सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन

करनियोजन

आणखी थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. करदात्यांना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्यांना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू या.

आपणास कर किती लागू शकतो याचा अंदाज घ्या. २०१७/१८ या आर्थिक वर्षासाठी सर्व मार्गाने मिळणारे ऐकूण करपात्र उत्पन्न ₹ २ लाख ५० हजारचे आत असेल तर आपणास कोणताही आयकर द्यावा लागत नाही. जर आपले वय 60हून अधिक असेल तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ₹ ३ लाख व आपण अतीवरीष्ठ नागरीक असाल म्हणजेच आपले वय ८० पेक्षा जास्त असेल तर ही मर्यादा ₹ ५ लाख एवढी आहे. लक्षात घ्या उत्पन्नावर कर आहे खर्चावर नाही (त्यासाठी GST आहे) आपले सर्व मार्गाने होणारे ऐकून उत्पन्न यासाठी विचारात घेणे जरुरीचे आहे. यातून बचत आणि गुंतवणूक केलेली एकूण विहीत मर्यादेतील रकमेची सूट घेवून निव्वळ करपात्र उत्पन्न काढता येते. यातील २.५ लाख ते ५ लाखापर्यतचे करपात्र उत्पन्नावर ५%, त्यावरील १० लाख रुपयापर्यंतचे करपात्र उत्पन्नावर ₹ १२५००+२०% आणि त्यावरील करपात्र उत्पन्नावर ₹ ११२५००+३०% या दराने आयकर लागतो. या एकूण करावर सरचार्ज म्हणून ३% दराने शिक्षण व उच्च शिक्षण कर द्यावा लागतो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाखांचेवर परंतू १ कोटीचे आत आहे त्या॑ना करावर १०% आणि १ कोटीहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना १५% अतिरिक्त सरचार्ज द्यावा लागतो. हा एकूण करदायित्वांवरील कर आहे (Tax on tax). तर ज्यांचे एकूण करपात्र उत्पन्न ₹ ५ लाख चे आत आहे त्याना आयकर अधिनियम ८७/ A अनुसार जास्तीत जास्त ₹ २५००/- ची कर सूट एकूण देय करात मिळू शकते. म्हणजेच एकूण करातून जास्तीत जास्त २५००/-रुपये कमी द्यावे लागतात.

आयकरासाठी ज्याप्रमाणे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो त्याचप्रमाणे विविध बचत आणि खर्च यांना विहित मर्यादेत सूट दिली जाते.

यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे —

 • विविध बचत गुंतवणूक योजना व खर्चाना मिळणाऱ्या सवलती: या मध्ये विहित मर्यादेत जमा केलेली रक्कम एकत्रित उत्पन्नातून कमी होत असल्याने एकूण करदायित्व कमी होते. आयकर अधिनियम ८०/C ,८०/CCC, ८०/CCD एकत्रित मिळून जास्तीत जास्त दीड लाख रुपए सूट मिळू शकते.८०/C ची सवलत मिळणाऱ्या अनेक योजना आहेत कंसात त्यावरील १ जानेवारी २०१८ ला मिळू शकणारे व्याजदर दिले आहेत यामध्ये (१) पी. एफ. वर्गणी (८.६५%, वी. पी. एफ. ८.६५%, पी. पी. एफ. (७.६%) मधील जमा केलेली रक्कम. (२) एन. एस. सी. (७.६%), एन. एस सी व्याज, ५ वर्ष मुदतीच्या करबचत मुदत ठेवी (जास्तीत जास्त ७.२५%). (३) वरीष्ठ नागरिक बचत योजना (८.३%) (४) सुकन्या समृध्धी योजना (८.१%). (५) विमा हप्ते. (६) गृहकर्ज मूद्दल (७) रजिस्टरेशन खर्च (८) दोन मुलांचा शैक्षणिक खर्च. (९) करबचतीच्या समभाग संलग्न योजना (E.L.S.S.) यांमधे जमा/खर्च केलेली रक्कम यांचा समावेश होतो.
  ८०/CCC मध्ये विमा कंपन्या व म्यूचुअल फंडाच्या पेन्शन योजनांचा समावेश होतो.
  ८०/CCD मधे केंद्रीय कर्मचाऱ्याच्या नवीन पेन्शन योजनेच्या वर्गणीचा समवेश होतो. यापैकी एक अथवा अनेक ठिकाणी जमा केलेली रक्कम जास्त होत असली तरी एकूण सूट दीड लाख एवढीच मिळते. २०१५ पासून ८०/ CCD(१-B) नुसार एन. पी. एस. मध्ये जमा केलेल्या ₹५००००/-रुपयांवर अतिरिक्त सूट मिळते अशाप्रकारे एकूण जास्तीत जास्त दोन लाख रुपये एवढी वजावट मिळू शकते .
 • आरोग्य सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसन योजनांवर मिळणाऱ्या सवलती: यामध्ये आयकर कलम ८०/D, ८०/DD, ८०/DDE, ८०/DU यांचा सामावेश होतो.
  ८०/D नुसार स्वतःचा, जोडीदाराचा आणि दोन मुलांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यापोटी भरलेल्या रकमेवर ₹ २५०००/- जमाकर्ता जेष्ठ नागरिक असेल तर ₹ ३००००/- पर्यत सूट मिळते त्याचप्रमाणे जमाकर्त्यावर अवलंबीत पालकांच्यासाठी भरलेल्या हप्त्यावर अतिरिक्त सूट मिळते तेव्हा या कलमानुसार किमान ₹ २५ ते कमाल ₹ ६० हजार रुपयांची सूट मिळू शकते.
  ८०/DD नुसार अवलंबीत अपंग जोडीदार, मूल, पालक,भाऊ बहीण यांचे वैद्यकीय उपचार, कल्याणकारी विमा योजनेचा भरलेला हप्ता यावर केलेला खर्च हा अपंगत्वाचे प्रमाणानुसार ₹७५ हजार ते ₹ १ लाख २५ पर्यंत आहे गृहित धरून सूट घेता येते यासाठी खर्चाच्या पुराव्याची कोणतीही गरज नाही.
  ८०/DDE या कलमानुसार स्वतः साठी, जोडीदारासाठी, मूल, अवलंबीत भाऊ बहीण आई वडील यांच्यावर काही विशिष्ठ आजारावर केलेल्या खर्चाबद्द्ल वयानुसार ₹ ४० ते ₹ ८० हजार रुपयांची सूट घेता येते.
  ८०/DU या कलमानुसार अपंग करदात्यास त्याच्या अपंगत्वाचे प्रमाणानुसार त्याच्या उत्पन्नातून ₹ ७५ हजार ते ₹ १ लाख २५ हजारांची सूट मिळू शकते.
 • विविध कर्जावरील व्याजावर मिळणारी सूट: यामध्ये आयकर कलम ८०/E , Section 24, ८०/EE यांचा समावेश होतो.
  ८०/E नुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी अथवा मुलांचे उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील
  व्याज कर्ज घेतल्यापासून ८ वर्षांपर्यंत कोणत्याही मर्यादेशिवाय सूट मिळण्यासाठी पात्र आहे.
  Section २४ नुसार गृहकर्जावरील व्याजाला जास्तीत जास्त २ लाख रुपयांची व घरदुरुस्ती कर्जावर ३० हजार रुपयांची सूट मिळते.
  ८०/EE नुसार पहिल्यांदा घरासाठी कर्ज घेणाऱ्या आणि एकमेव घर असणार्या व्यक्तीस ५० हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळते.
 • विविध दान आणि मदतनिधीस मिळणारी सूट: यामध्ये कलम ८०/G व ८०/GGC यांचा समावेश होतो.
  ८०/G नुसार मान्यताप्राप्त संस्था, न्यास यांना दिलेली एकूण उत्पन्नाच्या १०% मर्यादेत ५० ते १००%सूट मिळते.
  ८०/GGC नुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षास दिलेल्या देणगीतून एकूण उत्पन्नाच्या मर्यादेत ५०% पर्यंत सूट मिळते.
 • इतर काही कलमानुसार मिळणाऱ्या सवलती: यामध्ये ८०/GG ,८०/TTA यांचा समावेश होतो.
  ८०/GG मध्ये काही अटींची पूर्तता केल्यास दरमहा ५ हजार रुपये एवढी घरभाड्याची वाजवट मिळु शकते.
  ८०/TTA या कलमानुसार बचत खात्यातील रकमेवर मिळालेले १० हजार रुपयावरील व्याज करमुक्त आहे.
 • या ठळक तरतुदींशिवाय: शेअर खरेदीविक्रीतून काही अटींसह अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर मुळातून एस. टी. टी. कापला असेल सवलतीचे दराने १५% कर तर दीर्घ मुदतीचे भांडवली नफा करमुक्त आहे. भांडवल बाजारातील कंपन्यांनी दिलेला लाभांश करमुक्त आहे. वेगवेगळ्या पायाभूत सुविधा पूरवाणारे करमुक्त कर्जरोख्यावरील व्याज करमुक्त आहे.

या तरतुदीशिवाय इतर अनेक तरतुदीमुळे आपली करदेयता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. वर फक्त सर्वसमावेशक तरतुदींचा विचार केला आहे. यातील प्रत्येक तरतुदीवर स्वतंत्रपणे तपशीलवार लेख लिहिता येऊ शकेल.

या सर्व तरतुदी त्यातील अटींसह www.incometaxindia.gov.in या आयकर विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या पहाव्यात अथवा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. आपल्या करविषयक शंकांचे निराकरण आपण www.taxguru.in या संकेतस्थळावर प्रतिसाद देऊन करु शकता.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन”

 1. उदय सर . छान माहिती दिली..
  पण हा ८० GGC पाहून कमाल वाटली. हा तर भामट्यांनी भामट्यांसाठी केलेला कायदा झाला.

  Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय