७ दिवसांत वजन कमी करण्यासाठी हि आसने करा । पहा सर्व आसने व्हिडीओ सहित

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय

वजन कमी करण्यासाठी योगाचा आसरा घ्या – फक्त ७ दिवसात परिणाम दिसतील

वजन कमी करण्यासाठी योगासनांचा झालेला फायदा याचे कितीतरी दाखले देता येतील.

तरीही फक्त योगामुळे वजन कमी होत नाही हे ही बरेच लोक मान्य करतील.

योगा, आणि स्मार्ट डाएटिंग यांचा समन्वय साधला तर उत्तम रिझल्ट मिळतात.

योगामुळे तुमचं मन आणि शरीर मजबूत होतं. शरीराला सुयोग्य आकार मिळतो. योगामुळेच तुमची तुमच्या शरीराशी खऱ्या अर्थानं ओळख होते

योगाची ओळख झाल्यानंतर तुम्ही सात्विक पौष्टिक अन्नाचाही शोध घ्यायला हवा.

सुदृढ होण्याचे दोन महत्त्वपूर्ण मार्ग आहेत, एक चांगला आहार आणि दुसरं म्हणजे व्यायाम.

वजन कमी करण्यासाठी याच मार्गांचा अवलंब केला पाहिजे.

तसं पहायला गेलं तर योगाचे फायदे बरेच आहेत. योगामुळे लवचिकता वाढते श्वसन सुधारतं. ऊर्जा आणि चैतन्य जाणवायला लागतं. चयापचय संतुलीत होतं.

सुधारित वेगवान योगामुळे स्नायू टोन कमी करता येतो आणि वजन कमी करायलाही मदत होते.

ताणतणावामुळे थेट तुमच्या शरीरावर आणि मेंदूवर घातक परिणाम होतो.

तणावामुळे, अस्वस्थता, झोपेचा विकार आणि एकाग्रतेत बाधा येते.

बर्‍याच वेळा, ताण हा वजन वाढण्याची पहिली पायरी असते.

योगामुळे तुम्ही ताणाशी जुळवून घेऊ शकता.

योगामुळे व्यक्तीला सुदृढ होण्यासाठी आणि उत्तम शारीरिक आणि भावनिक आरोग्यासाठी प्रोत्साहन मिळतं.

शरीराची अनुकूलता वाढवणे, फोकस सुधारणे आणि तुमचा स्नायू टोन तयार करणे हे योगाचं परफेक्ट मॉडेल आहे.

जेव्हा तुमचे शरीर या आसनांशी जुळवून घेतं तेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी योगासनांचा सराव सुरू करू शकता.

१) चतुरंग दंडासन

ज्याला लो प्लँक असंही म्हणतात, आधुनिक योगामध्ये व्यायाम म्हणून आणि सूर्यनमस्काराच्या काही प्रकारांमध्ये एक आसन म्हणून चतुरंग दंडासन ओळखलं जातं.

यात जमिनीच्या समांतर सरळ शरीराला पायाची बोटे आणि तळवे यांनी आधार दिला जातो.

चतुरंगदंडासन हा तुमच्या शरीराला मजबूत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

हे दिसायला जितकं सोपं दिसतं तितकेच त्याचे फायदेही अफाट आहेत.

जेव्हा तुम्ही आसन करता तेंव्हाच तुम्हाला त्याची तीव्रता तुमच्या पोटाच्या स्नायूंवर जाणवू

Plank

दंडासन

२) विरभद्रासन – योद्धा मुद्रा

हे आसन मांडी आणि खांद्यांना टोन करतं, तसंच एकाग्रता सुधारायला ही मदत करते

जितका जास्त काळ आसन कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील.

फक्त काही मिनिटांच्या विरभद्रासनाने तुमच्या मांड्याचं आरोग्य सुधारायला मदत होते.

वीरभद्रासन म्हणजेच वॉरियर पोझमुळे तुमचा बॅलन्स सुधारतो

शरीराचा मागचा भाग, पाय आणि हाताचं टोनिंग होतं.

आसन करताना तुमच्‍या पोटाचे स्‍नायू आकुंचन पावल्‍यास ते तुमच्‍या पोटाला टोन करायला आणि त्याच बरोबर तुम्‍हाला सपाट पोट द्यायला मदत करते.

virbhadrasan

विरभद्रासन

३) त्रिकोनासन – त्रिकोणी मुद्रा

त्रिकोनासनमुळे पचन सुधारते तसेच पोट आणि कंबरेवर जमा झालेली चरबी कमी होते.

हे आसन संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करायला मदत करते.

या आसनामुळे कंबरेवरची चरबी कमी होते आणि मांड्या आणि मांड्यांच्या मागच्या भागात जास्त स्नायू तयार व्हायला मदत मिळते.

जरी या आसनात तुमचे स्नायूंची हालचाल इतरांप्रमाणे होत नसली तरी त्रिकोनासन तुम्हांला इतर आसनांप्रमाणेच फायदा देतं.

त्रिकोनासनमुळे संतुलन आणि एकाग्रता देखील सुधारते.

Trikonasan

त्रिकोनासन

४) अधो मुख श्वानासन – कुत्र्याची अधोमुखी मुद्रा

अधोमुख श्वानासन विशिष्ट स्नायूंकडे थोडं जास्त लक्ष देऊन तुमचे संपूर्ण शरीर टोन करते.

या आसनामुळे तुमचे हात, मांड्या, आणि पाठ मजबूत व्हायला मदत होते.

या स्थितीत तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित केलत तर तुमचे स्नायू एकत्रित होतात आणि त्यांच टोनिंग होत.

अधोमुख श्वानासनामुळे तुमची एकाग्रता आणि रक्ताभिसरण सुधारते.

अधो मुख श्वानासन वजन कमी करायला मदत करतं.

अधो मुख श्वानासन

५) सर्वांगासन

सर्वांगासनामुळे अनेक फायदे मिळतात.

यात तुमची ताकद वाढण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत अनेक गोष्टी होतात.

पण सगळयात महत्त्वाचं सर्वांगासनामुळे चयापचय व्यवस्थित होतं आणि थायरॉईड पातळी संतुलित रहाते.

सर्वांगासन केल्यानं शरीराचा वरचा भाग, पोटाचे स्नायू आणि पाय मजबूत होतात.

श्वसनाचं कार्य सुधारतं आणि झोप ही सुधारते.

Sarvangasan

सर्वांगासन

योगासनांचे फायदे तुम्हांला माहीतीच आहेत.

पण लवकर वजन कमी करण्यासाठी या आसनांचा तुम्ही सातत्याने सराव केलात तर तुम्हांला चांगले परिणाम दिसतील.

आसन करण्यापुर्वी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नीट शिकून घ्या, मग घरच्या घरी तुम्ही स्वतः केलं तरी हरकत नाही.

योगासनांचा तुमच्या आरोग्यावर झालेला चांगला फायदा आमच्या सोबत शेअर करून रला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

2 Responses

  1. Dipali Shete says:

    Nice mahiti

  2. Deepak Narwadkar says:

    Nice information with video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!