हे सगळ्यात पहिले लक्षात घेणे महत्वाचे आहे.

चढ उतार सगळ्यांच्याच आयुष्यात येतात.

आयुष्यात जर वाईट दिवस आलेच नाहीत तर चांगल्या दिवसांची किंमत कळणारच नाही, हो ना?

तर मित्रांनो, आयुष्याच्या या चढ-उतारावर तुमचा प्रवास थोडा सोपा व्हावा..

मनोधैर्य गळू नये, प्रोत्साहनाची तुम्हाला कमी पडू नये यासाठी या लेखात तुम्हाला आम्ही काही टिप्स देणार आहोत.

तुमच्या खडतर प्रवासात जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुमचे प्रोत्साहन कमी होत आहे.. तुम्हाला एका ‘पुश’ची गरज आहे तेव्हा तुम्ही या टिप्स वाचू शकता.

१. बडे बडे देशो में ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है

हा डायलॉग तर तुम्हाला तोंडपाठच असेल!

मग आयुष्यात या फेमस डायलॉगचा वापर करून बघा तुमची निराशा कशी एका झटक्यात पळून एखादे नवीन काम सुरु करण्यासाठी किंवा हातातील काम संपवण्यासाठी तुम्ही कसे प्रोत्साहित व्हाल.

निराश व्हायचे सगळ्यात मोठे कारण असते ते म्हणजे जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडते.

तुमच्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा तुम्हाला खचून गेल्यासारखे वाटते.

पण अशावेळी हे लक्षात ठेवायचे की या लहान-मोठ्या अपयशांनी काही फरक पडणार नसतो.

मोठे यश प्राप्त करण्यासाठी या अडचणींना सामोरे जावेच लागते.

त्यामुळे तुमचे मोठे यश.. तुमचा अल्टीमेट गोल काय आहे यावर लक्ष द्या.

त्या तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल चालू असताना असे किरकोळ अपयश तुम्हाला मिळणारच हे लक्षात ठेवा.

त्याचबरोबर स्वतःला हे सांगण्याचा प्रयत्न करा, की यानंतर मिळणारे यश खूप मोठे असणार आहे.

अशाप्रकारे तुमच्या ध्येयाचा विचार जर सतत तुम्ही मनात ठेवलात तर वेळोवेळी तुम्हाला इतर कोणत्या प्रोत्साहनाची गरजच उरणार नाही.

२. अपयश?? नाही धडा!

तुमच्या मर्जीप्रमाणे एखादी गोष्ट घडत नाही, तुम्ही प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला अपेक्षित असलेले यश तुमच्या पदरी पडत नाही.. हे आयुष्यात होत राहते.

कित्येकदा तर सगळे प्रयत्न व्यर्थ जातात, हातातोंडाशी आलेला घास जातो.

अशावेळेला तुमच्या मनात काय येते? अपयश, निराशा.. हो ना?

पण आयुष्यात नेहमीच आणि खास करून अशा वेळेला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आयुष्यात अपयश असे काही नसतेच..

आयुष्यातून मिळतात ते केवळ धडे.

जेव्हा जेव्हा तुम्हाला अपयश मिळाले आहे असे वाटते तेव्हा तेव्हा त्यातून तुम्ही काय शिकलात हे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा.

तसे झाले तर तुमच्या अपयशामुळे तुम्ही खचून जाणार नाही.

तुमचे अपयश तुम्हाला जास्तीतजास्त प्रोत्साहनच देत राहील.

३. तुमचा ईगो सोडून द्यायची तयारी ठेवा

आयुष्यात ईगो या गोष्टीला अजिबात कुरवाळत बसता कामा नये.

ज्यांना ही सवय असते त्यांच्याबाबतीत ही गोष्ट नेहमी घडते.

एखाद्या व्यक्तीने जर अशा लोकांच्या चुका दाखवून दिल्या किंवा काही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा ईगो आड येतो.

प्रगतीच्या मार्गावरचा एक मोठा अडथळा म्हणजे ईगो.

तुम्हाला सुद्धा अशी सवय असेल तर तुम्ही ती लवकरात लवकर बदलण्याचा प्रयत्न करा.

जर तुमचे काही चुकले तर ते मान्य करा.

चुका होतात याचा अर्थ तुम्ही प्रयत्न करत आहात.

त्यामुळे चुका होणे ही खरेतर एक चांगलीच गोष्ट आहे.

म्हणूनच तुमच्या चुकीबद्दल इतरांकडून सल्ले ऐकण्यात कोणताच कमीपणा नाही.

उलट यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या बाजू समजतील, तुम्ही भरकटलेले असाल तर तुम्हाला योग्य दिशा मिळेल.

अशामुळे तुमच्या चुकांमुळे खचून न जाता लोकांचे सल्ले, सूचना तुम्ही योग्य स्पिरीटमध्ये घेतल्यात तर तुम्हाला चूक सुधारण्यासाठी आणि पर्यायाने पुढे जाण्यासाठी हवे असलेले प्रोत्साहनच मिळेल.

४. इतरांशी तुलना करू नका

माणसांचे चेहरे जसे वेगवेगळे असतात तशीच त्यांची आयुष्य सुद्धा वेगवेगळी असतात.

याबाबतीत तुलना घातक ठरू शकते. तुमची जर अशी तुलना करण्याची सवय असेल तर तुमचे मनोधैर्य, प्रोत्साहन कोसळल्या शिवाय राहणार नाही.

आयुष्याची प्रत्येकाची वाटचाल, प्रत्येकाचे चढ-उतार वेगवेगळे असतात.

त्यामुळे जर एखाद्याकडे बघून तुम्हाला असे वाटत असेल की तो जास्त पुढे गेला आणि तुम्ही मात्र अजून पुढे जाण्यासाठी प्रयत्नच करत आहात तर ते तुम्ही थांबवायला हवे.

लोकांकडे बघण्याचा आपला सामान्यतः एक दृष्टीकोन असतो.

आपण नेहमी असाच विचार करतो की इतरांकडे काय आहे जे आपल्याकडे नाहीये..

हाच विचार धोकादायक असतो. यापेक्षा जर याच्याच उलट विचार केला तर?

लोकांकडे काय नाहीये, जे तुमच्याकडे आहे?

यामुळे तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या गुणांचा आदर करायला शिकाल.

तुमच्याकडे काय आहे याची तुम्हाला जाणीव होईल आणि त्याचा वापर करण्यासाठी योग्य ते प्रोत्साहन मिळेल.

सकारात्मक पद्धतीने विचार करून स्वतःला प्रोत्साहित करण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे.

याउलट जर तुम्ही नकारात्मक विचार करत बसलात तर तुम्हाला तुमच्यातील फक्त उणीवाच दिसतील.

५. तुम्ही कोणाबरोबर वेळ घालवता याकडे लक्ष द्या

हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.

तुम्हाला उदास वाटते, खचून गेल्यासारखे वाटते, उत्साह वाटत नाही याचे कारण तुमची संगत असू शकते.

तुमच्या संगतीचा तुमच्यावर खूप प्रमाणात परिणाम होत असतो.

म्हणूनच तुम्ही जास्तीतजास्त वेळ कोणाबरोबर व्यतीत करता याकडे लक्ष ठेवले पाहिजे.

सतत नकारात्मक बोलणारी, नकारात्मक विचार करणारी लोक घातक असतात.

त्यांच्या संगतीत राहून तुमची विचारसरणी सुद्धा बिघडण्याची शक्यता असते.

म्हणूनच तुमच्यातील उर्जा धगधगती ठेवायची असल्याच तुमच्या आजूबाजूला माणसे सुद्धा तशीच हवीत.

जेव्हा तुम्हाला वाटेल की अमुक एका माणसाकडून तुम्हाला नकारात्मकता मिळत आहे, तर लगेच अशा लोकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणे टाळायला हवे.

आयुष्यात सतत आनंदी असणारी, आपल्या प्रसन्न विचारांनी दुसऱ्यांना आनंदी करणारी लोकं जर तुमच्या आजूबाजूला असतील तर ती तुम्हाला सतत प्रगती करण्यासाठी प्रोत्साहनच देत राहतील.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय