फ्रीजमध्ये खाण्याचे कोणते पदार्थ किती वेळ ठेवावे?

जेव्हापासून घराघरात फ्रीज आला आहे तेव्हापासून पदार्थ त्यात ठेवून ते खूप दिवस वापरणे सुरु झाले आहे. पूर्वी लोक सगळे पदार्थ ताजे बनवत आणि लगेच संपवत असत. फ्रीजमुळे पदार्थ जास्त दिवस टिकण्याची सोय तर झाली परंतु आपण हे जाणून घेतले पाहिजे की फ्रीजमध्ये देखील पदार्थ खराब होऊ शकतात.

शिवाय फ्रीजमधून बाहेर काढल्यावर पदार्थ किती काळ टिकेल हे देखील प्रत्येक पदार्थानुसार बदलते. प्रत्येक पदार्थ किती काळ टिकेल, कधी खराब होईल ह्याचे स्वतंत्र गणित आहे आणि आपण त्यानुसारच ते पदार्थ वापरले पाहिजेत.

उगाचच टिकतील म्हणून ठेवून पदार्थ अधिक काळ वापरणे योग्य नाही. असे पदार्थ खराब होऊ शकतात आणि ते आरोग्याला घातक ठरू शकतात. खूप शिळ्या किंवा खराब झालेल्या पदार्थामुळे फूड पॉयजनिंग होऊ शकते.

आज आपण ह्या लेखात फ्रीजमध्ये कोणते पदार्थ किती काळ टिकतात ते सविस्तर जाणून घेऊया.

१. मेयोनीज

हल्ली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ आहे आणि तो म्हणजे मेयोनीज. मेयोनीज तयार करण्याकरता अनेक घटक पदार्थ वापरले जातात जे थंड वातावरणात ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे मेयोनीज हे नेहेमी फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यक असते.

१० डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात ते स्टोअर करणे आवश्यक असते. मेयोनीज फ्रीजमधून काढल्यावर सलग ८ तास जर ते १० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात राहिले तर ते खराब होऊ शकते. असे मेयोनीज वापरू नये.

२. बटर किंवा लोणी

बटर किंवा लोणी हे नेहमी थंड वातावरणातच स्टोअर केले पाहिजे. लोण्याला उष्णता, ऊन किंवा गरम वारे लागता कामा नये. तसे झाल्यास लोणी खराब होऊ शकते. ते आंबट अथवा कडू होऊ शकते किंवा त्याला खराब वास येऊ शकतो.

घरगुती बनवलेले लोणी फ्रिज मध्ये जास्तीत जास्त दोन आठवडे टिकू शकते. असे लोणी पाण्यात ठेवावे आणि दर तीन-चार दिवसांनी ते पाणी बदलावे.

बाजारात तयार मिळणारे बटर प्लास्टिक मध्ये गुंडाळून किंवा एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवल्यास ते फ्रिज मध्ये नऊ महिन्यांपर्यंत स्टोअर करता येते. असे बटर वापरण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे बाहेर काढून ठेवावे. परंतु ते अधिक काळ बाहेर ठेवून वापरणे योग्य नाही. असे बटर नेहमी फ्रीज मध्येच स्टोअर करावे.

३. दूध

दुधामध्ये बॅक्टेरियाची वाढ लवकर होते. त्यामुळे दूध तापवून ठेवणे गरजेचे असते हे आपण सगळेच जाणतो. तापवलेले दूध फ्रीजमध्ये म्हणजेच थंड वातावरणात ठेवल्यास ते अधिक काळ टिकते. परंतु असे कच्चे दूध बाहेर काढल्यानंतर एक ते दोन तासात तापवावे.

तसे न केल्यास ते खराब होते आणि त्यात बॅक्टेरियांची वाढ होते. असे दूध वापरणे पचनक्रियेसाठी अतिशय हानिकारक असते. कच्चे दूध अथवा दुधाची पिशवी फ्रीजर मध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तरी देखील पिशवीवर नोंद केलेल्या तारखे पेक्षा अधिक काळ ठेवून दूध वापरू नये.

४. शिजवलेले मांस

जर तुम्ही मांसाहार करत असाल तर हे लक्षात घेणे आवश्यक आहे की शिजवलेले मांस जास्तीत जास्त पाच दिवसांपर्यंत फ्रिजमध्ये ठेवल्यास टिकते.

त्यापेक्षा अधिक काळ ठेवून वापरल्यास ते खराब होऊ शकते. असा पदार्थ खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता बळावते. मांसाहारी पदार्थ शिजवताना हात स्वच्छ असणे अतिशय आवश्यक असते तसेच पदार्थ बनवून झाल्यावर देखील साबण आणि गरम पाण्याने हात धुऊन टाकणे आवश्यक असते. असे पदार्थ कापण्या करता आणि शिजवण्याचा करता वेगळी आणि स्वच्छ भांडी आणि चॉपिंग बोर्ड वापरावा.

५. अंडे

कच्ची अंडी ३ ते ५ आठवड्यांपर्यंत स्टोअर केली जाऊ शकतात. अंडी बाहेर देखील टिकतात. फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळपर्यंत टिकतात. अंडी वापरून केलेले पदार्थ मात्र फ्रीजमध्ये ठेवले पाहिजेत. असे पदार्थ फ्रिज मध्ये तीन ते पाच दिवस आणि फ्रीजर मध्ये एक ते दोन महिने टिकू शकतात.

फ्रिझर मधुन बाहेर काढलेले पदार्थ वापरून टाकणे अपेक्षित असते. ते पुन्हा फ्रीजर मध्ये स्टोअर करू नयेत. त्याकरता आपल्याला आवश्यक असणाऱ्या प्रमाणात छोट्या-छोट्या कंटेनरमध्ये पदार्थ स्टोअर करणे जास्त उपयोगी ठरते.

६. फळे आणि भाज्या

फळे आणि भाज्यांचा टिकण्याचा आणि खराब होऊ लागण्याचा काळ वेगवेगळा असतो. काही विविक्षित फळे आणि पालेभाज्या लवकर खराब होतात. जर फळांमधून खराब वास येऊ लागला तर अशी फळे वापरू नयेत.

बाजारातून आणल्यानंतर फळे आणि भाज्या साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन संपूर्ण कोरडे करून मग फ्रीज मध्ये स्टोअर करावेत. असे करण्यामुळे फळे आणि भाज्या जास्त दिवस टिकतात.

फ्रीजमध्ये स्टोअर करताना फळे आणि भाज्या मांसाहारी पदार्थ जसे की चिकन, मासे यांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्यावी. दोन्ही प्रकारचे पदार्थ स्टोअर करण्याकरता फ्रिजमध्ये वेगवेगळे कप्पे असावेत. अन्यथा मांसाहारी पदार्थांमुळे फळे आणि भाज्या खराब होऊ शकतात.

७. हवाबंद डब्यात मिळणारे पदार्थ

हवाबंद डब्यात मिळणारे पदार्थ एकदा डबा उघडला की संपवणे अपेक्षित असते. असे पदार्थ पुन्हा पुन्हा अधिक काळपर्यंत वापरणे घातक ठरू शकते. या पदार्थांमध्ये बॅक्टेरियाची वाढ लवकर होते. त्यामुळे असे पदार्थ पुन्हा हवाबंद डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवावेत तरच ते काही काळ वापरता येऊ शकतात. अशा डब्यांवर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. म्हणजे पदार्थ खराब होणार नाही आणि त्यांचा स्वादही टिकून राहील.

८. पॅकेज्ड फूड

वेफर्स, बिस्किटे, केक यांसारखे बाजारात तयार मिळणारे पॅकेज्ड फूड एकदा उघडल्यानंतर तसेच उघडे ठेवू नये. पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. असे पदार्थ एअर टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवावेत. त्यामुळे ते पदार्थ अधिक काळ टिकतात आणि त्यांचा स्वादही चांगला राहतो. तसेच ते मऊ पडण्याचा किंवा खराब होण्याचा धोका उरत नाही.

तर ही आहे कोणते पदार्थ किती टिकतात आणि कसे स्टोअर करावे याची माहिती. या माहितीचा वापर करून आपल्या घरातील पदार्थ योग्यरीतीने स्टोअर करा आणि त्यांचा वापर करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय