विना ऑपरेशन पाइल्स-मूळव्याधीच्या त्रासावर घरगुती उपाय जाणून घ्या या लेखात

तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक ४ लोकांमागे एका व्यक्तीला मूळव्याधीचा, म्हणजेच पाईल्सचा त्रास असतो.

साधारणतः हा त्रास बहुतेक वेळा काही उपचारांशिवाय सुद्धा बरा होतो.

काहीवेळा मात्र मुळव्याधीचे गांभीर्य जास्त असते.

अशावेळेला वैद्यकीय उपचार, क्वचित सर्जरी सुद्धा करावी लागते.

पण बहुतांश वेळा साध्या घरगुती उपायांनी आराम मिळतो.

पाईल्स होण्यामागे काही कारणे असू शकतात, जसे की फार पूर्वीपासूनचा कॉन्स्टीपेशनचा त्रास, खूप जास्त काळ जुलाब होणे, गरोदरपण, वजन उचलण्याचे व्यायाम इत्यादी.

अनुवंशिकता हा सुद्धा मूळव्याधीच्या त्रासामागचा महत्वाचा मुद्दा आहे.

बहुतेक वेळा वयाच्या साधारण पन्नाशी नंतर या आजाराची चिन्ह पहिल्यांदा दिसू लागतात.

पाईल्सचे वर्गीकरण I ते IV असे केले आहे. I म्हणजे सहसा कोणत्याही औषधोपचाराची गरज नसलेले तर IV म्हणजे ताबडतोब वैद्यकीय उपचार घेण्याची गरज असलेले.

काही कारणाने जेव्हा गुदद्वाराच्या टोकाशी जास्त प्रेशर येते तेव्हा तिथल्या रक्तवाहिन्या सुजतात.

तिथले मसल्स सुद्धा सुजतात. यामुळे त्या भागात सूज येऊ पाईल्स तयार होतात.

याला हिमोराॅईड असे म्हणतात.

यामुळे तिथे सतत दुखत राहते, काहीवेळा बसताना त्रास होतो, पाईल्सला खाज येणे, लाल होऊन सूज येणे इत्यादी त्रास होतात, मलावाटे रक्त जाणे व त्या दरम्यान वेदना होणे हे त्रास होतात.

यावर वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. त्यामध्ये काही औषधे, स्टीराॅईड, मोशन पास करताना त्रास हूऊ नये, दुखू नये म्हणून औषधे इत्यादी असतात.

काही गभीर केसेसमध्ये ऑपरेशन करून पाईल्स काढल्या जातात.

पण वर म्हटल्या प्रमाणे बऱ्याचदा हा त्रास इतक्या गंभीर स्वरूपाचा नसून काही सोप्या घरगुती उपायांमुळे सुध्दा बरा होऊ शकतो.

मूळव्याधीच्या त्रासावर कोणते घरगुती उपाय करावेत?

१. भरपूर पाणी प्या

शरीरात जेवढे पाणी जास्त प्रमाणात जाईल तेवढा मोशन पास करायला कमी त्रास होईल.

शरीराला साधारण २-३ लिटर पाण्याची आवश्यकता असते.

जर पाण्याचे प्रमाण या पेक्षा कमी असेल तर मोशन पास करायला त्रास होतो.

जर तुम्हाला पाईल्सचा त्रास असेल तर तुम्हाला मोशन पास करताना एरवी सुद्धा दुखतच असते, पण पाणी कमी प्यायल्याने ते दुखणे वाढते.

म्हणूनच दिवसभरात २-३ लिटर पाणी नेमाने पिणे गरजेचे आहे.

पाणी पिताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे एका वेळी जास्त प्रमाणात पाणी न पिता दिवसभर बाटलीतून घोट घोट पाणी पीत राहावे.

वेगवेगळ्या फळांचे रस, लिंबू-कोकम सरबत सुद्धा तुम्ही पिऊ शकता.

२. वजन कमी करा

वजन खूप जास्त प्रमाणात वाढल्याने अनेक समस्यांना सुरुवात होते.

पाईल्स ही सुद्धा त्या पैकीच एक समस्या आहे.

पाईल्सचा त्रास होण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे आहेत, यामध्ये ओबेसिटी, म्हणजेच उंचीच्या मानाने वजन खूप जास्त असणे हे कारण सुद्धा महत्वाचे आहे.

तुमच्या उंचीच्या अनुसार तुमचे वजन काय हवे हे समजून घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा.

यासाठी व्यायाम करणे, सकस व चौरस आहार घेणे यासारख्या गोष्टी केल्या पाहिजेत.

वजन आटोक्यात आल्यावर त्रासाचे प्रमाण सुद्धा कमी होईल.

३. आहारात बदल

वजन कमी करण्याच्या दृष्टीने आहारात बदल करणे जरुरी आहेच.

पण पाईल्सचे एक महत्वाचे लक्षण म्हणजे कॉन्स्टीपेशन.

कॉन्स्टीपेशन कमी व्हावे यासाठी आहारात काही बदल करण्याची गरज असते.

यामध्ये योग्य प्रमाणात पाणी पिणे हे महत्वाचे आहेच. त्याचबरोबर आहारात अशा फळांचा आणि भाज्यांचा समावेश करावा ज्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात.

फायबर हे कॉन्स्टीपेशन कमी करण्यात उपयोगाचे असतात.

आहारात फायबरचे प्रमाण जास्त असल्यास पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते.

म्हणूनच तुम्हाला जर पाईल्सचा त्रास असेल तर फायबर रीच पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. कच्च्या भाज्या, पालेभाज्या, फळे यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात.

त्यामुळे तुम्हाला जर हा त्रास असेल तर तुम्ही या पदार्थांचा आहारात जास्तीतजास्त समावेश केला पाहिजे.

बद्धकोष्ठतेच त्रास कमी करण्याचे घरगुती उपाय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

४. कोरफड

कोरफडीच्या औषधी गुणधर्मामुळे पाईल्सला आलेली सूज व लालपणा कमी होऊन थंडावा मिळतो.

यामुळे पाईल्सला येणारी खाज सुद्धा कमी व्हायला मदत होते.

कोरफडीचा जेल तुम्ही बाहेरच्या बाजूच्या हिमोराॅईडला १० ते १५ मिनिटे लाऊन ठेऊ शकता.

कधीकधी आतल्या बाजूने सुद्धा पाईल्समुळे हिमोराॅईड येण्याची शक्यता असते.

याला इंटरनल पाईल्स असे म्हणतात.

अशाप्रकारच्या इंटरनल पाईल्ससाठी कोरफडीचा रस, सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी प्यायल्याने फायदा होतो.

कोरफडीच्या रसामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

कोरफडीचा जेल घरच्याघरी कसा तयार करायचा हे जाणून घ्यायला तुम्ही हा लेख वाचू शकता.

https://www.manachetalks.com/13274/uses-of-aleo-vera-marathi/

५. एपसम साॅल्ट

कोमट पाण्याच्या टबात बसल्याने पाईल्सच्या त्रासापासून आराम मिळतो.

कोमट पाण्यामुळे गुदद्वाराचे मसल्स रीलॅक्स होतात. यामुळे तिथली सूज कमी होऊन हिमोराॅईड कमी व्हायला मदत होते.

यासाठी एका मोठ्या टबात कोमट पाणी घेऊन त्यात १ चमचा एपसम साॅल्ट घालावे व मोशन पास केल्या केल्या त्या टबात १५ ते २० मिनिटे बसावे.

एपसम साॅल्टमुळे सूज व दुखणे कमी होण्याबरोबरच हिमोराॅईडला येणारी खाज सुद्धा कमी व्हायला मदत होईल.

६. एरंडेल

एरंडेल तेलामुळे पाईल्सचा आकार कमी व्हायला मदत होते.

यामुळे साहजिकच पाईल्समुळे होणार त्रास खूप प्रमाणात कमी व्हायला मदत होते.

एरंडेल तेलात ऍन्टी बॅक्टेरीयल व ऍन्टी फंगल गुणधर्म असतात.

यामुळे पाईल्सच्या इन्फेक्शनचा धोका कमी होते. एरंडेल तेलाच्या वापराने हिमोराॅईडला आलेली सूज कमी व्हायला सुद्धा मदत होते.

तुम्हाला जर पाईल्सचा त्रास होत असेल तर पाईल्सला बाहेरच्या बाजूने एरंडेल तेल लावावे.

मोशन पास करयला त्रास होऊ नये यासाठी दुधातून एक चमचा एरंडेल तेल सुद्धा तुम्ही रात्री पिऊ शकता.

७. विच हेझल

हे एक अमेरिकेत वाढणारे झाड आहे.

याला विंटर ब्लूम असेही म्हणतात. त्वचेच्या वेगवेगळ्या विकारांवर जसे की पिंपल्स, अक्नेवर उपाय म्हणून याचा वापर पूर्वीपासून केला जातो.

हिमोराॅईड कमी करण्यासाठी सुद्धा विच हेझल उपयुक्त आहे.

यामुळे पाईल्सच्या त्रासात येणारी सूज व दुखणे दोन्ही कमी होते.

विच हेझल लिक्वीड बाजारात उपलब्ध असते.

ते कापसाच्या बोळ्यावर घेऊन हिमोराॅईडला लावल्याने आराम मिळतो.

लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणेच हिमोराॅईडचा त्रास हा अशा घरगुती उपायांनी सहसा बरा होतो पण तो तसा २ आठवड्याच्या कालावधीत बरा न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार घेणे गरजेचे असते.

गरोदरपणात जर पाईल्सचा त्रास होऊन हिमोराॅईड आले तर काही उपाय करण्याआधी डॉक्टरांशी चर्चा जरूर करावी.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय