महाराष्ट्र शासनाची “लेक माझी भाग्यश्री – सुधारीत योजना “

ता.क.-हि राजकारणाने प्रेरित होऊन केलेली पोस्ट नाही. वाचक माहितीसाठी हे वाचू शकता.

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींचे शिक्षण व आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारी ” माझी कन्या भाग्यश्री योजना” १ ऑगस्ट २०१७ पासून सुधारीत स्वरूपात राबविण्यात येणार आहे. आता वार्षिक उत्पन्न साडेसात लाखांपर्यंत असणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

save-girl-child

राज्यात १ एप्रिल २०१६ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. तिचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील तसेच वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असणारी कुटुंबे पात्र ठरविण्यात येत होती. सुधारीत योजना मात्र साडेसात लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व घटकातील कुटुंबांना लागू असणार आहे. या योजनेअंतर्गत एका मुलीनंतर माता किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर सरकारकडून मुलीच्या नवे ५० हजार तर दोन मुलींनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नवे प्रत्येकी २५००० रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येईल. या ठेवीवरील व्याज मुलीच्या वयाच्या सहाव्या आणि बाराव्या वर्षी काढता येईल. तसेच मुद्दल आणि व्याज दोन्ही रक्कम वयाच्या १८ व्य वर्षी काढता येईल. माता किंवा पिता यांनी कुटुंबनियिजन शस्त्रक्रिया केल्यानंतरच ठेवीची रक्कम मुलीच्या नावावर जमा करण्यात येईल. जमा रकमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असणारी व्याजाची रक्कम तिला प्राप्त होऊ शकेल.

कुटुंबात पहिले व दुसरे अपत्य मुलगी असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल मात्र दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्यास त्या या योजनेस पात्र असतील. बालगृहातील अनाथ मुलींसाठीही ही योजना लागू असेल.एक मुलीच्या जन्मांनंतर एक वर्षाच्या आत तर दोन मुलींच्या जन्मांनंतर सहा महिन्याच्या आत माता किंवा पिता यांनी कुटुंबनियिजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांनाच या यिजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावर महिला व बालविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणूसमिती स्थापन करण्यात येणार आहे.

योजनेबद्दल महाराष्ट्र शासन निर्णयाचे सूचनापत्र

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप किंवाटेलिग्रामवर मिळवण्यासाठी८३०८२४७४८०या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप / टेलिग्राम मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

17 thoughts on “महाराष्ट्र शासनाची “लेक माझी भाग्यश्री – सुधारीत योजना “”

  1. मला सुद्धा दोन मुली आहेत आणि माझ्या पत्नीची सुध्दा शस्त्रक्रिया झाली आहे तरी मला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल

    Reply
  2. मला पण दोन मुली आहेत पण योजनेची पुणॅ माहीती कोठ मिळेल ?

    Reply
  3. मला पहिल्याच प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली आहेत त्या साडेचार वर्षाच्या आहेत,,तर त्या लाभ घेण्यासाठी प्रकार 1 मध्ये येतील की प्रकार 2 मध्ये.

    Reply
  4. मला सुद्धा दोन मुली आहेत 1 मुलगी10 वारशाची आहे आणि 2 सरी मुलगी आता 4वारशाची आहे तर दुसरी मुलग 29 जून 2017 ला जन्म झाली आहे मुलीच्या आईच ऑपरेशन झाल आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये तर मला या योजनेचा लाभ घेता येईल का प्लिज

    Reply
  5. मला सुद्धा दोन मुली आहेत एक मुलगी दहा वारशाची आहे आणि दुसरी मुलगी चार वारशाची आहे दुसऱ्या मुळीच जन्म 29 जून 2017 साली झाल आहे मुलीच्या आईच त्याच वेळी ऑपरेशन झाल आहे तरी मला ह्या योजनेच लाभ घेता येईल का

    Reply
  6. मला सुद्धा दोन मुली आहेत एक मुलगी दहा वारशाची आहे आणि दुसरी मुलगी चार वर्षे दुसऱ्या मुळीच जन्म 29 जून 2017 साली झाल आहे तरी मला या योजनेचा लाभ घेता येईल का

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय