गोड आणि पाणीदार कलिंगड कसं निवडायचं?

kalingad god aahe he kase olkhave

उन्हाळ्यात सगळ्यांच्या आवडीचं थंडगार देणारं फळ म्हणजे कलिंगड!

कलिंगड गोड आणि पाणीदार असेल तरच ते खाल्ल्यानंतर मनाचं संपूर्ण समाधान होतं.

कलिंगड विकत घेताना गोड आणि पाणीदार आहे की नाही हे कसं ओळखायचं? हा प्रश्न असतो.

रस्त्याच्या कडेला, मंडईत मिळणारं हे कलिंगड पारखून घेत बसायला तुमच्याकडे तसा फारसा वेळ नसतो.

ब-याच वेळेला गर्दी ही पुष्कळ असते.

अशावेळी पटकन चांगलं, गोड चवीचं, पाणीदार कलिंगड निवडण्यासाठी या ५ गोष्टींचा नक्की विचार करा.

१) कलिंगडाचा रंग कसा असावा?

बाजारात कलिंगडाचे ढीग लावलेले तुम्हांला दिसतात.

त्यात सगळ्यात पहिल्यांदा लक्ष जातं ते कलिंगडाच्या रंगाकडे.

उत्तम कलिंगड निवडण्यासाठी डार्क हिरवा रंग असलेल्या कलिंगडाची निवड करा.

त्याचबरोबर हे लक्षात घ्या की त्या कलिंगडाच्या सालीवरती शायनिंग किंवा चमक नसावी.

थोडसं डल दिसणारं कलिंगड तुम्ही निवडा.

ज्या कलिंगडावरती चमक असते, शायनिंग असते ते कलिंगड ताजं असतं.

ते फारसं गोड लागत नाही.

२) कलिंगडावरचा फिल्ड मार्क ओळखा

झाडावरती जेंव्हा कलिंगडं येतात तेंव्हा कलिंगडाच्या खालच्या बाजूला सूर्यप्रकाश पोचत नाही आणि तो भाग पिवळसर राहतो.

त्याला फिल्ड मार्क असं म्हणतात.

झाडावरती कलिंगड पिकतं तेंव्हा पिवळसर भाग गडद पिवळा किंवा तपकिरी होतो.

पण कलिंगड कच्चं असताना काढलं तर हा भाग हिरवटसर किंवा हलक्या पिवळा रंगाचा राहतो.

त्यामुळे हिरवागार कलिंगडाचा वेगळा दिसणारा, लक्ष वेधून घेणारा भाग गडद पिवळा किंवा तपकिरी असलेलाच विकत घ्या.

३) कलिंगडाचं वजन ठरवेल त्याची गोडी

कलिंगडाच्या वजनावरून तुम्ही नेमकं कोणतं कलिंगड निवडायचं हे पटकन ठरवू शकता.

त्यासाठी एक सारखी दोन कलिंगड हातात घ्या.

ज्या कलिंगडाचं वजन तुम्हांला जास्त जाणवेल ते कलिंगड पाण्याने भरलेलं असतं आणि गोडही असतं.

४) कलिंगडाचा देठ कसं असलं पाहिजे?

कलिंगडाचा देठ नीट निरखून बघा.

हा देठ हिरवा नसावा.

कलिंगडाचा देठ पिवळा किंवा तपकिरी असेल तर ते कलिंगड झाडावरती पक्व झाल्यानंतर तोडलेलं असतं आणि त्यामुळे ते गोड आणि पाणीदार निघतं.

५) कलिंगड वाजवून बघा.

कलिंगड हातात घेऊन बोटांनं टँप करून वाजवून बघा.

कलिंगड सुकलं असेल, आतून पोकळ असेल, पाणी कमी असेल, तर एक पोकळ आवाज तुम्हाला जाणवेल.

जर कलिंगडामध्ये भरपूर पाणी असेल तर कलिंगडाचा भरलेला आवाज तुमच्या लक्षात येईल.

आणि हा फरक अनुभवांनं तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल.

कलिंगड पाणीदार आणि गोड निवडण्यासाठी या ५ टिप्सचा नेहमी वापर करा आणि उन्हाळा सुसह्य करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!