मागील आर्थिक वर्षाचा शोधबोध: (Financial Year 2018)

financial year 2018

अलीकडेच २०१७/१८ हे आर्थिक वर्ष (Financial Year 2018) संपले. समभाग, म्यूचुयल फंड यांत गुंतवणूकदारांच्या दृष्टीने त्या आधिच्या तुलनेत भरघोस वाढ झाली. निर्देशांकाने याच वर्षात आपली सर्वोच्च पातळी ओलांडून नवीन विक्रम प्रस्थापित केला तर ११ वर्षांनंतर पुन्हा दीर्घकालीन नफा काही अटींसह लागू करण्याचे योजल्याने त्यावरील टोकाची प्रतिक्रिया व्यक्त होवून निर्देशांक वाढिला लगाम बसला. यामुळे अनेकांचे नुकसान झाले. यातून पैशांचे व्यवस्थापन करण्याच्या संदर्भात अनेक गोष्टी शिकता येवू शकतील त्यातील काही गोष्टींचा शोध आणि त्यातून झालेला बोध.

वर्षभरात प्रभाव पडणारे महत्वाचे घटक :

  • आभासी चलनाचे मृगजळ : बीटकॉइन या आभासी चलनात झालेल्या वाढीमुळे अनेक गुंतवणुकदार त्याकडे आकर्षीत झाले. या चलनास सरकारकडून वैधता नसल्याचे वेळोवेळी जाहीर केले गेले. या कालखंडात १००० अमेरिकन डॉलर्सचे आसपास असलेला बीटकॉइनचा भाव अल्पावधीतच २०००० डॉलर्सवर गेला अनेक गुंतवणूकदार सट्टेबाजाप्रमाणे गुंतवणूक वाढवत गेले आणि अचानक त्याचा भाव ८००० वर आला यात लोकांचे प्रचंड नुकसान झाले आणि आपण नुकसान सोसू शकू एवढीच गुंतवणूक केली पाहिजे हा धडा मिळाला ते यातून नक्कीच शिकले असावेत.
  • चिकाटीचा अभाव : एका अंदाजानुसार जीवनविम्याच्या काढलेल्या पॉलीसीपैकी ३३% पॉलिसी या बंद केल्या जातात. अनावश्यक पॉलिसीची खरेदी आणि मुदतीच्या पूर्वी वीमोचन यामुळे आपण स्वतःबरोबर आपल्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करीत आहोत असे वाटत नाही का?
  • अनुचित प्रथांना विरोध : नियोजित FRDI Bill मधील अयोग्य तरतूदी आणि वाढीव बँकींग चार्जेस यांना सर्वांनी तीव्र विरोध केला. यासाठी सोशल मिडीयाचा वापर केला गेला मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्याने या गोष्टी स्थगित झाल्या.
  • अल्पबचतीवरील व्याजदराचा नीचांक : दर तिमाहीत बदलत असलेले अल्पबचतीवरील व्याजदर यावर्षात नीचांकी पातळीवर आले. फक्त यावर आपण अवलंबून राहू शकत नाही याची सर्वाना जाणीव झाली असावी.
  • कर्जावरील किमान व्याजदर : या कालखंडांत किमान व्याजदराने कर्ज उपलब्ध झाल्याने कर्जदारांच्या दृष्टीने हा सुवर्णकाळ म्हणता येईल. तर बुडीत कर्जे आणि मोठ्या प्रमाणात कर्ज घेवून पसार झालेले कर्जदार यामुळे यंत्रणेतील दोष उघडकीस आले आणि आंतरराष्टीय पातळीवर आपणास मान खाली घालावी लागली.
  • क्रेडिट स्कोरचे महत्व : कर्ज घेण्यास उत्सुक प्रत्येकाचे मूल्यमापन सीबिल मार्फत केले जाते. आपल्या सर्व व्यवहारांचा मागोवा घेवून त्याप्रमाणे आपले मूल्यांकन ३०० ते ९०० अंकात केले जाते. ज्यांचे गुण ७५० हून अधिक असतात त्यांना बँक सहज कर्ज देतात. इतके दिवस आपले सिबील रेटिंग जाणून घेण्यास पैसे द्यावे लागत होते. यावर्षीपासून ते आपणास विनामूल्य अन्य मार्गाने जाणून घेता येत असल्याने कर्ज घेणार नसाल तरी आपला क्रेडिट स्कोर जाणून घ्यावा. जर आपली त्यावर हरकत असेल तर योग्य ते पुरावे देवून तो दुरुस्त करता येईल आणि भविष्यात सुलभतेने कर्ज मागणी करता येईल. (CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी काय केले पाहिजे?)
  • मेडिक्लेमचे महत्व : अलीकडील काळात वैद्यकीय खर्चात झालेली प्रचंड वाढीमुळे एखादा गंभीर आजार आपले आर्थिक गणित बिघडवू शकतो, आरोग्य विमा असेल तर थोडा दिलासा मिळतो. आगामी अर्थसंकल्पात यावर वाढीव सूट देण्यात आली आहे.
  • पोर्टफोलीओच्या जोखीम व्यवस्थापनाची गरज : गेल्या वर्षभरात मिड /स्मॉलकेप शेअर मधे ४० ते ५०% वाढ अल्पावधीत झाली त्याबरोबर वर्षअखेरीस त्यात तीव्र घट झाली. अशी स्थिती लार्ज / डिवेर्सिफाइड केपमध्ये दिसली नाही. एक समतोल पोर्टफोलीओच्या जोखीम व्यवस्थापनासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज /डिवेर्सिफाइड केप शेअर्सची आवश्यकता असणे गरजेचे आहे हे या निमीत्ताने अधोरेखित झाले.

वाचण्यासारखे आणखी काही…..

शेअरबाजार- आक्षेप आणि गैरसमज
तूच आहेस तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार!
पैशाचा उड्डाणपूल बांधूया

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!