का अडकला आहे राज कुंद्रा? ए_रॉटीक फिल्म आणि पो_र्न फिल्ममध्ये काय फरक आहे?

गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हे नाव चर्चेत आहे. राज कुंद्राला आक्षेपार्ह सिनेमे किंवा कंटेंट बनवण्यामुळे अटक झाली आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध सज्जड पुरावे सापडले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांचे असे म्हणणे आहे की राज कुंद्रा पो_र्न फिल्म बनवत असे आणि मग त्या फिल्म्स दिल्लीपासून मुंबईपर्यंत सगळीकडे विकत असे. सदर फिल्म्स वेबसाइटवर प्रसारित करण्याचे काम देखील तो करत असे. पोलिसांच्या लेखी हा गुन्हा आहे.

परंतु राज कुंद्राचे वकील आणि फिल्म इंडस्ट्रीतील त्याचे काही सहकारी ह्यांचे असे म्हणणे आहे की राज कुंद्राने बनवलेल्या फिल्म्स ह्या पो_र्न नसून ए_रोटी_क फिल्म्स आहेत आणि अशा फिल्म बनवणे हा काही गुन्हा नाही. त्यामुळे राज कुंद्रावरील आरोप खोटे ठरतात.

गहना वशिष्ठ आणि पूनम पांडेसारख्या कलाकारांनी ह्या बाबतीत राज कुंद्राला साथ दिली आहे. त्यामुळे ह्या प्रकरणात नवीन विवाद उभा राहिला आहे. शिल्पा शेट्टी सुद्धा असे स्टेटमेंट्स देत आहे कि, राज कुंद्रा ज्या बनवायचा त्या पॉ_र्न फिल्म नसुन त्या ‘ए_रॉटी_क’ या प्रकारात मोडतात.

आता तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल की खरंच काय असतं हे पो_र्न फिल्म किंवा ए_रोटी_क फिल्म.. दोन्ही एकच का वेगवेगळे? आज आपण ह्या लेखात तेच जाणून घेणार आहोत.

ए_रोटी_क फिल्म म्हणजे नक्की काय?

ए_रोटी_क चा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर तो आहे का_मोत्ते_जक. म्हणजेच ए_रोटी_क फिल्म म्हणजे असा सिनेमा जो पाहून पाहणाऱ्याला का_मोत्ते_जना झाल्यासारखे वाटेल. इरॉटिक या प्रकारामध्ये का_मोत्ते_जना होईल अशी एखादी मूर्ती किंवा पेंटिंग, किंवा एखाद्या नाटकातील संवाद सुद्धा असू शकतो. असे सिनेमे जे पाहून पाहणाऱ्याच्या मनात का_मभावना निर्माण होतील ते एरोटीक सिनेमे असतात.

परंतु ए_रोटी_क सिनेमांकडे कलेच्या माध्यमातून पाहिले जाते. अनेक वेळा असे कामोत्तेजक प्रसंग अत्यंत कलात्मकरीत्या चित्रित केलेले असतात. ते सूचक असतात. त्यातील पात्रे थेट सं_भोग करताना दिसत नाहीत. अशा चित्रीकरणात नग्नता असली तरीही ते बीभत्स वाटणार नाहीत ह्याची दक्षता घेतलेली आढळून येते.

भारतीय सिनेमाच्या इतिहासात अनेक जाणकार निर्माता दिग्दर्शकांनी उत्तम दर्जाच्या ए_रोटी_क फिल्म्स बनवल्या आहेत. एक कलाकृति म्हणून त्यांचा दर्जा अतिशय श्रेष्ठ आहे.

पो_र्न फिल्म म्हणजे काय?

पो_र्न फिल्म्स एरोटीक फिल्म्स पेक्षा अतिशय वेगळ्या असतात. पो_र्न फिल्म्समध्ये दाखवण्यात येणारे चित्रीकरण बीभत्स स्वरूपाचे असते.

अनेक वेळा त्यात थेट सं_भोगा_चे चित्रीकरण असते. दर्शकांना उत्तेजित करण्यासाठी सं_भोग_च्या अवास्तव कल्पना त्यात दाखवलेल्या असतात.

केवळ नग्नताच नव्हे तर सं_भोगचेही सविस्तर चित्रीकरण त्यात दाखवलेले असते. तसेच बेकायदेशीरपणे लहान मुले, जनावरे इत्यादींचा वापर करून वास्तवाला धरून नसलेल्या फिल्म्स चित्रित होतात. त्यामुळे समाजातील तरुण पिढीचे विचार त्यादिशेला जाऊन त्यांचे अतोनात नुकसान होते.

सं_भोग ह्या जीवनातील महत्वाच्या आणि सुंदर गोष्टीचे विकृत आणि अवास्तव चित्रीकरण बरेचदा पो_र्न फिल्म्समध्ये केलेले असते. त्यामुळे तरुणांच्या मनावर त्याचा वाईट परिणाम होताना दिसतो.

अमेरिकेतील मानसोपचार तज्ञ एफ. सेजल्टर ह्यांनी लिहिलेल्या आर्टिकलमध्ये म्हटले आहे की ए_रोटी_क फिल्म्समध्ये कामभावनेचा उत्तम आविष्कार असतो तर पो_र्न फिल्म्समध्ये त्याबाबत विकृती दिसून येते.

ए_रोटी_क फिल्म्स दर्शकाला एक उत्तम कलाकृती पाहण्याचे समाधान देतात तर पो_र्न फिल्म्स दर्शकांना तात्पुरती उत्तेजना देण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. त्यांचे कलात्मक मूल्य शून्य असते.

ह्यावरून आपल्या लक्षात येते की पो_र्न फिल्म्स ह्या केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने बनवल्या जातात. अन्यथा त्यांना कलाकृती म्हणून काही स्थान नाही, पो_र्न फिल्म बनवून त्या ए_रोटी_क आहेत असा दावा केवळ स्वतःच्या बचावासाठी आणि कायदेशीर पळवाट म्हणून केला जातो.

अशा पद्धतीच्या पो_र्न फिल्म्स बनवणे आणि त्या प्रदर्शित करणे हा भारतात गुन्हा आहे आणि त्याच गुन्ह्यासाठी राज कुंद्रा सध्या अडकला आहे.

पाॅ-र्नचे फिल्म बघण्याचे होणारे विपरीत परिणाम वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय