मास्टर माईंड म्हणून तुमचा भाव वाढवतील गणिताच्या या तीन ट्रिक्स!

मित्रांनो, आज खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आकड्यांची गंमत.

खरं तर आपल्यापैकी अनेकांना गणित हा विषय आवडत नाही. त्यातली आकडेमोड, समीकरणं अगदी क्लिष्ट वाटतात. आणि मग या गणितापासून दूर कसं पळता येईल, हा विषय कसा टाळता येईल हेच आपण बघतो.

पण जर आकड्यांशी मैत्री केली तर मग मात्र हाच विषय अगदी छान वाटतो. जादूच्या खेळाप्रमाणेच हसतखेळत जर का आपण गणितातील काही ट्रिक्स शिकलो तर हे आकडे जादुई वाटतात.

आज अशाच आकड्यांच्या तीन प्रकारच्या गंमती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या शिकून घेताना तुम्हाला खूप मजा येईल. आणि मित्रमंडळींना ही गंमत दाखवलीत की ते सुद्धा आश्चर्याने बघतच बसतील. अर्थात मास्टर माईंड म्हणून तुमचा भाव वाढेल हे निश्चित !!!

मग पाहूया तर या तीन गणिती ट्रिक्स!!!

यात एका विशिष्ट क्रमाने आकडे मांडले आहेत. १ ते ९ हे आकडे घेऊन त्यांच्या इनपुट, आऊटपुट मधून पहा किती वेगवेगळी उत्तरे मिळतात.

१. १ ते ९ आणि ९ ते १

१ × ८ + १ = ९
१२ × ८ + २ = ९८
१२३ × ८ + ३ = ९८७
१२३४ × ८ + ४ = ९८७६
१२३४५ × ८ + ५ = ९८७६५
१२३४५६ × ८ + ६ = ९८७६५४
१२३४५६७ × ८ + ७ = ९८७६५४३
१२३४५६७८ × ८ + ८ = ९८७६५४३२
१२३४५६७८९ × ८ + ९ = ९८७६५४३२१

गंमत लक्षात आली का? डाव्या बाजूला एक ते नऊ आकडे क्रमाने वाढवत नेले की उजव्या बाजूला उत्तरांचे आकडे ९ ते १ या उतरत्या क्रमाने दिसतात. प्रत्येक संख्येला आठने गुणले आहे. आणि बेरजेचा आकडा १ ते ९ असा वाढवत नेला आहे.

२. आता पाहूया १ आकड्याची गंमत.

१ × ९ + २ = ११
१२ × ९ + ३ = १११
१२३ × ९ + ४ = ११११
१२३४ × ९ + ५ = १११११
१२३४५ × ९ + ६ = ११११११
१२३४५६ × ९ + ७ = १११११११
१२३४५६७ × ९ + ८ = ११११११११
१२३४५६७८ × ९ + ९ = १११११११११
१२३४५६७८९ × ९ + १० = ११११११११११

यात डाव्या बाजूला १ ते ९ आकडे वाढत जातात पण उत्तरात मात्र १ हाच आकडा दिसतो. ११, १११, ११११ या प्रकारे ही संख्या वाढत जाते.

३. आता पाहूया पुन्हा १ आकड्याची कमाल.

१ × १ = १
११ × ११ = १२१
१११ × १११ = १२३२१
११११ × ११११ = १२३४३२१
१११११ × १११११ = १२३४५४३२१
११११११ × ११११११ = १२३४५६५४३२१
१११११११ × १११११११ = १२३४५६७६५४३२१
११११११११ × ११११११११ = १२३४५६७८७६५४३२१
१११११११११ × १११११११११ = १२३४५६७८९८७६५४३२१

यात डाव्या बाजूला फक्त वाढत्या क्रमाने १ हा आकडा दिसतो मात्र उत्तरात १ पासून ९ पर्यंत आणि पुन्हा उतरत्या क्रमाने आकडे दिसतात.

मित्रांनो आवडला का तुम्हाला हा आकड्यांचा खेळ ?

जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय