सैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय

दैनंदिन आयुष्यात आपण सगळेच बेरचदा सततची काळजी, भिती, चिंता, नकारात्मक विचार व नैराश्य यांसारख्या समस्यांना सामोरे जात असतो. अशा विचारांपासून पळण्याचा आपण जेवढा प्रयत्न करतो तेवढे ते अधिक प्रकर्षाने जाणवतात.

‘चिंता करायची नाही’ असे म्हटल्याने आपण चिंता करायचे थांबवू शकतो का? तर नाही. किंवा नकारात्मक विचार करायचे नाहीत असे ठरवले तरीही ते पूर्णपणे शक्य नाही. कारण आपल्या विचारांवर आपले पूर्ण नियंत्रण नाही.

म्हणूनच जेव्हा जेव्हा आपल्या मनात असे काळजीचे, भितीचे विचार येणे सुरू होईल तेव्हा आपल्या मनाला दुसऱ्या कुठल्यातरी विचारात गुंतविणे हाच सोपा पर्याय आहे. किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे, ज्याची भिती वाटते, चिंता वाटते त्या कारणांचा अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाय करणे.

विचारांच्या गर्तेत आपले मन शांत राहणे हे आवश्यक आहे. त्यासाठी काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी करता येतील किंवा काही सवयी बदलाव्या लागतील.

१) ध्यान-धारणा:

भारतीय योगामध्ये ‘ध्यानाला’ अनन्यसाधारण महत्व आहे. ध्यान हे काही अवघड आसन नसून केवळ एकाग्रचित्ताने आपल्या अंतर्मनावर लक्ष केंद्रित करण्याची सोपी क्रिया आहे. रोज थोडा वेळ ध्यान केल्याने मन शांत होण्यास मदत होईल.

मनाची एकाग्रता वाढवण्याचे ८ सोपे उपाय

२) व्यायाम करणे:

ध्यान हा जसा मनाचा व्यायाम आहे तसेच शरीरालाही व्यायामाची गरज असते. रोज नियमित व्यायाम करा. याने आपली तब्येत तर तंदुरुस्त राहतेच शिवाय आपण अधिक आनंदी व उत्साही बनतो.

३) भूतकाळ विसरा:

प्रत्येकालाच भूतकाळात काहीतरी खटकत असते, काही खंत असते. पण घडून गेलेल्या गोष्टींचा त्रास करून घेतल्याने काही साध्य होणार नाही. याउलट वर्तमानात जगायला शिका. हा मनःशांतीचा एक प्रभावी उपाय आहे.

४) क्षमा करा:

कुणाकडून आपल्याबाबतीत काही चुकले असल्यास त्या गोष्टीची अढी मनात न ठेवता समोरच्या व्यक्तीला क्षमा करा. आणि स्वतःलाही क्षमा करा म्हणजे विनाकारणचा ताण कमी व्हायला मदत होईल.

पण विषय क्षमा करण्यासारखा नसेल तर परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळा.

५) हसा व हसवा:

केवळ एका स्मितहास्याने आपल्या शरीरात अंतर्गत चांगले बदल होतात, हे शास्त्रीय दृष्टया सिद्ध झाले आहे.

‘थ्री इडियट्स’ मधला प्रिन्सिपल पहिला असेल. त्यात मनाविरुद्ध घडलं तर तो हसण्याचा प्रयत्न करतो. सिनेमात तो गमतीचा भाग असला तरी,

हसल्यावर आपला मेंदू शरीरात काही चांगले हार्मोन्स सोडतो, ज्याने आपल्याला बरे वाटते. म्हणून हसा व हसवत राहा.

६) विनोदी चित्रपट बघा:

विचारांपासून दूर पळायचे असल्यास एखादा विनोदी सिनेमा नक्की बघा. चित्रपटातील विनोदामध्ये रमल्यावर निश्चितच थोड्या वेळासाठी आपण नको असलेल्या ताण तणावापासून दूर राहू शकतो.

७) फक्त लोकांना आनंदी बनवणे थांबवा:

काही लोकांना सतत दुसऱ्यांना आनंद देण्याची, त्यांना मदत करण्याची सवय असते. पण अशा सवयीलाही मर्यादा असली पाहिजे.

प्रत्येक वेळी स्वतःचा आनंद बाजूला ठेऊन इतरांसाठी जगत राहिलात तर स्वतः साठी जगताच येणार नाही. व अशा स्वभावाचा लोक गैरफायदा घेण्याची शक्यता जास्त असते.

८) ज्याची भिती वाटते ते करा:

एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला भिती वाटते तेव्हा आपण ती गोष्ट करायला टाळाटाळ करतो. पण जे करायची भिती वाटते ते करा. असे केल्याने आपला आत्मविश्वास वाढेल.

९) स्वतःला आपले प्रेरणस्थानी बघा:

प्रत्येकाचा कुणी ना कुणी ‘आयकॉन’ असतो. आपणही त्याच्या किंवा तिच्या सारखं असावं असं प्रत्येकाला वाटतं.

असा केवळ विचार करण्यापेक्षा स्वतःमध्ये त्या व्यक्तीला बघा. काही निर्णय घेताना ‘ती व्यक्ती आपल्या जागी असती तर काय केले असते’ याचा विचार करून तसे आपणही करा. अश्याने हळूहळू आपणच आपले ‘आयकॉन’ होऊ शकतो.

१०) नको असलेले नातेसंबंध सोडा:

नातेसंबंध आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत. पण म्हणून सगळीच नाती चांगलीच असतील असे नाही, काही अशीही नाती असतात ज्यामुळे आपला ताणतणाव वाढू शकतो.

अशावेळी त्या संबंधाचा जास्त विचार न करता त्यापासून शक्य तितके अलिप्त राहणे जास्त हितावह ठरते.

११) स्वप्नाच्या दिशेने रोज एक पाऊल टाका:

आपण जी स्वप्ने बघतो, ती एका दिवसात पूर्ण होणार नाहीत, त्यासाठी चिकाटीने सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. मग रोज एक गोष्ट करा जी तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाईल.

उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला अंगणात बाग तयार करायची असेल तर रोज किमान एक रोप लावणे, खत-पाणी घालणे, झाडांची निगा घेणे हे करावे लागेल. तेव्हा वर्षभरात बाग तयार होईल.

१२) आवडीचे छंद जोपासा:

प्रत्येकामध्ये काही न काही कला असतेच. आपल्यातल्या कलागुणांना ओळखा व त्याचा छंद लागू द्या.

लिखाण, वाचन, गायन, वादन, नृत्य जे काही आवडेल ते करा. यामुळे उत्साह वाढून नवनवीन गोष्टी शिकता येतील.

१३) मनस्ताप करणे टाळा:

छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारी चिडचिड, रागराग हे सोडून द्या. लहान सहान गोष्टीचा मनस्ताप करण्यापेक्षा शांत राहण्याचा सराव करा. जेवढे शांत राहता येईल तेवढा अधिक फायदा आपल्यालाच होईल.

१४) स्वतःवर प्रेम करा

स्वतःवर प्रेम करायला शिका. जेव्हा स्वतःची काळजी घ्याल, स्वतःच्या आवडीना प्राधान्य द्याल तेव्हा आपोआपच आनंदी राहू शकाल.

१५) नृत्य

प्रत्येकजण काही नृत्यकलेत पारंगत असणार नाही. पण वाजेल त्या संगीतावर मनसोक्त नृत्य केल्याने नक्कीच हलकं व मोकळे वाटेल.

१६) एकांतात जा

एकट्याने चालायला गेलो किंवा एकट्याने भ्रमंती केली तर माणूस स्वतःच्या अधिक जवळ जातो. एकटे असताना आपले विचार स्पष्ट होतात व आंतरिक शांती मिळते.

१७) नवनवीन गोष्टी शिका

माणूस मरेपर्यंत शिकत राहिला तरीही कधीच संपणार नाही एवढं शिकायला आहे या जगात! आणि शिकायला वयाची अट नाही.

आजच्या डिजिटल युगात तर नवीन गोष्टी शिकणे खूप सुकर झाले आहे. नवीन शिकत राहा त्यामुळे मेंदू कार्यक्षम राहण्यास मदत होईल.

१८) प्रेरणादायी पुस्तके वाचा

‘वाचाल तर वाचाल’. वाचन हा उत्तम छंद आहे. आपल्या वाचनात प्रेरणादायी पुस्तके व कथा यांचा समावेश केल्याने आपल्याला नवी ऊर्जा मिळत राहील.

१९) सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा

सोबत खूप महत्त्वाची आहे. आपण जशा लोकांसोबत राहतो तसे आपले विचार होत जातात. म्हणून नेहमी सकारत्मक विचार असणाऱ्या सोबतीची निवड करा. याने आपल्या आयुष्यावरही सकारात्मक प्रभाव पडेल.

२०) अपराधीपणा सोडा

मनात एखाद्या गोष्टीची खंत घर करून असेल तर त्याचा त्रास होतोच. जे झाले ते बदलता येणार नाही असा विचार करून अपराधी भावना सोडून द्या.

त्याऐवजी सर्वकाही मंगल होण्याची प्रार्थना करा, प्रार्थनेत देखील खूप शक्ती असते.

काही नवीन सवयी लावून, काही जुन्या सवयी सोडून आपण मनःशांती मिळवू शकतो.

नकारात्मक विचारा पासून लांब जायचे तर जीवनात थोडे थोडे बदल करावे लागतील. पुढे चालत राहा व आशावादी वृत्ती ठेवा. आयुष्य सुंदर आहे.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय