जगातील अशी दहा ठिकाणे जिथे स्थायिक होण्यासाठी मिळते जमीन आणि लाखो रुपयांची संपत्ती

जगातील अशी दहा ठिकाणे जिथे स्थायिक होण्यासाठी मिळते जमीन आणि लाखो रुपयांची संपत्ती

लेखाच्या शीर्षकावर विश्वास बसत नाहीये ना? असे कसे होऊ शकते की आपला देश सोडून दुसरीकडे जाऊन राहण्यासाठी कोणी आपल्याला राहायला जागा तर देईलच शिवाय लाखो रुपयांची संपत्ती देऊ करेल?

परंतु हे सत्य आहे. जगाच्या पाठीवर अशी दहा ठिकाणे आहेत जिथे स्थायिक होण्यासाठी तिथल्या सरकारकडून लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात आणि घसघशीत आर्थिक मदतही केली जाते.

चला तर मग, आपण या ठिकाणांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि शक्य असेल तर तिथे स्थायिक देखील होऊया.

तुमच्या मनात असा प्रश्न नक्की आला असेल की हे कसे शक्य आहे? परंतु जगातील काही देशांची लोकसंख्या इतकी कमी आहे की तेथील लोकसंख्या वाढवण्यासाठी आणि तेथील उद्योगधंद्यांना चालना मिळवून देण्यासाठी अशा देशांचे सरकार लोकांना सर्वतोपरी सुविधा पुरवण्यास आणि आर्थिक रक्कम देण्यास देखील तयार आहे. पाहुयात कोणकोणती ठिकाणे आहेत ही –

१. अलास्का (अमेरिका)

जर तुम्हाला बर्फाळ प्रदेश, थंडी आणि संथ गतीचे जीवन आवडत असेल तर अमेरिकेतील अलास्का हा प्रांत तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. अलास्का या प्रांताची घटणारी लोकसंख्या पाहता तेथील सरकार अलास्कामध्ये कमीत कमी एक वर्ष राहण्यासाठी सरासरी रुपये १.५ लाख इतकी रक्कम देऊ करते. अतिशय ताजी आणि स्वच्छ हवा, उत्तम हवामान असणारा हा प्रदेश तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जोरावर तेथील नागरिकांना असे पैसे देऊ करतो.

२. वरमॉन्ट (अमेरिका)

वरमॉन्ट हे अमेरिकेतील एक पहाडी राज्य आहे. या राज्यातील चेडार चीज आणि बेन अँड जेरीज आईस्क्रीम अतिशय प्रसिद्ध आहे. अतिशय उत्तम हवामान असणारे हे एक निसर्गरम्य ठिकाण असून खरेतर पर्यटनाच्यादृष्टीने अतिशय छान आहे. परंतु दुर्दैवाने येथील लोकसंख्या केवळ ६,२०,००० इतकीच असून ती दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे येथील सरकार लोकांना येथे स्थायिक होण्यासाठी आमंत्रित करत असून सर्व सुखसोयींबरोबरच किमान दोन वर्षे राहण्यासाठी सरकार नागरिकांना रु. ७.४ लाख देण्यास तयार आहे. तुम्ही इतर कोणत्याही देशात नोकरी करत असाल तर इथे राहून वर्क फ्रॉम होम करण्यासाठी देखील येथील सरकार प्रोत्साहन देते.

३. पोंगा (स्पेन)

स्पेनमधील पोंगा या छोट्याशा गावात केवळ एक हजार लोक राहतात. या गावाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी येथील सरकार तरुण नागरिकांना येथे स्थायिक होण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. या गावात येऊन स्थायिक होणाऱ्या प्रत्येक जोडप्याला ३००० युरो म्हणजेच जवळजवळ रु. १.५ लाख इतकी रक्कम देण्यास स्थानिक प्रशासन तयार आहे. त्याचप्रमाणे या गावात जन्म घेणाऱ्या प्रत्येक बालकाला रु. १.५ लाख इतकी रक्कम पोंगा सरकार कडून मिळेल.

४. अल्बिनेन (स्वित्झर्लंड)

स्वित्झर्लँड या अतिशय सुंदर असणाऱ्या देशातील अल्बिनेन हे एक निसर्गरम्य गाव आहे. येथील लोकसंख्या कमी असल्यामुळे येथील सरकार ४५ वर्ष वयापेक्षा कमी नागरिकांना येथे स्थायिक होण्यासाठी रुपये २० लाख इतकी रक्कम देण्यास तयार आहे. येथे स्थायिक होणाऱ्या जोडप्याला रुपये ४० लाख तर त्यांच्या मुलांना प्रत्येकी रुपये ८ लाख इतकी रक्कम मिळू शकेल. परंतु यासाठी तेथे किमान दहा वर्षे स्थायिक होणे आवश्यक आहे.

५. डब्लिन (आयर्लंड)

डब्लिन हे शहर स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी अतिशय योग्य आहे. वेगवेगळ्या स्टार्टअप बिजनेससाठी येथील सरकार भरपूर प्रमाणात फंडिंग करून आर्थिक मदत करते.

नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देणारे असे येथील सरकार वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर आयोजित करते. स्टार्टअप बिझनेस करणाऱ्या उद्योजकांना स्थायिक होण्यासाठी हे अगदी आदर्श शहर आहे.

६. सॅन्टियागो (चिली)

चिली या देशाची राजधानी असणाऱ्या सॅन्टियागो या शहरात २०१० मध्ये एक स्टार्ट अप प्रोग्रॅम घेतला गेला. या प्रोग्रॅम अंतर्गत ३ वर्षे काम करण्यासाठी रुपये ३७ लाख इतकी सबसिडी देण्यात आली.

त्याच प्रमाणे एक वर्षाचा वर्क व्हिसा, राहण्यासाठी जागा आणि संपर्काची अनेक साधने उपलब्ध करून दिली जातात. म्हणजेच चांगल्या स्टार्टअप योजनेसाठी सॅन्टियागो शहरात राहणे अगदी फायदेशीर ठरू शकेल.

७. कॅन्डेला (इटली)

इटलीतील एक छोटेसे गाव कॅन्डेला. यांची लोकसंख्या केवळ २७०० इतकी आहे. आपल्या गावाची लोकसंख्या वाढावी म्हणून येथील स्थानिक प्रशासन लोकांना येथे स्थायिक होण्यासाठी आवाहन करत आहे.

एकटे राहणाऱ्या लोकांसाठी रु. ६८०००/- जोडप्यासाठी रु. १ लाख तर तीन लोकांच्या कुटुंबासाठी रु. १.५ लाख इतकी रक्कम हे प्रशासन देऊ करते.

या गावात जास्तीत जास्त लोक स्थायिक होऊन तेथील अर्थव्यवस्था सुधारावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

८. मॉरिशस

विविध टेक्नॉलॉजी, बिझनेस मॉडेल्स, फायनान्स आणि अन्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी मॉरीशस हे बेट नेहमी आमंत्रण देत असते.

तेथील सरकारकडे चांगल्या बिजनेस स्टार्ट अप आयडिया घेऊन गेल्यास तो बिझनेस सुरु करण्यासाठी सर्व प्रकारची आर्थिक मदत तेथील सरकार देऊ करते.

९. न्यू हेवन सिटी

कमी लोकसंख्या असलेल्या या शहरात लोकांनी कायमस्वरूपी स्थायिक व्हावे म्हणून येथील सरकार लोकांना घरे बांधण्यासाठी बिनव्याजी रु. ७.५ लाख इतकी रक्कम देऊ करते. पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी येथे राहणाऱ्या लोकांना मुद्दलाची रक्कम देखील माफ केली जाते. तसेच येथील सरकारी शाळांमध्ये कोणतीही फी न आकारता सर्व मुलांना शिक्षण मिळते.

१०. नायगारा धबधबा

विश्वातील प्रमुख आकर्षण असणारा नायगारा धबधबा हे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. परंतु या ठिकाणाची लोकसंख्या केवळ ५०००० इतकीच आहे. स्थानिक तरुणांनी येथे राहून काम करावे यासाठी येथील प्रशासन प्रयत्नशील आहे.

काम करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील प्रशासन रुपये ५.६ लाख इतकी शिष्यवृत्ती देऊ करते. त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी आधी घेतलेले शिक्षणासाठीचे कर्ज फेडण्यासाठी देखील येथील प्रशासन मदत करते.

तर ही आहेत अशी दहा आश्चर्यकारक ठिकाणे जेथे जाऊन राहण्यासाठी आपल्याला घसघशीत रक्कम मिळू शकते. काय मग मित्रांनो, होताय का तिथे स्थायिक? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.

या लेखातील माहिती खरोखरच काही लोकांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे या माहितीचा सर्वांना उपयोग व्हावा म्हणून हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “जगातील अशी दहा ठिकाणे जिथे स्थायिक होण्यासाठी मिळते जमीन आणि लाखो रुपयांची संपत्ती ”

  1. जर भारतीय नागरिक या ठिकाणी स्थाईक होण्यासाठी इच्छुक असेल तर, त्यांना वरील देशाचे नागरिकत्व मिळते का?? पासपोर्ट, व्हिसा लगेच उपलब्ध होतो का?? जर असे असेल तर लोकसंख्येचा विस्फोट, बेरोजगारी असलेल्या देशातील नागरिक, तरुणांनी याचा जरुर विचार केला पाहिजे! चांगली व उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद!

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय