अवचेतन मनाचं प्रोग्रामिंग

डॉ. अब्दुल कलाम आझाद यांचे एक सुंदर कोट आहे इंग्रजी मध्ये… ‘तुम्ही तुमचे भविष्य बदलु शकत नाही. पण तुम्ही तुमच्या सवयी बदलु शकता, त्या सवयी तुमचं भविष्य बदलतील.’

चांगल्या सवयी आपल्याला लहानपणी आई-वडील, गुरूजन लावतात.

उदा.लवकर उठणे, नीट-नेटके राहणे, नियमित अभ्यास करणे, वडीलधाऱ्यांशी नम्रपणे वागणे, खोटं बोलु नये, ईत्यादी.

हळूहळू काळाच्या ओघात काही सवयी टिकून राहतात तर काहींचा विसर पडतो. कधी कधी कोणी वाईट सवयी लागुन भरकटला जातो. आपण नेहमी दिवसातून एकदा तरी स्वतः कडे बघायला हवे.

या सवयी म्हणजे आपल्या अवचेतन मनाचं प्रोग्रामिंग आहे. यशस्वी लोकांचे आत्मचरित्र वाचलं तर लक्षात येईल की त्यांनी आपल्या अवचेतन मनाचा पुरेपूर फायदा करून घेतला आहे.

‘अवचेतन मन’ हा एक आज्ञाधारी सेवक आहे. तुम्ही जसं सांगाल ते तो निमूटपणे ऐकतो आणि आपलं कार्य चोख बजावतो. ‘चेतन मन’ हा आपले तर्क लावत बसणार, तुम्ही जे सांगाल ते स्वानुभवातून ठोकताळे बांधून सांगणार.

उदाहरणार्थ : समजा तुम्ही लवकर उठत नसाल. पण तुम्ही हे नक्की अनुभवले असणार, की तुम्हाला एखाद्या दिवशी सकाळीच मस्त आपल्या मित्रांसोबत सहलीसाठी निघायचे आहे. तुम्हाला मित्र सारखे बजावतात की लवकर उठून तयार रहा हं. मागच्यावेळी तुझ्या मुळे उशीर झाला होता. तुम्ही पण ‘हो या वेळी मी नक्कीच वेळेवर तयार राहतो.’ असं म्हणुन, मग स्वतःला सुद्धा बजावता की उद्या अगदी काही झाले तरी सकाळी पाचला उठायचे म्हणजे उठायचेच.

त्यासाठी तुम्ही गजर लावता, घरच्यांना सांगुन ठेवता, उद्या सकाळी लवकर उठायचे म्हणून लवकर झोपता आणि झोपते वेळी पुन्हा स्वतःला बजावता की आपण उठून गजर बंद करून झोपायचे नाही, उठायचे म्हणजे उठायचेच. हे तुमच्या अवचेतन मनाने रेकॉर्ड करून ठेवले.

बरोबर तुम्हाला सकाळी गजर होण्याआधीच जाग येते. तुम्ही घड्याळ पाहता पाचला अजून पाच मिनिटे अवकाश असतो. तुमचं ‘चेतन मन’ तर्क लावणं सुरू करतं…

झोप थोडावेळ अजून, पाच मिनिटे बाकी आहेत, होईल गजर वेळेवर, नाही तर आई उठवेलच. पण तुमचे ‘अवचेतन मन’ तुम्हाला आठवण करून देतं… ‘नको.. नको… आता झोपला तर मागच्या वेळेसारखा उशीर होईल.

गजर बंद करून झोपु नको.’ मग तुम्ही उठून वेळेत तयार होता.

दुसरं उदाहरण असं, तुम्हाला लहानपणी कोणी विचारले, की तुला मोठं होऊन काय बनायचं आहे ? तर कोणी म्हणतं मला हिरो व्हायचे आहे तर कोणी डॉक्टर, इंजिनिअर, साईंटीस्ट, इ.

पण हळूहळू ती स्वप्न पुसट होत जातात आणि आपण जे बोलतो त्याच्या पेक्षा भलत्याच प्रोफेशन मध्ये असतो.

असं का होतं? कारण, काही व्यक्ती जे ठरवतात ते भविष्यात प्राप्त करतात. मग आपण का मागे पडतो माहित आहे ?

कारण, आपण आपल्या मनाला सांगतो की मला हिरो व्हायचे आहे. मग आपण त्या बाबतीत ज्ञान गोळा करण्यास सुरुवात करतो.

आजूबाजूच्या लोकांकडून माहिती मिळवतो, ते त्यांच्या अनुभवाने किंवा विचाराने सांगतात.

मग आपले ‘चेतन मन’ तर्क बांधण्यास सुरुवात करून आपल्याला आपल्या स्वप्नापासून दूर नेण्याचा १००% प्रयत्न करतं….

मी काही येवढाही चांगला नाही दिसत, माझ्या पेक्षा चांगल्या दिसणाऱ्या लोकांकडे काम नाही, आपली ओळखी सुद्धा नाही इंडस्ट्रीत, ईत्यादी. मग आपण मागे हटतो.

एखादी गोष्ट आपण जेव्हा वारंवार म्हणतो, तेव्हा ती आपल्या अवचेतन मनात घर करून बसते. जर एखाद्या घरात एखाद्या मुलीला/मुलाला रोज हेच ऐकायला मिळाले की तुला काहीच समजत नाही, तु मुर्ख, तु आयुष्यात कधीच काही करू शकणार नाही.

यामुळे ती व्यक्ती स्वतःला तसंच समजायला लागते. म्हणून अवचेतन मनाला वारंवार सकारात्मक गोष्टी सांगा.

आपण वारंवार हे मनाला सांगितले, की मला यशस्वी हिरो बनायचेच आहे. तुम्हाला शाहरुख खानचा डायलॉग माहीत असेलच की “अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुम से मिलाने में लग जाती है.” आणि हेच कार्य अवचेतन मन करतं.

तुम्हाला वारंवार तुमच्या स्वप्नाची आठवण करून देतं. तुम्ही मार्ग शोधू लागता. त्या दिशेने वाटचाल करत पुढे जाता, एक एक सोअर्सेस मिळत जातात.

यावरून आता विचार करा की जर आपण आपल्या अवचेतन मनाला वळण लावलं तर आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल की नाही?

पण कसं? असा प्रश्न नक्की मनात येणार.

तर आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, त्या तुम्हाला अंमलात आणायच्या आहेत.

१. ध्येय निश्चित करा आणि वहीमध्ये नोंद करून ठेवा

याचबरोबर ध्येय गाठण्यासाठी काय काय करावं लागणार आहे, ते सुद्धा लिहा.

त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांची जीवनशैली कशी आहे, त्यांनी यश कसं संपादन केले हे आपल्या डायरीत लिहून ठेवा.

२. सकाळी लवकर उठा

रात्री झोपताना आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचेच आहे, हे मनाला सांगा. सकाळी आपलं चेतन-मन इतकं ॲक्टीव्ह् नसतं.

त्यामुळे तुम्ही जे ठरवाल ते सरळ तुमच्या अवचेतन मनात जाईल. अवचेतन मन सदैव जागरूक असतं.

३. ब्रम्हमुहूर्ताचा सदुपयोग करा

सकाळी लवकर उठाल्याने आपल्याला दिवसातला जास्त वेळ मिळेल.

सकाळी चार ते साडे-पाच पर्यंतचा काळ ब्रम्ह मुहूर्त मानला जातो. हा काळ झोपेचा त्याग करण्यासाठी सर्वोत्तम आहे.

ब्रम्ह मुहुर्तामध्ये उठल्याने आपल्याला शक्ती, विद्या, बुद्धि आणि निरोगी आयुष्याची प्राप्ती होते.

आपल्या ध्येयासाठी आज दिवसभरात काय करायचे आहे, ते थोडक्यात लिहून ठेवा.

४. सकारात्मक विचार ठेवा

त्या अनुसार आपला दिवस कारणी लावा. हळूहळू मार्ग सापडत जातील, असा सकारात्मक विचार करा. कोणतेच किंतु-परंतु मनात येऊ देऊ नका.

५. रात्री झोपताना पूर्ण दिवसाचा आढावा घ्या

रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात ठरवलेल्या कामापैकी किती काम झाले, हे तपासा. ते झाले त्या बद्दल स्वतःला शाबासकी द्या आणि जे नाही झाली, त्याची कारणं शोधून म्हणजे दुसऱ्या दिवशी व्यवस्थित पार पडतील, याची दक्षता घ्या.

६. तुमचे इच्छित ध्येय पूर्ण झाले आहे असे दृश्य डोळ्यासमोर आणा

पुन्हा आपले ध्येय डोळ्यासमोर आणा. तुम्ही तुमचे स्वप्न पुर्ण झालं आहे, हे दृश्य डोळ्यासमोर आणा आणि मग झोपा.

या अगदी सोप्या आणि सहज होणाऱ्या गोष्टी आहेत. रोज केल्याने त्या अंगवळणी पडतील आणि त्या तुमच्या सवयी बनतील.

याच सवयी तुमचं नशिब बदलतील, म्हणजे डॉ कलाम यांनी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे.

मग वाट कसली बघताय… शुभस्य शिघ्रम !!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “अवचेतन मनाचं प्रोग्रामिंग”

  1. धन्यवाद आणि आपल्या या उपक्रमाला खुप साऱ्या शुभेच्छा !

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय