हसरे, खेळकर निरोगी बाळ जन्माला घालण्यासाठी गर्भसंस्कार कसे करावे?

संस्कार म्हणजे इच्छित असे चांगले बदल घडवून आणणे. याचा दुसरा अर्थ शुद्धीकरण असा आहे.

भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे संस्कार दिसून येतात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध संस्कार वर्णन केले आहेत.

अन्न शिजवताना आपण भाजणे, तळणे अशा विविध प्रक्रिया करतो. मातीपासून मडके तयार करताना कुंभार त्या मातीवर भिजविणे, आगीत भाजणे अशा अनेक कृती करतो तेव्हा कुठे मातीच्या गोळ्याला मडक्याचा आकार येतो.

याचप्रमाणे आईच्या गर्भात वाढत असलेल्या बालकावर केले जाणारे संस्कार म्हणजे गर्भसंस्कार.

गर्भसंस्कारांचे महत्त्व काय

प्रत्येक आईवडीलांना वाटते की माझे मूल सुदृढ, बुद्धीमान, गोंडस असावे. पण यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतात.

जसे पीक चांगले येण्यासाठी जमिनीची मशागत करतात, उत्तम प्रतीचे बियाणे वापरतात, लहान रोपांची काळजीपूर्वक देखभाल केल्यानंतर मग छान पीक येते. अगदी तसेच याबाबत आहे.

गर्भसंस्कार कधी करावेत

गर्भाशय आणि इतर अवयवांचे शुद्धीकरण करणे, गर्भधारणेची शारीरिक तयारी करणे हे झाले गर्भपूर्व संस्कार.

गर्भधारणा झाली की आईने सजगतेने आहार, व्यायाम, मानसिक स्वास्थ्य यांची काळजी घेतली की मग मनाप्रमाणे छान संतती जन्माला येते.

गर्भसंस्कार कधी करावेत

जेव्हा एखादे जोडपे मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेते तेव्हापासूनच गर्भसंस्कार करण्याची सुरुवात होते.

यात सर्वप्रथम स्त्री व पुरुष दोघांनीही आपल्या शारीरिक तपासण्या करून घ्याव्यात.

डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या किंवा आवश्यक असल्यास औषधे घ्यावीत. आयुर्वेद शास्त्रानुसार शरीरशुद्धीसाठी पंचकर्म उपचार करून घ्यावेत.

यामुळे शरीरातील दोष बाहेर पडतात. यानंतर गर्भधारणेसाठी प्रयत्न करावे.

गर्भाशयात गर्भ राहिला की या संस्कारांचा पुढील टप्पा सुरू होतो.

गर्भिणीने कोणती काळजी घ्यावी

गरोदरपणातील नऊ महिन्यांचा काळ तीन टप्प्यांत विभागला आहे. यात प्रथम तीन, मधले तीन आणि शेवटचे तीन महिने अशी सुटसुटीत रचना केली आहे. जसजशी बाळाची वाढ होते त्यानुसार आईच्या आहार, व्यायाम या गरजा बदलतात.

हे सर्व लक्षात घेऊन ही विभागणी केली आहे.

१. पहिले तीन महिने गर्भ अस्थिर असतो त्यामुळे जास्त प्रवास, अती व्यायाम करु नये पण दैनंदिन कामे जरूर करावीत. या काळात मळमळ, उलटी असा त्रास होऊ शकतो म्हणून आहार हलका असावा.

दुध आणि दुधाचे पदार्थ जसे की खीर, पायस, द्रवपदार्थ जास्त प्रमाणात सेवन करावे.

२. मधल्या तिमाहीत गर्भ हळूहळू स्थिर होऊ लागतो, उलट्यांचा त्रास कमी होतो, भूक वाढते.

या काळात बाळाचे वजन वाढू लागते म्हणून लोणी, खडीसाखर, सुकामेवा असा पौष्टिक आहार घ्यावा.

हलकाफुलका व्यायाम करावा. योग्य मार्गदर्शन घेऊन योगासने करावीत. यामुळे शरीर आणि मन उत्साही रहाते.

३. शेवटच्या टप्प्यात बाळाचे वजन पूर्ण वाढते. त्याच्या हालचाली जाणवू लागतात. आईचे शरीर अवघडते, वजन वाढते. या काळात जास्त व्यायाम जमत नाही तेव्हा चालण्याचा व्यायाम तरी नक्कीच करावा. प्राणायाम, ध्यानधारणा याद्वारे मन शांत ठेवून नियमित प्रार्थना करावी. मंत्रोच्चार करावे.

गर्भसंस्कार आणि आपली संस्कृती

गर्भाला भावना असतात. आवाज ओळखणे, प्रतिसाद देणे अशा क्रीया गर्भ करत असतो. महाभारतातील अभिमन्यूची गोष्ट याचेच उदाहरण आहे.

आता या विषयावर वैज्ञानिक संशोधन सुरू आहे. ओंकाराचा उच्चार केला असता गर्भ त्यास प्रतिसाद देतो. ओंकाराच्या ध्वनी लहरी गर्भाला शांत करण्यासाठी उपयुक्त आहेत हे सिद्ध करणारे अनेक प्रयोग झाले आहेत.या प्रयोगांचे निरीक्षण, नोंदी अतिशय सकारात्मक आहेत.

गर्भसंस्कारातील काही प्रमुख उपचार

१. संगीतोपचार शास्त्रीय संगीतातील काही विशिष्ट राग आईने ऐकले तर गर्भाची वाढ चांगली होते. याचप्रमाणे काही प्रार्थना, नियमित ओंकार, मंत्रजप यामुळे आईची मानसिक स्थिती संतुलित रहाते आणि निश्चितच याचा चांगला परिणाम बाळावर होतो.

२. सकारात्मक पुस्तके, धार्मिक विषयांचे पठण, थोर व्यक्तींचे आत्मचरित्र वाचणे यामुळे मन: स्वास्थ्य सुधारते. याचाही खूप छान उपयोग होतो.

३. मानसिक संकल्प आपल्या अंतर्मनाची ताकद विलक्षण आहे. जर नियमितपणे ठराविक वेळी सकारात्मक संकल्पाचे उच्चारण केले तर त्याचा चांगला प्रभाव दिसून येतो. योगशास्त्रामध्ये योगनिद्रा हे याचेच उदाहरण आहे. जर आईने रोज ध्यानावस्थेत बसून, आपल्या पोटावर हात ठेवून बाळाचे उत्तम आरोग्य, सुखरूप प्रसूती यासाठी संकल्प केला तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.

गर्भसंस्कार आणि कुटुंबाची जबाबदारी

जरी बाळ आईच्या पोटात वाढत असले तरी त्याच्या रक्षणाची, संगोपनाची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाची असते. आईसोबतच जर बाळाच्या वडिलांनी हे संस्कार समजून घेऊन त्यात आनंदाने सहभाग घेतला तर गरोदर स्त्रीला खूप समाधान वाटते.

आपला जोडीदार प्रत्येक प्रसंगात आपल्या सोबत आहे ही भावना सुखावणारी असते.

या काळात कुटुंबातील सर्वांनी होणाऱ्या आईचे खाणेपिणे, आराम यावर विशेष लक्ष द्यावे. घरात अनावश्यक वाद टाळून वातावरण आनंदी राहील याची काळजी घ्यावी.

आधुनिक काळात गर्भसंस्काराचे महत्त्व

पूर्वी एकत्र कुटुंबात घरात खूप अनुभवी, जाणती माणसे असायची. ती गरोदर स्त्रीला आपले अनुभव सांगत, आधार देत.

पण आता कुटुंबात माणसे कमी किंबहुना फक्त नवरा बायकोच असतात. अशा वेळी पुस्तके वाचून गर्भसंस्कार समजून घ्यावेत.

आपल्या डॉक्टरांशी वेळोवेळी चर्चा करून शंका दूर कराव्यात.

आजकाल सर्रास खाल्ले जाणारे पॅकेज फूड, रेडी टू कूक पदार्थ कटाक्षाने टाळावेत. घरगुती, ताजे, सात्विक अन्न, योग्य व्यायाम आणि मनाला आनंद देणारे, शांत, भक्तिसंगीत ऐकावे.

कामाचा जास्त ताण न घेता आपल्या प्रत्येक दिवसाचे योग्य नियोजन करून त्यानुसार कामे करावीत.

हिंसा, भडक दृष्ये दाखवणारे कोणतेही कार्यक्रम पाहू नयेत.

गर्भारपणाचे दिवस हे निसर्गाने आपल्याला दिलेले वरदान आहे असे समजून या काळाचा पूर्ण आनंद घ्यावा. आणि सुखकर प्रसूतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत.

मग हसरे, खेळकर, निरोगी बाळ निश्चितच आपल्या कुशीत येईल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “हसरे, खेळकर निरोगी बाळ जन्माला घालण्यासाठी गर्भसंस्कार कसे करावे?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय