नारळाच्या दुधाचे आश्चर्यकारक फायदे आणि पाचक, रुचकर सोलकढीची रेसिपी

कोकणातल्या आजीं ज्या शाकाहारी दुधाचा वापर करतात, विज्ञान ही त्याची शिफारस करतं.

या शाकाहारी दुधाची रेसिपी आणि त्याच्या पासून मिळणारे आरोग्य फायदे वाचलेत तर तुमच्या लक्षात येईल की घरातल्या प्रेमळ आणि अन्नपुर्णा आजीचं आणि पोषणतज्ञांचं ही हे का आवडतं आहे?

‘बर्मीज खो सूय’ या पदार्थापासून ते केरळच्या मटण स्टूपर्यंत, विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांमध्ये एक घटक समान असतो तो म्हणजे नारळाचं दूध.

नारळाच्या दुधाची अद्वितीय चव आणि त्याची दाट मलई यामुळे ते जगभरात खवैय्यांच आवडतं तर आहेच , पण करी आणि डेझर्टमध्ये सुद्धा त्याचा मुक्तहस्ते वापर होतो .

शाकाहारी पदार्थात नारळाच्या दुधाचा वापर केला जातो, कारण ते लैक्टोज मुक्त आहे.

नारळाच्या दुधाचे पदार्थ आठवायचे तर कोकण किनारपट्टी आणि केरळचे पदार्थ आठवावे लागतील.

कोकणी पदार्थात बरेच पदार्थ मांसाहारी असतात आणि नारळ हा त्या चविष्ट पाककृतींमध्ये एक अतिशय महत्वाचा घटक असतो.

नारळाचा वापर केल्याशिवाय पारंपारिक पदार्थ अपूर्ण ठरतात, विशेष करून नारळाचं दूध, जे सीफूड डिशेसपासून ताजतवानं करणा-या पेयांपर्यंत सगळीकडे वापरलं जातं.

नारळाच्या दुधाचा उपयोग फक्त अन्नपदार्थांचू चव वाढवणं एव्हढच नाही बरं का!

फार पूर्वीपासून निरोगी केसांसाठी आणि मुलायम त्वचेसाठी ही नारळाच्या दुधाचा वापर केला जातो.

नारळाचं दुध आरोग्यदायी नसल्याचा गैरसमज निर्माण केला जात असला तरी, नारळाच्या दुधाच्या ब-याच फायद्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

नारळाच्या दुधात व्हिटॅमिन C, E, B1, B3, B5 आणि B6 तसेच लोह, सेलेनियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात.

यामध्ये दाह-विरोधी प्रतिजैविकं आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत, जे शरीराला बऱ्याच संक्रमणापासून आणि विषाणूंपासून वाचवायला मदत करतात.

नारळाच्या दुधात चरबीचं प्रमाण लक्षणीय असतं, परंतु ते बहुतेक लॉरिक ऍसिड सारख्या मध्यम-चेन फॅटी ऍसिडच्या स्वरूपात असतं.

नारळाच्या दुधात लॉरिक ऍसिडचे प्रमाण चांगले असते, जे आईच्या दुधात देखील आढळतं.

मेंदूचा विकास, हाडांचं आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या लॉरिक ऍसिडचा उपयोग होतो.

आहारतज्ञांनी सांगितलेले नारळाच्या दुधाचे फायदे

१) कोरडे आणि रुक्ष झालेले केस पुन्हा मुलायम व्हायला मदत होते.

नारळाच्या दुधाचा वापर कोरड्या पडलेल्या, खाज सुटणा-या आणि जळजळणा-या टाळूवर टॉनिक म्हणून केला जाऊ शकतो.

कोरडे आणि खराब झालेले केस ठिसूळ आणि दुभंगलेल्या टोकांचे असतील तर नारळाच्या दुधानं ते निरोगी, मुलायम व्हायला मदत होते.

नारळाच्या दुधानं टाळूला फक्त ५ मिनिटे मसाज करून, त्यावर गरम टॉवेलनं वाफ दिली तर अतिशय उत्तम रिझल्ट मिळतात.

२) केस वाढायला मदत होते.

नारळाच्या दूधामुळं केसांची वाढ चांगली होते. कारण त्यात बरेच आवश्यक पोषक घटक असतात.

केसांची वाढ होण्यासाठी नारळाच्या दुधाने ३ ते ५ मिनिटं केसांना मसाज करायचा आणि २० मिनिटांनंतर केस धुवुन टाकायचे.

३) केसांचं कंडिशनिंग होतं.

खोबरेल तेलासारखंच नारळाचं दूध हे ही केसांसाठी उत्तम कंडिशनर आहे.

हे नारळाचं दूध तुम्ही केस धुताना शॅम्पूबरोबर समप्रमाणात किंवा कंडिशनर म्हणून वापरू शकता .

हे नारळाचं दूध केसांचं आकारमान वाढवतानाच केस सिल्की सुद्धा करतं.

म्हणून तुम्हाला केसांचा टेक्सचर जर सुधारायचा असेल तर नारळाचे दूध हा एक उत्तम उपाय आहे.

४) उत्तम मेकअप रिमूव्हर आणि फेशियल स्क्रब

नारळाचे दूध एक उत्कृष्ट मेकअप रिमूव्हर आहे.

सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वापरायला ते योग्य आहे.

नारळाचं दूधं नैसर्गिकरित्या जसं आहे तसं वापरता येतं किंवा जास्त फायदा मिळवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून तुम्ही वापरू शकता.

त्वचा स्वच्छ करण्याबरोबरच, नारळाचं दूध त्वचेला खोलवर पोषणही देतं.

५) मुरुमं टाळण्यासाठी मदत करतं.

नारळाच्या दुधातील फॅट्स त्वचेची छिद्रे बंद करत नाहीत.

त्यामुळं तेलकट किंवा पुरळ येणारी त्वचा असलेल्या लोकांसाठी हे उत्कृष्ट क्लिंजर ठरतं.

कारण त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो.

६) अकाली वृद्धत्व रोखायला मदत होते.

नारळाच्या दुधात C आणि E जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात.

त्यामुळं त्वचेची लवचिकता टिकवून ठेवायला मदत मिळते.

नारळाच्या दुधात कॉपर सुद्धा मुबलक प्रमाणात असतं, आणि त्यामुळे सुरकुत्या, निस्तेज त्वचा आणि डागांना प्रतिबंध होतो.

७) सनबर्नवर उपचाराला मदत होते.

उन्हाळ्यामुळे भाजणा-या त्वचेसाठी हा नैसर्गिक उपचार ठरतो.

चेहऱ्यावर भाजलेल्या ठिकाणी नारळाचं दूध लावल्यामुळं लालसरपणा कमी होतो आणि त्वचेला थंडावा मिळतो.

८) त्वचेचं मॉइश्चरायझिंग होतं.

आंघोळीसाठी सामान्य दुधाच्या ऐवजी नारळाच्या दुधाचा वापर केला तर त्वचेसाठी चांगलं मॉइश्चरायझर म्हणून त्याचा उपयोग होतो.

नारळाच्या दुधात गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबपाणी मिसळलं तर त्याचा प्रभाव वाढतो आणि कोरड्या त्वचेची आर्द्रता परत येते.

९) त्वचेच्या आजारांवर उपयुक्त.

नारळाच्या दुधाची एक उत्तम गोष्ट म्हणजे ते संवेदनशील त्वचेपासून तेलकट त्वचेपर्यंत सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी योग्य ठरतं.

नारळाच्या दुधाच्या गुणधर्मांमुळे, एक्जिमा, त्वचारोग आणि सोरायसिसमुळे कोरड्या आणि रखरखीत झालेल्या त्वचेवर चांगला परिणाम होतो.

नारळाच्या दुधापासून तयार होणारी पारंपारिक सोलकढीची रेसिपी

सोल कढी हे कोकणी जीवनशैलीतील अविभाज्य उन्हाळी पेय, जे रोजच्या जेवणात समाविष्ट केलेलं असतं.

साहित्य:

कोकम – १२ (किंवा बाजारात तयार कोकम मिळतं)

ताजा नारळ – 1 कप

हिरवी मिरची – १

लसूण – 2 लवंगा

धणे – 2 टेबलस्पून

जिरे पावडर- १/२ टीस्पून

मीठ : चवीनुसार

सजावटीसाठी पुदिन्याची पाने

तयारी

कोकम १/२ कप कोमट पाण्यात ३० ते ४५ मिनिटे भिजत ठेवा.

रस काढण्यासाठी कोकमं पिळून घ्या.

हिरवी मिरची, जिरे, लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि मीठ एकत्र फोडून घ्या.

गुळगुळीत पेस्ट बनवण्यासाठी ताजंं किसलेलं खोबरं पुरेसं पाणी घालून मिक्सर-ग्राइंडरमध्ये फिरवा.

त्यातून ताजे नारळाचे दूध काढण्यासाठी बारीक गाळणीतून पेस्ट गाळून घ्या.

काढलेले दूध, कोकम कॉन्सन्ट्रेट, ठेचलेला लसूण आणि मिरची मसाल्याची पेस्ट एका भांड्यात मिसळा आणि एकत्र करण्यासाठी नीट ढवळून घ्या.

त्याची चव बघा आणि आवश्यकतेनुसार मसाला घाला.

सोलकढीला पुदिन्याची पाने किंवा चिरलेली कोथिंबीर घालून सजवा आणि जेवणासोबत थंडगार सर्व्ह करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय