कुठलीही तोडफोड न करता वास्तूशास्त्राचे हे सोपे नियम तुम्हाला सुख समृद्धी देतील

कुठलीही तोडफोड न करता वास्तूशास्त्राचे हे सोपे नियम तुम्हाला सुख समृद्धी देतील

लेख लिहिण्यामागे कुठल्याही वास्तुशास्त्राचा अपमान करणे नाही.

घर म्हणजे वास्तू.

आता-आता दिशा, दोष बघितले जातात.

पूर्वी डोक्यावर छप्पर आहे हेच खूप आहे, अशी विचारसरणी होती.

वाडा, आत तुळस, घंगाळ्यात पाणी, मग आलेल्याला गूळ पाणी दिले जायचे.

गाईला चारा, जेवताना एक घास बाजूला ठेवून आधी ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे’ अन्न पूर्ण ब्रह्म म्हणून मग जेवायचे आणि मग अन्नदाता सुखी भव। हे वाक्य म्हणून ताटाला नमस्कार करुन पाटावरून उठयचे अशी प्रथा होती.

तुळस म्हणजे मांगल्याचे प्रतीक आहे.

तसे तिचे फायदेही खूप आहेत. तुळशीची पाने खाल्ल्यास शरीर निरोगी राहाते. (या कोरोना काळात यावर विश्वास न ठेवणाऱ्या कित्येक जणांनी चहामध्ये तुळशीची पाने टाकायला सुरुवात केली, हा अनुभव सुद्धा बरेच जणांनी घेतला असेल)

याच तुळशीत संध्याकाळी दिवा लावल्यास लक्ष्मी प्रसन्न होते.

हे मागचे पिढीतलेच विचार आज सुचवले जातात. त्यामुळे त्या पिढीचा यामागचा उद्देश किती सत्य होता हे आता पटते.

सूर्याला सकाळी अर्ध्य देऊन स्नान केले जायचे.

आजही कुंडलित दोष असतील तर हे उपाय सुचवले जातात.

कुठल्याही वास्तू उपायाशिवाय मागची पिढी घडलीच.

कुठल्याही शास्त्राचा आदर करावा पण वहावत जाऊन अतोनात पैसे खर्च करुन तोडफोड करण्यापेक्षा सहज-सोपे उपाय करणे हिताचे ठरते.

प्रभु रामचंद्रांनाही प्रारब्ध चुकले नव्हते आणि श्रीकृष्णालाही.

कर्म हेच प्रारब्ध मग त्या पासून सुटका होऊच शकत नाही.

मागच्या जन्मीचे भोग तुम्हाला पुढच्या जन्मी भोगावे लागतात.

अर्थात यावर किती विश्‍वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा विचार.

पण ज्यांचा देवावर विश्‍वास आहे ते हे जाणतात.

नामस्मरणाने संकटाची तीव्रता कमी करु शकता येते.

जेव्हा महापूर आला आणि घरे वाहून गेली त्यावेळी कुठलेही शास्त्र आपद्ग्रस्तांना वाचवू शकले नाही.

या लोकांना घरे हवी आहेत.

ज्यांना मिळाली त्यांचे भाग्य. दिशा, वास्तुचा दोष यांना किती महत्त्व द्यायचे ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

मग पूर्वी शास्त्र मानणारे सर्वजण नव्हते. तरी सुख होतेच ना?

दिशा वाईट नसतात वाईट दिशेने नेणारे विचार वाईट असतात.

घरे असणारे समजत असतात बंगलेवाले सुखी आहेत. पण त्याच बंगल्यात रोगाशी झुंजत किंवा कोणी एकटाच राहात असतो.

ही व्यथा त्यांना कुठे माहीत असते?

सतत असमाधानी व्यक्ती कुठेच जगाच्या पाठीवर सुखी राहात नसते.

कितीही उपाय केले तरी. मागच्या पिढीच्या गरजा कमी, आहे त्यात समाधानी राहाणे हे नक्कीच आपण आचरणात आणले पाहिजे.

कुठल्या प्रथा अयोग्य होत्या त्या काळानुरूप बदलल्याही पाहिजेत.

वास्तुशास्त्रातले जमेल तेवढे उपाय करायला काहीच हरकत नाही.

पण आपली वास्तुच खराब आहे हे आपणच मनात बिंबवले तर तेच विचार वास्तुत नकारात्मकता वाढवतील.

तुमच्या वास्तू बद्दल ग्रॅटीट्युड्स जर तुमच्या मनात असतील तर तर प्रत्येक दिशा तुम्हाला भरभरून सुख आणि समृद्धी देईल हे कधीही लक्षात असू द्या.

तिन्हीसांजेला परवचा म्हणला जायचा, पाढे मोठ्याने म्हटले जायचे, ते स्मरणशक्ती वाढावी म्हणून.

लहानपणी मुलांची आकलनशकती जास्त असते. या वयात जीभ सुध्दा संस्कृत म्हणताना वळते.

म्हणूनच संस्कार वर्गही घेतले जायचे. वास्तुत शुभ बोलायचे, संध्याकाळी लक्ष्मी सातला येते, घर बघते, मग ज्या घरात आनंद असेल तिथे ती वास करते.

खूप वर्षं मला असे वाटायचे खरंच ती येऊन जाते मग दिसत का नाही? मी विचारायचे.

मग ती अदृश्य स्वरुपात असते हे सांगितलं जायचं आणि आता हे सिध्दच झालंय की, मंत्रानी सूक्ष्म लहरी शुभ स्वरुपात वलय निर्माण करतात.

आकर्षणाचा सिध्दांत हेच सांगतो.

तुम्ही जे विश्‍वाला विचारांनी सांगाल ते पूर्ण होते. मग अगदी साधा उपाय आहे वास्तुत शुभ विचार केले तर परिणाम शुभच असणार.

ही वास्तू मला सुखच देणारी आहे हा विचार रोज मनात आणला तर मला नाही वाटत कुठलीही दिशा वाईट आहे.

तरी असेही उपाय आहेत जे तुम्हाला तोडफोड न करता सुधारणा करता येतील.

तरीही खाली दिलेले अत्यंत साधे उपाय जे वाचनात आले ते सुचवित आहे.

१) स्वस्तिक सर्वात पवित्र शुभ चिन्ह. ते दारावर किंवा उंबरठ्याजवळ काढावे.

२) गणपती दारावर असल्यास ते शुभ असते. कारण तो विघ्नहर्ता आहे.

३) खडे मीठ पाण्यात टाकून फरशी पुसावी कारण मीठ नकारात्मकता नाहीशी करते.

४) कापूर जाळल्यासही फायदा होतो. गोमातेला चारा, प्रसाद जरुर द्यावा.

५) घंटानादाने शुभ स्पंदने निर्माण होतात. शक्यतो ताटावर बसल्यावर पदार्थास नावे ठेवून अन्नपूर्णेचा अपमान करु नये.

६) घरातून बाहेर पडताना नमस्कार करुन बाहेर पडावे.

७) सरस्वतीचे स्तवन विद्याभ्यास करताना करावे.

८) अडगळीचे सामान घरात शक्यतो नसावे.

९) अतिथीस अन्न द्यावे.

त्याने ते टाळले तरी आपले संस्कार आपण जपावेत.

१०) सुवासिक वासाने मन प्रसन्न होते म्हणून उदबत्ती किंवा धूप लावावा.

तुम्ही जेव्हा इतरांची मदत करता तेव्हाच तुमच्या मदतीला कोण येणार हे ठरवले जाते.

खूपवेळा कोणीतरी अचानक तुम्हाला संकटात मार्ग दाखवतो याची प्रचिती अनेकांना आलीही असेल.

आई-वडिलांनी संस्कार करुनही मुले त्यांना दुखवत असतील तर दोष त्या आई-वडिलांचा नसतो. नाही वास्तूचा.

तुमची वास्तू तुमचे मनमंदिर बनू शकते. जर तुम्ही कुणाला सुख देऊ शकत नसाल तर निदान दु:ख तरी देवू नये.

हा साधा विचार पण आचरणात आणला तर शांतता मिळेल.

चार जणांची तोंड चार दिशेला असतील तर सुख लाभत नाही.

मंदिरात एक ही वाईट विचार येत नाही. कष्ट केल्याशिवाय यश कसे मिळणार?

खूप यशस्वी होणं चांगलंच पण तुम्ही सुखी समाधानी असणे महत्त्वाचं.

घरात बाळ आलं तरी वातावरण बदलून जातं. त्याच्यातच सगळेजण रमतात.

बोबडेबोल, दुडूदुडू धावणारी पावलं. कौतुकाने त्याच्या बाळलीला बघताना घराला एक वेगळंच घरपण येत.

म्हणजेच आंनद आपल्याच हातात असतो. सतत असुया, अहंकार, मत्सर, द्वेष मनात घेऊन वास्तुत सुख येईलच कसे?

लहानपणीचीच गोष्ट, राजाला संपत्ती म्हणून झोप लागेना आणि शेतकरी घोंगड्यावर सुखाची झोप घेतोय.

तुम्ही जितकं तुमच्या वरचढ पहाल मग हे नाही, ते नाही म्हणत.

मुद्दा हा नाहीच की वास्तुशास्त्र आहे की नाही. कितीतरी छोट्या गोष्टी श्रध्दा ठेवून कराव्यात.

त्याच्यामुळे अनुभव चांगले आले तर आनंद आहेच. एवढेच मनोगत आहे.

जर तुम्ही आधीच आर्थिकदृष्ट्या कमजोर असाल तर अवाच्या- सव्वा पैसे देऊन आणखी संकट ओढवून, त्यात किती वाहवत जायचं?

कुणीतरी सांगितलंय म्हणून आपण तसंच करायचे नाही. आपल्या बुध्दीला पटेल तेच करायचे.

जीवनात अगदी शेवटच्या क्षणी किती जण इच्छा व्यक्त करतात घरी जायचंय. कारण अख्खं आयुष्य त्या वास्तुत गेलेलं असतं.

तिथे जीव घुटमळतो.

वास्तुत आठवणी असतात. जुनी शाळा, कॉलेज कट्टा पाहिले की मनात चित्र उभं राहतं.

अरे त्या अडगळीच्या खोलीत काय धमाल करायचो अशी वाक्ये आपसूक येतातच की.

कसं भागवायचं? कधीतरी वाक्ये कानावर पडायची.

तेव्हा कुणीतरी म्हणायचं होईल सगळं नीट. तिन्ही सांजेला भरल्या घरात नको अश्रू. हेही दिवस जातील.

शुभ बोलायचं कारण वास्तु तथास्तु म्हणते. तेव्हा मी ऐकायचे आणि आज मी आई झाल्यावर मुलींना हे सांगते, ‘शुभ बोला कारण वास्तू खरंच म्हणते तथास्तु!’

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!