माधुरी दीक्षित तीचा रोजचा मेक अप कसा करते, वाचा तिने स्वतः दिलेल्या खास टिप्स

माधुरी दीक्षितने दिल्या रोजच्या मेकअपसाठी टिप्स!

तर मैत्रिणींनो जरा ईकडे लक्ष द्या.

आज-काल बाजारामध्ये मेकअपचे असंख्य ब्रॅण्ड आणि असंख्य प्रकार उपलब्ध आहेत.

प्रत्येक मैत्रिणीला छान दिसावं असं वाटतं आणि का दिसू नये?

छान दिसण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे.

पण मैत्रिणींनो मनात आपल्याला असं वाटत असतं की, या स्टार लोकांचं किती भारी असतं ना?

त्यांची स्वतःची हेअर स्टाईलिस्ट असेल, मेकअप आर्टिस्ट असतील, त्यांचा मेकअप रोज फ्रोफेशनल व्यक्ती करत असतील.

पण मैत्रिणींनो, या स्टार लोकांना सुद्धा रोजचा मेकअप स्वतःलाच करतो हे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना?

पण स्वतः माधुरी दीक्षितने आपला हा रोजचा मेकअप आपण कसा करतो हे व्हिडिओद्वारे दाखवत मेकअपसाठी काही टिप्सही दिल्यात.

एका अनौपचारिक मीटिंगसाठी मी तयार होणार आहे असे सांगत “लाखो दिल की धडकन” माधुरी दीक्षितनं मेकअपच्या काही टिप्सस् शेअर केल्या.

मेकअप साठी कमीत कमी प्रॉडक्ट वापरून असा मेकअप करा की मेकअप केलेलाच नाही असा लूक येईल असं सांगत तिने आपला मेकअपला सुरुवात केली.

नेमका कसा आणि कोणत्या क्रमाने हा मेकअप माधुरी दीक्षित केला हे जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा.

माधुरी दीक्षित तिचा रोजचा मेकअप कसा करते

१) तर हलक्या हातानं मॉइश्चरायझर लावून माधुरीने मेकअपला सुरुवात केली.

हे मॉइश्चरायझर त्वचेसाठी उपयोगी असतं आणि मेकअपही नीट सगळीकडे पसरतो असाही फायदा माधुरीने सांगितला.

चेहऱ्यावर वरच्या बाजूला हलका मसाज करत हे मॉइस्चरायझर लावायचं.

हातांनाही मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. असंही माधुरीने म्हटलं आहे.

२) त्यानंतर डोळ्याखालच्या भागाकडे विशेष लक्ष देत माधुरीनं अंडरआय मेकअप केला.

यासाठी बाजारात मिळणाऱ्या चांगल्या प्रॉडक्टपैकी तुम्ही तुमच्या स्किनला सूट होणाऱ्या प्रॉडक्टची निवड करू शकता असं सांगत एलर्जी टेस्ट करून मगच प्रॉडक्ट वापरा अशी सूचनाही आठवणीने माधुरीने दिली.

एका बोटाने हलकेच हे क्रीम डोळ्याखाली टॅप केलं.

डोळ्याखालची सूज किंवा झोप न झाल्यामुळे डोळ्यांचा डलनेस यासाठी ही अंडरआय क्रीम आणि मेकअप मधली ही स्टेप खूप महत्त्वाची आहे.

३) त्यानंतर दोन मिनिटं थांबून माधुरीनं बेसकडे मोर्चा वळवला.

हा बेस ही पहिल्यांदा अंडर आईज म्हणजे डोळ्याखालच्या भागात पहिल्यांदा आणि मग संपूर्ण चेहर्‍यावर इन डायरेक्ट पद्धतीने लावायचा.

इन डायरेक्ट म्हणजे त्यासाठी ब्रश आणि पॅलेटचा वापर करायचा.

मेकअपचा थरच्या थर चेहऱ्यावर चढवण्याऐवजी कमीत कमी क्वांटिटी चा वापर करा हे माधुरी दीक्षितनं वारंवार सांगितलं.

लिक्विड कन्सीलरने डोळ्याखालून सुरुवात करून ब्रशनं आतल्या साईडमधून बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने हे कन्सीलर माधुरीनं चेहऱ्यावर अप्लाय केल.

डार्क सर्कल किंवा वांगाचे डाग असतील तर हे कन्सिलर काळजीपूर्वक लावावं असंही माधुरीनं आवर्जून सांगितलं.

४) त्यानंतर छोटा आरसा घेऊन मस्करा लावण्याची तयारी करत माधुरीने सांगितलं की, मस्करा हा बेस पासून वरच्या बाजूला अप्लाय करायचा.

मस्कारा फार प्रमाणात लागणार नाही याची काळजी घ्यायची तसेच पापण्या एकमेकांना चिकटू नये याचीही खबरदारी घ्यायची.

५) यानंतर ब्लश अप्लाय करताना कमीत कमी क्वांटिटी चा वापर करून दोन शेडची निवड करून ब्रशच्या सहाय्याने थोडंसं हसून, गाल ताणून हलक्या हाताने हा ब्लश गालांच्या उंचवट्यावर अप्लाय करायचा.

६) शेवटी लिपस्टिकची शेड काळजीपूर्वक निवडून लिपलाइन सांभाळून लिपस्टिक लावावं.

दातांवर हे लिपस्टिक लागलेलं नाही ना याची खात्री करून घ्यावी.

आता झाला रोजचा नैसर्गिक लूकचा मेक अप पुर्ण.

कॉलेज युवती किंवा जॉब करणाऱ्या स्त्रिया किंवा अगदी गृहिणी, प्रत्येकीला सहज, रोजच्या रोज हलका मेकअप, करायला आवडेल आणि तो या टिप्सच्या मदतीने करता येईल.

स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी स्वतःवरती विश्वास जागवण्यासाठी आणि स्वतःला थोडासा वेळ देण्यासाठी माधुरी दीक्षितच्या या मेकअप टिप्स फॉलो करायला विसरू नका.

कारण सुंदर दिसण्याचा हक्क प्रत्येकीला आहे….

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय