रेडिओ- ऐंशी च्या दशकाची एक आठवण

आमच्या लहानग्या घरात याचे अनेक वर्षे वास्तव्य होते. घराच्या एका कोपऱ्यात Specially बनवून घेतलेल्या फळीवर बसलेला होता.

कोपऱ्यात असला तरी हा घरात असला तर एक Prestige असायचे त्या काळी.. प्रत्येकाचे याच्याशी आपले असे स्वतंत्र नाते असायचे. सकाळी प्रभात वंदन ने हा सुरू व्हायचा. मग घर पण चैतन्य आल्यासारखे सुरू व्हायचे.

अमुक एक कार्यकम सुरू झाला की माझं अमूक एक routin वर्क असायचं. म्हणजे रेडिओ time परफेक्ट. जणू बोलकं घडयाळ.

याच्याकडे कान ठेवून कामे सुरू असायची. कितीतरी मराठी भक्तिगीते, दुर्मिळ मराठी गीते मला याच्यामुळे समजली. आपली आवड, सांजधारा , बेला के फूल असे कितीतरी कार्यक्रम माझ्या खास लक्षात आहेत.

पाच पाच मिनिटांची filler सदरे असायची, कितीतरी माहिती देऊन जायची.

आजच्या सारखी माहिती सहज उपलब्ध नव्हती तेव्हा. पुस्तकं आणि वेळोवेळी बातम्या देणारा हा रेडिओ इतकीच महत्वाची साधने होती. प्रत्येकाचे आवडीचे असे रेडिओ स्टेशन असायचे. पुणे केंद्र, मुंबई केंद्र, सिलोन.. आपापल्या आवडीच्या कार्यक्रमासाठी आठवडाभर वाट पहायची पण तयारी असायची.

साडेनऊ ला लागणारे नभोनाट्य, बुधवारी लागणारे बिनाका गीतमाला हा तर सर्वांनी एकत्र आनंद घेण्याचा प्रकार. सारे कुटुंबच काय, तर शेजारी पाजारी सुद्धा कोंडाळे करून बसलेले दृश्य असायचे. आज आठवणीत गेलेले कितीतरी भावनिक क्षण कुठेतरी सगळ्यांच्याच आठवणीत असतील.. हाच काय पण प्रवासात, याचा छोटा भाऊ याची कमी भरून काढत असे.

मोठ्या दिमाखात याचे घरातले स्थान असायचे. मध्यमवर्गीय घरातली एक महत्वाची चीजवस्तू असायची. याच्यावर धूळ बसू न देणे, यावर एखादी छानशी फोटोफ्रेम ठेवणे, एखादा फ्लॉवरपॉटदेखील यावर छान विराजमान असायचा.

सुगृहिणीने हाताने विणलेला एखादा कलाकुसरीचा नमुना यावर छान अंथरलेला असायचा. एखादा महत्वाचा कागद, पत्र अजून काही आठवणीने नेण्याची वस्तू याच्याशेजारी छान सांभाळून ठेवलेली असायची.

हळू हळू चित्र बदलत गेले. मध्यम वर्गीय शिक्षण नोकरी या माध्यमातून उच्च मध्यमवर्गीय मध्ये बदलला, वाडा चाळ संस्कृती बदलत गेली आणि idot box असे म्हणत कानाबरोबर नेत्र सुखद माध्यम घराघरात basic need बनले. ह्याचा पसारा आता आटोपता झाला. काहींनी जुनी आठवण म्हणून जपला, तर काहींनी निरोप दिला.

आता तर घराच्या कोपऱ्यातून याचे स्थान handset मध्ये अल्पशा जागेत गेले. त्यातही नावीन्य आले, विविध चॅनेल्स आले आपापले अस्तित्व टिकवून ठेवण्याची स्पर्धा करू लागले. FM म्हणून लोक आजही आनंद घेत असले तरी त्या रेडिओ बॉक्सचा आनंद काही औरच होता.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय