खुशखबर- ZyCoV-D बनू शकते भारतातील नवी करोना लस

लवकरच नवीन मेड इन इंडिया लस येणार आहे ‘ZyCoV-D’ तिची उपयुक्तता आणि आपल्यापर्यंत ती केव्हा पोहोचणार ते वाचा या लेखात.

सध्या करोना लसीकरणाचे महत्व सर्वांनाच लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वत्र वेगाने लसीकरण सुरु करण्याची गरज असताना लसींचा मात्र तुटवडा होत आहे.

असे असताना भारतासाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे.

संपूर्ण भारतीय बनावटीची दुसरी लस ZyCoV-D ह्या महिन्याच्या शेवटी पर्यंत उपलब्ध होऊ शकते.

अहमदाबादच्या झायडस कॅडीला ह्या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीने ZyCoV-D ही करोना व्हायरस विरुद्धची लस बनवली आहे.

योग्य ते परवाने मिळाले की ही लस भारतीय बनावटीची दुसरी लस ठरेल.

ह्याआधी कोवॅक्सिन ही लस भारतात बनवली गेली आहे.

तसेच भारतात मान्यता मिळालेल्या लसींपैकी ही चौथी लस ठरेल.

ह्याआधी भारतात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक ह्या लसींना मान्यता मिळालेली आहे.

जूनअखेर ह्या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर भारतातील लसीकरण आणखी वेगाने होणे शक्य होईल.

आज आपण जाणून घेऊया की ZyCoV-D ही लस कशा प्रकारे काम करते आणि इतर लसींपेक्षा कशा प्रकारे वेगळी आहे.

नक्की कशा प्रकारे काम करते ZyCoV-D लस?

कोविड १९ ची लस बनवताना ती ४ पैकी एक कॅटेगरीप्रमाणे बनवली जाते. त्या ४ कॅटेगरी आहेत…👇

  • व्हायरस
  • प्रोटीन सबयुनिट
  • व्हायरल व्हेक्टर
  • न्युक्लिक ऍसिड (डीएनए )

हयापैकी न्युक्लिक ऍसिड (डीएनए ) ह्या पद्धतीने ZyCoV-D ही लस बनवली जाते.

म्हणजेच ह्या लसीत विषाणूचे प्लास्मिडस् वापरले जातात जे आकाराने अत्यंत लहान असे डीएनए मॉलिक्यूल असतात.

हे प्लास्मिडस् डीएनए सिक्वेन्स मॅच करून आपल्या शरीरातील सेल वापरून अनेक अँटिबॉडीज तयार करू शकतात.

तसेच रोगाचे बदलणारे स्वरूप (mutation ) ओळखून त्याप्रमाणे बदल करून आवश्यक अँटिबॉडीज तयार करू शकतात.

तसेच ही लस तयार करण्यासाठी लागणारी सामग्री सहज उपलब्ध होणारी असल्यामुळे लसनिर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

शिवाय ही लस फार जास्त थंड तापमानात ठेवण्याची गरज नसल्यामुळे लसीचे वितरण भारतभर करणे सोपे होणार आहे.

सामान्य तापमानाला देखील ह्या लसीचा साठा करणे शक्य असल्यामुळे भारतातील दुरदूरच्या जागांपर्यंत ही लस पोचवणे शक्य होणार आहे.

कशी आहे ZyCoV-D इतर लसींपेक्षा वेगळी?

आधी बनवलेल्या लसी ह्या एकतर व्हायरस किंवा व्हायरल व्हेक्टर ह्या पद्धतीने बनवल्या गेल्या आहेत.

म्हणजेच त्या लसी देताना अगदी कमी प्रमाणात जिवंत अथवा मृत व्हायरस लसीच्या स्वरूपात शरीरात सोडले जातात.

त्यामुळे त्या व्हायरसशी मुकाबला करायला शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. पण हया प्रकारात काही प्रमाणात साइड इफेक्टसचा धोका असतो.

तसेच लस घेतल्यावर ताप येणे, सर्दी खोकला होणे असे होऊ शकते.

त्यातुलनेत ZyCoV-D ही लस प्रत्यक्ष अँटिजेन नसलेली लस आहे.

ही लस आपल्याच शरीरातील सेल वापरून अँटिबॉडीज बनवते त्यामुळे ती तुलेनेने अधिक सुरक्षित आणि जलद काम करणारी आहे.

ह्या लसीचे कोणतेही साइड इफेक्टस् असल्याची नोंद झालेली नाही.

तसेच तयार होणाऱ्या अँटिबॉडीज ह्या वर्षभर शरीरात राहू शकतात. त्यामुळे ह्या लसीमुळे वर्षभर करोनापासून सुरक्षा मिळु शकते.

ह्या लसीने परीक्षणाचे दोन टप्पे पार केले आहेत. आतापर्यंत ही लस संपूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे असेच आढळून आले आहे.

आता ह्या लसीने परीक्षणाचा तिसरा टप्पा पार केला की ही लस सर्वांना देण्यासाठी उपलब्ध होऊ शकेल.

तर अशी ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस ZyCoV-D.

ह्या लसीला लवकरात लवकर मान्यता मिळून ती बाजारात येईल आणि भारतातले लसीकरण वेगाने पूर्ण होईल अशी आशा करुया.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय