विखारी माणसांपासून दूर राहा, या 11 प्रकारच्या लोकांपासून अंतर ठेवा

तुमचं आयुष्य आधीच ताण तणाव, आणि वेगवेगळ्या त्रासांनी भरगच्च आहे, त्यात काही विखार मनोवृत्तीच्या व्यक्ती तुम्हांला भेटल्या तर त्यांच्या नकारात्मकतेचा खोल परिणाम तुमच्या मनावर होऊ शकतो.

नकारात्मक, विखारी वृत्तीच्या लोकांना हाताळताना तुमची बरीच एनर्जी वाया जाते.

एका संशोधनात असं सिद्ध झालयं की अशा लोकांमुळे तुमच्या मेंदूवर गंभीर परिणाम होतात.

त्यामुळे भांडण तंटा वाढवणा-या, छळ करण्याच्या प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या आयुष्यातून लगेचच हद्दपार करा.

तुमच्या आयुष्यात तुमचं प्रचंड नुकसान करणा-या “या अकरा प्रकारच्या” लोकांना कायम दूर ठेवा.

1) वेळ वाया घालवणा-या व्यक्ती

आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात की ज्यांना स्वतःला आयुष्यात काहीही ध्येय नसतं.

अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ रिकामटेकडेपणा करण्यासाठी अक्षरशः शोषून घेतात.

“टाईम इज मनी” असं म्हटलं जात. जे खरंच आहे. वेळ अमुल्य आहे तो परत मिळवता येत नाही.

त्यामुळे अशा टाईमपास करणाऱ्या लोकांपासून आपला वेळ, आपली एनर्जी वाचवण्यासाठी अशा लोकांना नेहमीच आपल्यापासून दूर ठेवा.

2) काही माहिती नसतांना जजमेंटल होऊन इतरांवर ताशेरे ओढणारे लोक

अर्धवट माहितीच्या आधारे इतरांवर मतं व्यक्त करणाऱ्या लोकांनी तर जग भरुन गेलं आहे.

या अशा व्यक्ती असतात ज्या वेळ-काळ सिच्युएशन काहीही न बघता केवळ समीक्षकाच्या भुमिकेत वावरत असतात.

अशा व्यक्ती ऑफिस किंवा घरगुती समारंभामध्ये तुम्हाला भेटल्या तर तुमच्या लाइफस्टाइलवरती तुमच्या ड्रेसवरती तुमचा कामावरती सतत ताशेरे ओढत राहतील.

अशा व्यक्तींचं बोलणं मनाला लावून स्वतःला कधीही कमी लेखू नका, तर अशा व्यक्तींना तुमच्या आयुष्यात योग्य अंतरावर ठेवा.

3) सतत नकारात्मक विचार करणारी व्यक्ती.

आयुष्यातल्या अडचणींचा काळ हा एक लवकरच संपणारा काळ आहे हे लक्षात ठेवा. आणि कोणत्याही परिस्थितीचा ताण घेऊ नका.

मात्र अशा काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतात की ज्या प्रत्येक अडचणीचा भविष्यामध्ये विचार करताना निगेटिव्ह पद्धतीनेच विचार करतात

आणि या अडचणींना कल्पनेत डोंगराएव्हढ्या करुन ठेवून तुमच्या मनावरचा ताण वाढवतात.

भर रस्त्यावर, सगळं हाकेच्या अंतरावर असताना साधी गाडी सुरू झाली नाही तरी अशा व्यक्ती त्याचे इतके भयंकर परिणाम तुम्हांला सांगतात की जवळच असणाऱ्या मेकॅनिक कडून गाडी दुरुस्त करून घेण्याची सोपी शक्यता तुम्ही विसरून जाता, आणि टेन्शन मध्ये बीपी वाढवून घेता.

अशा व्यक्ती स्वतःतर निराशेच्या गर्तेत जातीलच पण तुम्हाला सुद्धा निराश आणि उदास करतील.

अशा व्यक्तींना योग्य त्या वेळी योग्य तितके दूरच ठेवा.

4) गर्विष्ठपणा

आत्मविश्वास अशी चीज आहे जी तुम्हाला तुमच्या क्षमतांवर कौशल्यांवर विश्वास ठेवायला भाग पाडते.

मात्र या आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाच़ं रूपांतर अहंकारात होतं, तेव्हा त्याच्यातला गर्विष्ठपणा वाढतो.

अहंकारी, नको त्या गोष्टीचा गर्व बाळगणाऱ्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा मान, वय ,पद याचा विचार न करता आपल्या अहंकारातच मग्न होऊन अतिशय वाईट वर्तन करतात.

अशा व्यक्तींबरोबर काम करण्याची वेळ आली तर त्यांचा अहंकार सुखावण्यासाठी तुम्ही कधीही झुकू नका, मनाविरुद्ध वागू नका.

या व्यक्तींपासून दूर कसं राहता येईल याचा मात्र विचार करा.

5) मत्सरी व्यक्ती

आयुष्यात तुम्ही कितीही छोटं किंवा कितीही मोठं काम करत असाल तरी तुमच्या बाजूला तुमच्या कामाचं कौतुक करणारे, पाठ थोपटणारे आणि धीर देणारे लोक असावेत.

जर तुमच्या आजूबाजूला मत्सरी लोक असतील जे तुमच्या कामावर खूश न होता मत्सराने जळत राहतात तर, अशा लोकांना वेळीच आपल्यापासून दूर करा.

6) स्वतःला पीडित मानणारी व्यक्ती

आजच्या जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना टीम वर्क खूप महत्त्वाचं असतं.

अशा टीम मध्ये एखादी व्यक्ती अशी असते की जी स्वतःच्या चुकांचं खापर तुमच्यावर फोडत असते सतत तुमचे दोष दाखवत असते, आणि मी किती बिचारा किंवा बिचारी आहे असं तुम्हाला भासवत असते, तर अशा माणसांना तातडीने आपल्या परिघाच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करा.

7) खोटं बोलणारी माणसं

काही माणसांचा स्वभावच असा असतो की त्या छोट्या-छोट्या गोष्टीत सुद्धा थापा मारत असतात, किंवा खोटे बोलत असतात.

स्वतःची चांगली इमेज जपणं हे त्यामागचं खरं कारण असू शकतं.

पण खोटं बोलण्याची ही वृत्ती मुळातच अतिशय वाईट

जरी कुणाचं नुकसान होत नसलं तरी सातत्यानं खोटं बोलणारी माणसं लबाड असतात. त्यामुळे त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करा.

8) शोषण करू देऊ नका

जगात अनेक प्रकारची माणसं असतात त्यामध्ये काही माणसं सतत हुकुम देऊन समोरच्या व्यक्तीकडून आपली कामं करून घेतात.

अशी माणसं शुगर कोटेड कॅप्सूल सारखी असतात.

वरून मैत्रीचा मुखवटा धारण करतात आणि मनात मात्र समोरच्या व्यक्तीला कसं राबवायचं याचा विचार करतात.

त्याच्यासाठी त्यांच सतत नियोजनही सुरू असतं

अशा व्यक्तींपासून नेहमी सावध रहा. स्वतःला बळीचा बकरा होऊ देऊ नका.

9) तणावग्रस्त व्यक्ती

आपल्याला आयुष्या मध्ये एखादं ध्येय गाठण्यासाठी, झपाटून काम करण्यासाठी किंचित ताण आवश्यक आहेच

मात्र या ताणाचा अतिरेक झाला तर सगळी एनर्जी कमी होते आणि समस्यांचा झिम्मा सुरू होतो.

आपणही आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती बघतो ज्या उगीच ताण ओढवून घेतात आणि त्याच्या ओझ्याखाली दबून जातात.

तर अशा व्यक्तींपासून सुरक्षीत अंतर राखा.

10) सतत गॉसिप करणाऱ्या व्यक्ती

एक गोष्ट तुम्ही नक्की नोट केलेली असेल. आम्ही गॉसिप करणाऱ्या व्यक्ती असं म्हंटलं गॉसिप करणाऱ्या महिला असं म्हटलं नाही.

बहुधा लोकांची अशी एक ठाम समजूत आसते की फक्त महिलाच गॉसिपिंग करतात

पण अनेक पुरुष सुद्धा गॉसिप करतात.

पण मग अशा गोष्टींमध्ये स्वतःचा आणि तुमचा ही वेळ वाया घालणारी व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष तिच्यापासून दूर राहणं तुमच्या साठी केव्हाही शहाणपणाचंच ठरेल.

11) शीघ्रकोपी व्यक्ती

ज्यांना अगदी लहान-सहान गोष्टी मध्ये पटकन राग येतो अशा व्यक्ती म्हणजे शीघ्रकोपी व्यक्ती.

या व्यक्ती कार्यक्रमात असल्या तर त्या कार्यक्रमात विचका ठरलेलाच असतो.

या व्यक्ती जिथं असतात तिथलं घरातलं ऑफिसमधलं वातावरण नेहमी तंग असतं.

वातावरणामध्ये एकदम विचित्र तणाव असतो.

अशा व्यक्ती खरं तर कोणालाही आवडत नाहीत.

पण त्यांचं आजूबाजूला असणं तुमच्या कामावरती प्रभाव पाडू शकतं.

तुमच्या कामाचा आनंद हिरावून घेऊ शकतं.

त्यामुळे अशा लोकांना वेळच्यावेळी Bye Bye करा.

तर फ्रेंडस, तुमची उगाचच चिडचिड होत असेल, कामं रेंगाळत असतील, तर जरा थांबा. आपल्या आजूबाजूच्या माणसांकडं लक्ष द्या.

तुमच्या आजूबाजूला तुमच्या कामा वर प्रभाव टाकणारी माणसं असतात आणि हा प्रभाव नकारात्मक असेल तर अशा माणसांपासून तुम्ही वेळीच सावध व्हा.

दुसऱ्या व्यक्तींची नकारात्मकता आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडते, आणि म्हणूनच अशा अकरा प्रकारचे स्वभाव तुमच्या लक्षात आले तर त्या व्यक्तींपासून दूर राहणं फायद्याचं ठरेल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “विखारी माणसांपासून दूर राहा, या 11 प्रकारच्या लोकांपासून अंतर ठेवा”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय