त्राटक – मेडीटेशनचा एक प्रकार! आणि त्राटक कसे करावे?

त्राटक

खुप दिवसांपुर्वी, एकदा एका संमोहनासंबंधीच्या व्हिडीओमध्ये मी अचानक ‘त्राटक’ नावाचा शब्द ऐकला.

एक तासाचा तो पुर्ण व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहुनही मला कळेचना, नेमके त्राटक म्हणजे काय ते?

मग त्राटक ह्या शब्दावर कित्येक दिवस माझे संशोधन सुरु होते, आधी वेगवेगळ्या लोकांकडुन ते समजुन घेणे आणि मग त्यांनी सांगीतलेल्या वेगवेगळ्या गोष्टी अंमलात आणुन, स्वतः त्याचे अनुभव घेणे.

कित्येक महीने रोज मी त्राटक करुन बघु लागलो.

नवीन नवीन असताना तर त्राटक करायला खुपच, गंमत यायची.

त्राटक, ध्यान, स्वसंमोहन आणि व्हिज्युअलायझेशन ह्यांच्यामुळेच मला खुप फायदा झाला.

चला, जाणुन घेऊया!

त्राटक म्हणजे काय?

एका सुक्ष्म गोष्टीकडे दिर्घवेळ टक लावुन बघणे, म्हणजे त्राटक!…

एका विशिष्ट बिंदुवर एकाग्रता साधणे, म्हणजे त्राटक!

एक पांढरा कागद घ्या, त्यावर एक आठ आण्याच्या आकाराचा, काळा ठिपका काढा, बसल्यावर आपल्या नजरेच्या समोर राहील, अशा पद्धतीने हा कागद भिंतीवर चिटकवा.

खोली निवडताना, ती एकांतपुर्ण असावी, अशी निवडा. तिथे शांतता असावी, मंद सुवास असावा, मंद संगीतही चालेल.

सर्व कामे आटोपुन त्या जागी बसा, मोबाईल सायलेंट करा, लॅंडलाईन फोन असेल तर बाजुला काढुन ठेवा, तेवढ्या वेळासाठी जगापासुन डिसकनेक्ट व्हा!..

जवळ एका वाटीत पाणी आणि ओला रुमाल घेऊन बसा.

तुम्हाला अर्धा तास त्राटक करायचं असल्यास, वेळ कळावी, म्हणुन सुरुवातीला अलार्म लावु शकता.

मग टक्क डोळे उघडे ठेवुन, एकाग्रपणे त्या बिंदुकडे पहात रहा.

मनात जे विचार येतील, येवु द्या

कधी कधी दोन-पाच मिनीटातच खुप कंटाळवाणं वाटु लागेल, चंचल मनाच्या लोकांचं मन चुळबुळ करु लागेल.

त्राटक सोडण्याची इच्छा होईल.

दोन भुवयांच्या मध्ये असलेलं आज्ञाचक्र जागृत होईल, एखाद्याचं डोकं जड पडेल, दुसर्‍या कोणाच्या शरीरात, संवेदना निर्माण होतील.

थोड्या वेळाने डोळ्यातुन पाणी यायची सुरुवात होईल. पाण्यासोबत डोळ्यातुन अस्वच्छताही वाहुन जाईल.

दहा पंधरा मिनीटे जर तुम्ही सस्टेन करु शकलात तर मग खरी मजा सुरु होईल.

सगळे विचार शुन्य होतील, सर्व शरीर शिथील होईल. तुम्ही जागृत असला पण मन अर्धनिद्रीत अवस्थेत पोहचलेलं असेल.

मनाची अल्फा अवस्था असते ती हीच!

शरीराचा आणि मनाचा संबंध तुटतो. इंद्रिये काम करतात पण, आणि सगळ्या इंद्रियांचा ताबा सुटतो पण!

तिचे वर्णन ऐकुन समजणार नाही, ती स्थिती अनुभवावीच लागेल.

एखाद्याला त्या बिंदुकडे पाहत असताना वेगवेगळे भास होवु शकतात. हे सर्व मनाचे खेळ असतात.

त्राटक करुन उठल्यावर विचारांची, काळजीची आणि टेन्शनची शृंखला तुटते.

मन फ्रेश होते.

त्राटकाचे प्रकार कोणकोणते?

१) बिंदु त्राटक – भिंतीवर असलेल्या ठिपक्याकडे, किंवा कर्व्ह लाईन्स असलेल्या डिझाईनच्या अंतर्भागी असलेल्या बिंदुकडे एकटक पाहणं, याला बिंदु त्राटक म्हणतात.

याला थर्ड आय एक्टीव्हेशन असेही म्हणतात. कागदावर स्थिर असलेली डिझाईन सतत काही मिनीटे एकाग्रतेने पाहील्यामुळे गोल गोल फिरल्याचा आभास होतो.

२) तारा त्राटक – जर तुमच्याकडे एकांत असलेली रुम नसेल, तर तुम्ही रात्रीच्या वेळी गच्चीवर जाऊन आरामखुर्ची वर झोपा. एक तारा निवडा. आता त्याच्याकडे एकटक बघत रहा.

३) ज्योती त्राटक – यात मेणबत्तीच्या ज्योतीवर चित्त एकाग्र करतात. खुप मजा येते.

ज्योतीचे तीन भाग असतात, लाल, पिवळा आणि निळा.

प्रत्येक हवेच्या झोताबरोबर तिचे हेलकावे खाणं, बघत रहा!

कित्येक मिनीटांनंतर तर ज्योत वेगवेगळ्या प्रकाराचे आकार धारण करते. सरावाने नंतर वेळ कसा गेला हे कळत नाही.

मी वापरलेला, आणि मला सर्वात जास्त आवडलेला प्रकार आहे हा!

४) प्रतिबिंब त्राटक – हे आरशात बघुन करायचे असते, स्वतःच्या डोळ्यात एकटक बघत! हे मी जास्त कधी करुन बघितले नाही. मला माझ्या कडे बघितले की हसु येते. कारण मी पुन्हा कधी सांगेन.

२१ दिवस नियमित त्राटक केल्यास बदल होण्याची सुरुवात होते.

त्राटक केल्याचे फायदे

  • त्राटक केल्याने एकाग्रता वाढते. फोकस डेव्हलप होतो. उदा. वाचलेले चटकन समजते.
  • मन निर्मळ होते. जुनी ओझी नष्ट होतात. आतमध्ये आनंदाचे झरे फुटतात.
  • डोळे नितळ झाल्याने, चेहरा सुंदर दिसु लागतो. व्यक्तिमत्व प्रभावी बनते.
  • डोळ्यात तेज निर्माण होते. जेव्हा आपण एखाद्याच्या डोळ्यात डोळे घालुन बोलतो, तेव्हा आपण दिलेली आज्ञा त्याला नाकारता येत नाही.
  • त्राटक करणार्‍या माणसांनी अगदी अनोळखी लोकांच्या डोळ्यात डोळे घालुन मनातल्या मनात आज्ञा दिल्यास सुद्धा ते आपलेसे होतात.
  • त्राटक, ध्यान केल्याने ऑरा म्हणजे आपल्या भवतीचे वलय स्वच्छ होतात. आपोआपच आपण शुभ गोष्टींना आकर्षित करुन घेतो. अशुभ, अनिष्ठ घटना आणि माणसं आपल्यापासुन दुर दुर पळतात.
  • चिडचिड, निराशा संपते.
  • नवनव्या कल्पना सुचु लागतात.
  • काही वर्ष त्राटक केल्यावर डोळ्यांमध्ये सुपरपावर येते, असं म्हणतात. चमत्कार घडवता येतात, असेही लोकांचे अनुभव आहेत.

उदा. मोकळ्या रस्त्यावर आत्मे दिसतात, किंवा तांदळाच्या दाण्याला फक्त नजरेने पाहुन बाजुला सरकवता येते, असे म्हणतात. 😄

(मला वैयक्तीक असला काही अनुभव आलेला नाही, आणि आजमवण्याची इच्छाही नाही. आपल्याला ही साधने फक्त मानसिक शांतीसाठी वापरायची आहेत, हा माझा द्रुष्टीकोन आहे.)

ध्यान करणार्‍या लोकांना त्राटक करणे सोपे जाते.

त्राटक, ध्यान, समाधी, कुंडलिनी जागृती, शक्तिपात, स्वसंमोहन, रेकी, एनएलपी किंवा सिल्व्हा मेथड ऑफ माईंड कंट्रोल, ह्या गोष्टींमध्ये प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात.

गंमत म्हणजे ह्या गोष्टीत सिद्धी प्राप्त झालेली एक्सपर्ट माणसं पुर्ण सत्य कधीही सांगत नाहीत, किंवा त्यांना ते शब्दांत वर्णन करुन सांगता येत नसेल बहुतेक.

तुम्हाला ह्यात इंट्रेस्ट असल्यास, तुम्हीही ह्या टेक्निक वापरा, आणि वेगवेगळे मजेशीर अनुभव घ्या. पहिल्यांदा त्राटक करत असाल तर सुरवातीला पाच मिनिटेच त्राटक करा, मग हळूहळू वेळ वाढवत न्या!

मला तुमचे अनुभव ऐकायला आवडतील.

सूचना: काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्राटक करण्याचे प्रमाण आणि कृती जर चुकली तर भ्रमिष्ट होणे, नजर जाणे आदि गोष्टी घडल्या आहेत, आणि हे प्रयोग समर्थ गुरु, शिक्षक यांचे निरीक्षणात शिकावेत. येथे हा लेख वाचकांच्या माहितीसाठी देण्यात आला आहे.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

6 Responses

  1. Suraj Jawale says:

    खूप सुंदर माहिती दिली आहे, पण शेवटी थोडी भीती ही निर्माण केली आहे ती म्हणजे भ्रमिष्ट ही होतात ती तर त्याबाबत ही मार्गदर्शन व्हावे.

  2. Rupali says:

    eka vatit pani ani ola rumal ka gheun basaycha. he hi sangitla nahi.

    • Nikhil Ithape says:

      पाणी डोळे साफ करण्यासाठी आणि रुमाल डोळ्यात पाणी आलं कि पुसण्या साठी

    • sagar rasal says:

      dolyat pani aalyavar te pusnyasathi

  3. Preem says:

    रुमाल आणि पाणी कवळ का घेऊन बसायचं ते का नाही संगीतल

  4. Saurabh says:

    खूप मस्त माहिती आहे. आणि अनुभवी सुद्धा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!