तुमच्या घरात आहे सोन्याची खाण! नक्की कसे ते बघा

मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा लेख शेवटपर्यंत नीट वाचा, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स रिसायकल होऊन त्यातुन मौल्यवान धातू मिळवता येते.

आणि इतकेच नाही तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता हे सुद्धा हा लेख शेवटपर्यंत वाचला तर तुम्हाला समजेल.

शीर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना? एकतर सोने हा इतका मौल्यवान धातू आणि त्याची खाण थेट तुमच्या घरात?

पण होय, ही गोष्ट खरी आहे. सोने आणि इतर मौल्यवान धातू तुमच्या घरातच आहेत.

बदलत्या काळानुसार आता सोने आणि इतर मौल्यवान धातू हे खाणींमध्ये खोदकाम करून मिळवण्याऐवजी रिसायकलिंग करून मिळवले जाण्याची शक्यता आहे.

सध्याचा जमाना हा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा आहे. आणि आपल्या घरात आपण विविध प्रकारची इलेक्ट्रोनिक उपकरणे सतत वापरतो.

त्यातील काही निकामी देखील होतात. अशा निकामी झालेल्या उपकरणांचे आपण काय करतो?

एकतर अशी उपकरणे घरात पडून राहतात किंवा आपण सरळ ती भंगार म्हणून देऊन टाकतो

परंतु हीच उपकरणे आपल्याला पैसा मिळवून देणार असतील तर….. कसे ते पाहूया.

अशा निकामी झालेल्या उपकरणांना रिसायकल करून त्यापासून मौल्यवान धातू मिळवणे हे मोठ्या खाणींमध्ये खोदकाम करून तेथील दगडांवर, खनिजांवर प्रक्रिया करून धातू मिळवण्यापेक्षा अधिक सोपे आणि कमी खर्चीक होऊ शकेल.

वेस्ट इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोनिक फोरमचे प्रोजेक्ट मॅनेजर जेम्स हॉर्न ह्यांनी ह्याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

ते म्हणतात की ह्या प्रकारचे अर्बन मायनिंग म्हणजेच शहरांमधील खाणकाम हे आता काळाची गरज झाले आहे.

शहरांमधील घरात असणारी निकामी किंवा नको असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे रिसायकल करून त्यापासून धातू मिळवणे हे सर्व दृष्टीने जास्त सोयीस्कर आहे.

आपण एक उदाहरण पाहूया….

टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये दिली जाणारी ५००० सुवर्णपदके, रौप्यपदके आणि कांस्यपदके तयार करण्यासाठी सुमारे ६० लाख मोबाइल फोन आणि ७.२ टन इलेक्ट्रोनिक कचऱ्याचे रिसायकलिंग केले गेले.

ह्या गोष्टीचा दुहेरी फायदा असा की अत्यंत कमी खर्चात, वापरलेल्या धातुला रिसायकल करून ही पदके बनवली गेली आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ई कचऱ्याचे विघटन देखील झाले. जे एरवी सहज शक्य होत नाही.

मौल्यवान धातूंच्या जगभरात अगदी थोड्या खाणी आहेत आणि निसर्गाच्या विरुद्ध जाऊन त्यात सतत खोदकाम करून असे धातू मिळवण्यापेक्षा रिसायकल करून ते मिळवणे अतिशय फायद्याचे ठरू शकेल.

सतत उत्खनन आणि खाणकाम करून आपण पर्यावरणाची हानी करत आहोत.

त्या खाणीच्या ठिकाणी असणारे वन्यजीवन नष्ट होत चालले आहे. शिवाय धातूंचा साठा झपाट्याने कमी होत आहे. पर्यायाने धातूंच्या किमती वाढत आहेत.

असे असताना इलेक्ट्रोनिक उत्पादनांमधला वाया जाणारा धातू सोडून नवीन धातू वापरणे सर्व दृष्टीने तोट्याचे आहे.

हॉर्न पुढे सांगतात की अर्बन मायनिंगमध्ये फक्त इलेक्ट्रोनिक उपकरणेच नव्हे तर घरी, कारखान्यात, ऑफिसेस मध्ये, गोदामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचाही त्यात समावेश होतो.

तसेच जी उपकरणे खूप जास्त काळ पडून आहेत, ज्यांचा आता काहीही उपयोग नाही अशा सर्व वस्तूंचा ह्या रिसायकलिंगसाठी उपयोग होऊ शकतो.

तुमच्या घरात पडून असलेले मोबाइल फोन, टॅब्लेटस्, जुने टीव्ही, मिक्सर्, लॅपटॉप ह्या सगळ्या वस्तूंमध्ये असे मौल्यवान धातू वापरलेले असतात.

ह्या धातूचा रिसायकल करून होणारा वापर म्हणजे तुमच्या घरातील सोन्याची खाणच आहे.

सध्या जगभर ई कचरा तयार होण्याचे प्रमाण अतिशय वाढले आहे.

दरवर्षी ५ कोटी टन इतका ई कचरा जगभरात निर्माण होतो.

ह्या कचऱ्यातून निघणाऱ्या धातुपासून ६००० आयफेल टॉवर निर्माण होऊ शकतात. इतका धातू केवळ रिसायकल न केल्यामुळे वाया जाऊ शकतो. ह्या ई कचऱ्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. ह्यामध्ये दरवर्षी सुमारे ३ ते ४ % वाढ होत राहते.

सर्वात जास्त ई कचरा तयार करण्यात आपल्या आशिया खंडाचा क्रमांक पहिला आहे.

त्यापाठोपाठ युरोप खंडाचा नंबर लागतो. ह्या सर्व ई कचऱ्यात सुमारे ३१ टन सोने आणि ३ लाख ३० हजार टन तांबे सापडू शकते.

आपल्याला निरुपयोगी वाटणाऱ्या वस्तुदेखील इतक्या मौल्यवान असू शकतात.

कारच्या आणि मोबाईलच्या खराब झालेल्या बॅटरीज हे देखील धातू मिळवण्याचे एक प्रमुख साधन आहे.

कोबाल्ट हा अति मौल्यवान धातू त्यातून मिळवणे शक्य होत आहे.

अनेक कंपन्या आता रिसायकलिंग हा त्यांचा प्रमुख व्यवसाय म्हणून करू लागल्या आहेत. इतका ह्या व्यवसायात फायदा आहे.

खाणकाम करून खनिजे मिळवून त्यावर प्रक्रिया करून मिळणाऱ्या धातूंपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात आणि कमी खर्चात तसेच कमी मेहनत करून रिसायकल करून धातू मिळवता येतो हे आता सिद्ध झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर ई कचरा नष्ट होतो त्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होते.

जगभर केलेल्या सर्वेक्षणात जवळजवळ प्रत्येक घरी किमान २ ते ५ उपकरणे विनावापर पडून असतात असे आढळून आले आहे. ही सर्व उपकरणे गोळा करून त्यांचे रिसायकलिंग करायचे ठरवले तर मोठ्या प्रमाणावर धातू उपलब्ध होऊ शकतील.

तर अशा प्रकारे तुमच्या घरात, तुमच्या ड्रॅावरमध्ये पडून असणारी उपकरणे तुम्हाला भरपूर पैसा मिळवून देऊ शकतात. फक्त त्या उपकरणांना योग्य प्रकारे रिसायकल करण्याची गरज आहे.

आता ही उपकरणे रिसायकल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

तुमच्या घरातला असा इलेक्ट्रॉनिक कचरा तुम्ही विकू शकाल अशा काही वेबसाईट्स आहेत.

अमेझॉन च्या ट्रेड इन सर्व्हिस मध्ये फोन, टॅबलेट, स्पीकर्स, गेमिंग डिव्हाइसेस तुम्ही विकू शकता, Gazelle या वेबसाईटवर स्मार्टफोन, टॅबलेट, ऍपल कम्प्युटर याचा Electronics Waste तुम्ही विकू शकता. तसेच NextWorth ही वेबसाईट सुद्धा असेच काम करते.

असे रिसायकलिंग जरूर करा आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास हातभार लावून स्वतःबरोबरच इतरांचाही फायदा करून द्या.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय