चलनातील खोट्या नोटा कशा ओळखायच्या?

तुम्हाला मिळालेली एखादी नोट खोटी आहे, असा तुम्हाला संशय आहे का? असे असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे.

नवरा ऑफिसला आणि मुलं शाळेत गेल्यावर मालती मार्केटमध्ये जायला निघाली.

निघताना मोबाईल आणि पैसे घ्यायला ती विसरली नाही. मार्केटमध्ये एका दुकानात तिने मनसोक्त खरेदी केली. त्यानंतर बिल भरायची वेळ आल्यावर तिने पर्समधील नोटा काढून दुकानदाराला दिल्या.

परंतु त्याने त्या नोटा खोट्या आहेत असे सांगून घेण्यास नकार दिला.

मालती चकित झाली. आदल्या दिवशीच काही खरेदी करताना एका दुकानातून तिला त्या नोटा मिळाल्या होत्या. सुदैवाने मोबाईल जवळ असल्यामुळे तिने पेमेंट ॲप वापरून दुकानदाराचे पैसे दिले आणि ती घरी आली.

संध्याकाळी नवऱ्याशी बोलताना तिने घडलेला प्रकार सांगितला आणि त्या दोघांनाही आपल्या जवळच्या नोटा खर्‍या आहेत की खोट्या हे आपल्याला माहित असायलाच हवे याची प्रकर्षाने जाणीव झाली.

आज आपण चलनात असणाऱ्या नोटा खऱ्या आहेत हे कसे ओळखायचे याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मालतीसारखा अनुभव आपल्याला येऊ नये म्हणून हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

भारतीय बाजारपेठांमध्ये खोट्या नोटा चलनात येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

भारतीय नागरिकांसाठी ही अतिशय काळजीची गोष्ट आहे. आपण वापरत असलेल्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या याची प्रत्येकाने शहानिशा करून घेतलीच पाहिजे.

भारतात जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून खोट्या नोटा आणल्या जातात. २०, ५०, १०० अशा लहान किमतीच्या नोटांपेक्षा ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा खोट्या असण्याचे प्रमाण जास्त आहे.

दुकानांमधून खरेदी करताना तर खोट्या नोटा मिळू शकतातच परंतु चक्क बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना सुद्धा काही लोकांना खोट्या नोटा मिळाल्या आहेत. यावरूनच आपल्याला या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते.

मग नोटा खऱ्या आहेत की खोट्या हे नेमके ओळखायचे तरी कसे?

आपल्याला मिळालेली नोट खोटी आहे हे खालील लक्षणांवरून दिसून येते.

१. खोट्या नोटेवर असणारा वॉटरमार्क खऱ्या नोटेपेक्षा जास्त जाड दिसतो. खोट्या नोटा बनवणारे लोक नोट बनवताना तेल, ग्रीस किंवा मेणाचा वापर करतात. त्यामुळे वॉटरमार्क नेहमी पेक्षा जास्त जाड दिसतो.

२. खोटी नोट बनवताना नोटेमध्ये security thread नंतर प्रिंट केला जातो किंवा त्याचे चित्र काढले जाते. त्यावरून नोट खोटी आहे हे ओळखता येऊ शकते.

३.नोटेवर वेगवेगळ्या ठिकाणी असणारे अंक आणि अक्षरे योग्य पद्धतीने लिहिलेली नसल्यास नोट खोटी आहे हे ओळखावे.

अक्षरांमध्ये किंवा अंकांमध्ये कमी अधिक प्रमाणात जागा सोडलेली असणे, काही अंक लहान तर काही अंक मोठे लिहिलेले असणे यावरून नोट खोटी आहे हे ओळखता येते.

४.नोटेचा रंग सहजा सहजी बदलत असल्यास किंवा त्यावरील शाई फिस्कटत असल्यास ही नोट खोटी आहे हे ओळखावे.

५. नोटेवर रिझर्व बँक ऑफ इंडिया असे जे लिहिलेले असते ते खऱ्या नोटेवर बारीक अक्षरात तर खोट्या नोटेवर जाड अक्षरात लिहिलेले असते.

यावरून देखील नोट खरी आहे की खोटी हे ओळखता येते.

भारतीय चलनी नोटा माहीत करून घ्या.

आपल्याला मिळणाऱ्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या, हे ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सर्व नोटांची नीट माहिती करून घेणे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया ने paisaboltahai.rbi.org.in या नावाची एक वेबसाईट काढली आहे.

या वेबसाईटवर भारतातील सध्या चलनात असणाऱ्या सर्व नोटांची भरपूर चित्रे आणि संपूर्ण माहिती विस्तृतपणे दिलेली आहे.

या वेबसाईट वरून आपण सध्या भारतात चलनात असणाऱ्या सर्व नोटांची सविस्तर माहिती मिळवून त्यानुसार आपल्याजवळील नोटा खऱ्या आहेत अथवा खोट्या हे पडताळून पाहू शकतो.

नोटबंदी नंतर भारतात नव्या नोटा जारी केल्या गेल्या. काय आहेत या नव्या नोटांची वैशिष्ट्ये?

१. भारतीय चलनी नोटा भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातील संस्कृती आणि विविधता दर्शवणाऱ्या आहेत. नव्या चलनी नोटा भारताची विविधतेतून एकता दर्शवणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे भारतीय चलनी नोटा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन करणाऱ्या आहेत.

२. नवे डिझाईन असणाऱ्या नव्या नोटा भारतातील संस्कृती बरोबरच भारताची वैज्ञानिक प्रगती दाखवणाऱ्या आहेत.

३. नव्या नोटांचे रंग, आकार आणि डिझाईन आधुनिक असून त्या भारतातील वेगवेगळी हेरिटेज क्षेत्रे आणि वास्तू यांची चित्रे असणाऱ्या आहेत.

४. नव्या भारतीय चलनी नोटांवर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो छापलेला असून नोटांवरील अंक देवनागरी लिपीत लिहिलेले आहेत.

५. नव्या नोटांच्या सुरक्षेसाठी वॉटर मार्क, सिक्युरिटी thread इत्यादी गोष्टी मात्र आधी सारख्याच ठेवल्या आहेत. त्यामुळे नोटा खरे आहे हे ओळखणे सोपे जाते.

तर ही आहेत नव्या भारतीय चलनी नोटांची काही वैशिष्ट्ये. यांचा आधार घेऊन देखील नोटा ओळखणे सोपे जाईल.

कितीही सतर्क राहिले तरी एखाद्या वेळी नजरचुकीने आपल्याला खोटी नोट मिळणे सहज शक्य आहे. अशा वेळी काय करावे?

रिझर्व बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आदेशानुसार मिळालेली खोटी नोट घेऊन तुम्ही जवळच्या शासकीय बँकेच्या कुठल्याही ब्रांच मध्ये जाऊ शकता. तिथे तुमच्या जवळील खोटी नोट सबमिट करून तितक्याच रकमेची खरी नोट तुम्हाला बदलून मिळू शकते.

खराब झालेल्या किंवा खोट्या नोटा मिळाल्या तर काय करावे, हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

बँकेतर्फे तुमची नाव, पत्ता आणि सही अशी माहिती घेतली जाते. या माहितीच्या आधारे खोट्या नोटांची नोंदणी करणे बँकेला सोपे जाते.

भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपल्याला मिळालेली खोटी नोट तशीच गुपचूप इतर कुणाला न देता ती बॅंकेत सादर करून बदल्यात खरी नोट घेणे हे आपले कर्तव्य आहे. असे करण्यामुळे देश विरोधी कारवाया करणाऱ्या विघातक शक्तींचे भारतात खोट्या नोटा चलनात आणण्याचे षडयंत्र हाणून पाडणे शक्य होईल.

तर मित्र मैत्रिणींनो, आज आपण खोट्या नोटा कशा ओळखाव्या या महत्त्वाच्या विषयावरील सविस्तर माहिती पाहिली.

आपल्याकडे चुकुन एखादी खोटी नोट आली तर घाबरून न जाता जवळच्या शासकीय बँकेतून ती बदलून घ्यावी तसेच वारंवार कुणाकडे खोट्या नोटा आढळल्यास अशा व्यक्तीची योग्य तक्रार जरूर करावी.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा. तसेच खोट्या नोटांचे तुम्हाला जर काही अनुभव आले असतील तर तेही कॉमेंट करून आम्हाला कळवा.

असे करण्यामुळे याबाबतीतील जागरूकता वाढण्यास मदतच होईल.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या साठी हा लेख शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “चलनातील खोट्या नोटा कशा ओळखायच्या?”

  1. मला एक वेळ 2000 रु ची खोटी नोट मिळाली होती मला याविषयी काही कल्पना नव्हती पण मी जेव्हा बँकेत माझ्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी गेलो तेंव्हा बँक ऑफ महाराष्ट्र च्या बँक कॅशियर ने ती नोट खोटी असल्याचे सांगितले व ती नोट बदलून दिली नाही आणि जमा करून घेतली नाही उलट त्या नोटेवर आडव्या रेषा ओढून ती नोट मला परत केली नोटेवर रेषा ओडल्यामुळे ती नोट मला ज्या व्यक्तीने दिली होती त्याने परत घेण्यास नकार दिला त्यामुळे माझे 2000 रुपयाचे नुकसान झाले होते

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय