शैक्षणिक कर्ज (Education Loan) बद्दल पूर्ण माहिती वाचा या लेखात

Education Loan

Education Loan बद्दल महत्वाचे मुद्दे…

१) Education Loan चा अर्ज देणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे.

२) भारतात Education Loan सामान्यतः उच्च शिक्षणासाठी १० लाख आणि विदेशात शिक्षण घेण्यासाठी २० लाख दिले जाते.

३) भारतात Education Loan चे व्याजदर (Interest Rate) वेगवेगळया बँकांमध्ये ९.३०% ते १३% या दरम्यान आहेत.

४) Education Loan वर Income Tax च्या कलम 80 E नुसार सूट मिळते.

भारतात शिक्षणाचा अधिकार (Right to Education) लागू झाल्यापासून पाल्य आणि पालक चांगले शिक्षण घेण्यासाठी शक्य असलेले सगळे प्रयत्न करतात.

गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शिक्षणाची अनेक दालने खुली झाली आहेत. आणि पर्यायाने शिक्षणासाठी लागणारा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाऊन पोहोचला.

यासाठी बरेच लोक Mutual Fund, Fixed Deposit, Real Eastate यामध्ये गुंतवणूक करून शिक्षणासाठी तजवीज करून ठेवतात.

तरीही बऱ्याच लोकांसाठी इतके महाग झालेले शिक्षण घेणे कठीण होऊन बसते.

यासाठी भारतातील बँक Education Loan म्हणजेच शैक्षणिक कर्ज पुरवतात. प्रवेश घेतांना कधीही आपण मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेत आहोत का याची खात्री करून घ्यावी.

कारण संस्था मान्यताप्राप्त नसल्यास अर्ज नामंजूर होऊ शकतो. या लेखात आपण Education Loan बद्दल पूर्ण माहिती घेऊ.

Education Loan साठीची पात्रता…

  • उच्च शिक्षणासाठी इच्छुक असलेला कोणीही भारतीय नागरिक (वय १८ पेक्षा अधिक) शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतो/शकते. आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी हे सह अर्जदार राहू शकतात.
  • साधारणतः ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला आहे त्यांचा अर्ज शैक्षणिक कर्जासाठी विचारात घेतला जातो.
  • कर्ज देण्याआधी बँक guarantor घेते. हे guarantor पालक किंवा नातेवाईक असू शकतात.

Type of courses

भारतात किंवा भारताबाहेर उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळते. यात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण, PHD, Engineering, Medical, dental, Management, Information Technology इत्यादी शिक्षणाचा समावेश होतो.

याशिवाय इतर मान्यताप्राप्त संस्थांमधील कोर्ससाठीही कर्ज मिळू शकते.

शिक्षणातल्या कुठल्या खर्चासाठी Education Loan मिळते?

शैक्षणिक संस्थांकडून आकारली जाणारी Tution fee, Hostel Fee, Exam, Library, Uniform इत्यादी फी यामध्ये अंतर्भूत असते.

याशिवाय पुस्तके, Equipement तसेच प्रोजेक्ट साथीचे खर्च भागविण्यासाठीही हे हे कर्ज वापरता येते. विदेशातील शिक्षणासाठी स्टडी टुर, थिसिस यांचा खर्च याचाही अंतर्भाव होतो.

विविध बँकांनुसार हे नियम काही प्रमाणात बदलू शकतात.

Education Loan मध्ये किती रक्कम मिळू शकते?

आजकाल बऱ्याच बँका शैक्षणिक खर्चाच्या 100% पर्यंत कर्ज देऊ शकतात. हे लोन ४ लाखापर्यंत सहजरित्या मिळू शकते.

यापेक्षा जास्त खर्च अपेक्षीत असल्यास अर्जदाराला भारतातील शिक्षणासाठी ५% आणि विदेशातील शिक्षणासाठी १५% रकमेची तजवीज स्वतः करावी लागते.

आवश्यक असलेली कागदपत्रे (Documents Required for Education Loan)

शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पुढे दिलेली आहेत.

  • प्रवेश मिळाल्याचे प्रमाणपत्र
  • त्या कोर्सचे भविष्यातील फायदे सांगणारे पत्र
  • बँकेचा अर्ज
  • Guarantor चे Income Proof
  • विदेशात जात असल्यास युनिव्हर्सिटीचे पत्र
  • विदेशात जात असल्यास Visa संबंधित कागदपत्रे.
  • आवश्यक फोटोग्राफ
  • ID Proof, Address Proof.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • काही scholarship मिळाली असल्यास त्याची माहिती.

तसेच बँकांकडून दिली जाणारी सूट आपण स्वतः माहीत करून घ्यावी. काही बँका मुलींच्या अर्जावर प्रिपेमेंट चार्जेस मध्ये सूट देतात.

Bank Security…

  • 1) ४ लाखपर्यंतचे कर्ज विध्यार्थी आणि सहकर्जदार पालक असे सहज मिळू शकते.
  • 2) ४ ते ६.३० लाखपर्यंतचे कर्ज guarantor ठेऊन मिळू शकते.
  • 3) ६.३० लाखपर्यंतचे कर्ज घेण्यासाठी LIC bond/ fixed Deposit किंवा एखादी प्रॉपर्टी बँक सिक्युरिटी म्हणून घेतली जाऊ शकते.

Repayment Of Loan

Education Loan मध्ये शिक्षण संपेपर्यंत किंवा नोकरी लागल्या नन्तर सहा महिन्यांपर्यंतचा वेळ कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी मिळू शकतो ही यातील एक जमेची बाजू आहे.

ही सगळी माहिती वाचून आपणही उच्च शिक्षण किंवा विदेशातील शिक्षण आपल्या मुलांना देऊ शकू असा विश्वास मध्यमवर्गीय पालकांना नक्कीच मिळेल…….

परीक्षांचा कालावधी जवळ येतोय. बारावी झाली कि उच्च शिक्षणासाठी तयारी सुरु होते. शिक्षण म्हंटल कि पैसा आला. टीम मनाचेTalks कडून सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना हवे असलेले शिक्षण घेऊन पुढील आयुष्यात भरारी मारण्यासाठी शुभेच्छा.

वाचण्यासारखे आणखी काही…..

गृहखरेदी करण्याआधी माहित असू द्या गृहकर्जाबद्दलचे गैरसमज…. भाग-२
Home Loan साठीचे आवश्यक दस्तऐवज
प्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७
गृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा!!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

21 Responses

  1. Ravindra meshram says:

    Ashikshana karina loan have

    • आनंद राखोंडे says:

      मी 12 उत्तीर्ण असून मला पुढील शिक्षनासाठी म्हणजे बीकॉम साठी लोन पाहिजे होत

      • यासाठी लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे बँकमध्ये चौकशी करावी. हा लेख फक्त लोकांच्या माहितीसाठी दिलेला आहे. कर्ज देण्याचा याशी काहीही संबंध नाही. ती चौकशी बँकमध्ये करावी.
        धन्यवाद.

  2. Pradip Lande says:

    माझ्या मुलीला MBBS करिता 19-20हया शैक्षणिक सत्र मध्ये प्रवेश घ्यायचा आहे .कॉलेज ची फी दरवर्षी 16 लाख पर्यंत आहे.तरी शैक्षणिक कर्जाबाबत मार्गदर्शन करावे.

  3. Dhiraj ganesh patil says:

    Education for BCA

  4. khushali varankar says:

    how much percentage is required…..?

  5. Pradeep Shinde says:

    अशा प्रकारचे loan कुठल्या बँका देऊ शकतात.

  6. Ashok bhalerao says:

    Sir mi b. A first year la aahe mala
    UPSC dyayachi aahe karj milel का

    • यासाठी लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे बँकमध्ये चौकशी करावी. हा लेख फक्त लोकांच्या माहितीसाठी दिलेला आहे. कर्ज देण्याचा याशी काहीही संबंध नाही. ती चौकशी बँकमध्ये करावी.
      धन्यवाद.

  7. Zite pravin vijay says:

    Sir mala engineering sathi loan ghaycha ahe education loan sathi kiti waj ahe Ani te waj lagcha chalu hote apala job laghayvar please saga

    • यासाठी लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे बँकमध्ये चौकशी करावी. हा लेख फक्त लोकांच्या माहितीसाठी दिलेला आहे. कर्ज देण्याचा याशी काहीही संबंध नाही. ती चौकशी बँकमध्ये करावी.
      धन्यवाद.

  8. Ram mugutrao says:

    माझी मुलगी B Farmacy Second year ला आहे studant loan ची online प्रक्रिया पुर्ण करुन SBI बँकेत submeet केले आहे परंतु Bank lone देण्यास टाळाटाळ करत आहे ईतर Bank मधुन शैक्षणिक लोनला Apply करू शकतो का.

    • यासाठी लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे बँकमध्ये चौकशी करावी. हा लेख फक्त लोकांच्या माहितीसाठी दिलेला आहे. कर्ज देण्याचा याशी काहीही संबंध नाही. ती चौकशी बँकमध्ये करावी.
      धन्यवाद.

  9. Raviraj says:

    Plz help me

    • यासाठी लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे बँकमध्ये चौकशी करावी. हा लेख फक्त लोकांच्या माहितीसाठी दिलेला आहे. कर्ज देण्याचा याशी काहीही संबंध नाही. ती चौकशी बँकमध्ये करावी.
      धन्यवाद.

  10. Sneha says:

    Mala maza mulaga sahavi nanatar bording school la apply karayche aahe tar edu. Lone bhetel kay

  11. Annasaheb Ghodake says:

    Mala hotel management karayachi ahe loan milel ka?
    State bank of Maharashtra loan dete ka

  12. College ki Development fees bank q nahi deti

  13. sir papa cha civil score check kela jato kaa

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!