चिनुक सी एच ४७ दोन टोकांवर पाती असणारं हे आगळं-वेगळं हेलिकॉप्टर

हॉलीवूड मधल्या युद्धावर आधारित चित्रपट बघताना त्यात दिसणारं दोन टोकावर चक्राकार फिरणारी पाती असणारं हेलिकॉप्टर नेहमीच माझं लक्ष वेधून घ्यायचं. आजवर हेलिकॉप्टर वर मध्यभागी अशी पाती प्रत्यक्षात फिरताना बघितली होती. (पुढे कामाच्या निमित्ताने जवळपास १०० पेक्षा जास्त वेळा हेलिकॉप्टर मध्ये बसण्याचा अनुभव आला तो भाग वेगळा.) पण असं दोन टोकावर पाती असणारं हेलिकॉप्टर मला आजही तितकंच आकर्षित करत होतं. पुढे ह्या बद्दल वाचल्यावर ह्या हेलिकॉप्टर ची माहिती मिळाली आणि अवाक झालो. ह्या वेगळ्या हेलिकॉप्टर चं नावं होतं बोईंग चिनुक सी एच ४७.

१९६० सालापासून अमेरिकी सैन्याचा भाग असलेलं आणि आजवर अनेक युद्धात ज्यात व्हिएतनाम, अफगाणीस्तान, लिबिया ही अमेरिकेने लढलेली युद्ध समाविष्ट आहेत, चिनुक ने आपलं महत्व सिद्ध केलेलं आहे. त्याशिवाय अनेक नैसर्गिक दुर्घटनांच्या वेळी लोकांना वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावलेलं चिनुक हेलिकॉप्टर हे जगातील एक नावाजलेलं हेलिकॉप्टर आहे. आता हे हेलिकॉप्टर भारतीय सैन्याचा भाग बनत आहे. भारताने अश्या १५ हेलिकॉप्टर ची ऑर्डर २०१५ साली बोईंग ला दिली होती. गेल्या आठवड्यात ह्यातली ४ हेलिकॉप्टरांची पहिली खेप गुजरात च्या मुंद्रा बंदरात आली आहे. भारतीय हवाई दलाला अश्या दमदार हेलिकॉप्टर ची प्रचंड गरज जाणवत होती. त्याला कारण म्हणजे भारतीय हवाई दलाकडे अजस्त्र किंवा मोठ्या हेलिकॉप्टर ची कमतरता होती, जे की सामानाची ने आण, युद्धाच्या वेळी अवघड ठिकाणी सैन्याची कुमक, दारुगोळा किंवा तोफा तसेच नैसर्गिक आणिबाणीच्या वेळी जास्त लोकांना एअर लिफ्ट करू शकते. भारताकडे रशियन बनावटीची ४ मिग २६ हेलिकॉप्टर होती पण त्यातलं सध्या एकच सर्विस मध्ये आहे. ही कमतरता भरून काढण्याची क्षमता चिनुक सी एच ४७ ची आहे.

चिनुक सी एच ४७ हे हेलिकॉप्टर चं नाव हे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथे आधी राहणाऱ्या चिनुक लोकांच्या जमातीवरून दिलं गेलं आहे. ह्याची निर्मिती बोईंग कंपनी ने केली आहे. आजवर १२०० पेक्षा जास्त चिनुक ची निर्मिती झालेली आहे. चिनुक हे वेगवेगळी पाती आणि रोटर असणारं हेलिकॉप्टर असून दोन्ही पाती शक्तिशाली अश्या टी ५५ – जीए- ७१४ए इंजिनांनी फिरवली जातात. दोन्ही इंजिन मिळून चिनुक तब्बल ९.६ टन (९६०० किलोग्राम ) वजन उचलू शकते. ज्यात माणसं, दारुगोळा, तोफा, इंधन, पाणी, इतर सर्व रसद असणाऱ्या गोष्टी समाविष्ट आहेत. इतकं वजन उचलून ३०० किमी./ तास ह्या वेगाने हवेतून मार्गक्रमण करून एकाच उड्डाणात ६५० किलोमीटरचं अंतर कापण्यात सक्षम आहे. ह्यावर एम २४० मशीनगन असून शत्रूचा वेध घेण्यात अचूक मानली जाते. ह्यावर चॅफ बसवलेले असून ह्याचा उपयोग रडार पासून लपून राहण्यासाठी केला जातो तसेच ह्यात फ्लेअर्स बसवलेले असून क्षेपणास्त्रांना चुकवण्यात ह्यांचा उपयोग केला जातो.

चिनुक हेलिकॉप्टर ला अधिक वेगळं बनवतात ते त्याची दोन इंजिनं आणि दोन वेगळे रोटर,पाती. चिनुक ची हीच खासियत त्याला इतकं प्रचंड वजन वाहून नेण्यात सक्षम बनवते. कोणत्याही हेलिकॉप्टर ला हवेत उभं करणं हे सगळ्यात कठीण मानलं जातं. कारण हवेत शांत स्थितीत सेंटर ऑफ ग्राव्हीटी सांभाळणे हे सगळ्यात कठीण असते. हवेतील हालचालीमुळे हेलिकॉप्टर ची सेंटर ऑफ ग्राव्हीटी बदलत असते. जितकं वजन जास्ती तितकचं त्याला हवेत स्थिर करणे कठीण असते. ज्यावेळी हेलिकॉप्टर च वापर हा सामान, लोक नेण्यासाठी युद्धात केला जातो. तेव्हा सामानाची चढ उतार हवेतल्या हवेत करताना हेलिकॉप्टरच्या वजनात आणि त्याजोगे सेंटर ऑफ ग्राव्हीटी मध्ये कमालीचा फरक पडत असतो. अश्या वेळेस त्याला स्थिर ठेवताना पायलट आणि इंजिन ह्याच्यावर कमालीचा दबाव असतो. चिनुकचे दोन वेगळे रोटर आणि इंजिन अश्या महत्वाच्या वेळी चिनुकला एक कमालीची स्थिरता देतात. हे दोन्ही इंजिन वेगवेगळ्या वेगात पाती फिरवून सेंटर ऑफ ग्राव्हीटी होणारा फरक जाणवू देत नाहीत. तसेच एखादं इंजिन निकामी झाल्यास एका इंजिन वरून पण दोन्ही रोटर फिरवण्याची क्षमता चिनुक ला एक वेगळीच क्षमता देते जी जगातल्या इतर हेलिकॉप्टर मध्ये नाही.

चिनुक सी एच ४७ हेलिकॉप्टर भारतात येण्याने भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत कमालीची वाढ झाली आहे. चिनुक हिमालय तसेच अतिपूर्वेकडील खडतर सिमावर्ती क्षेत्रात सैनिक, दारुगोळा, इंधन, इतर रसद ह्याची ने-आण करण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. ह्या मध्ये ३३ सैनिक एका वेळेस एअर लिफ्ट होऊ शकतात. तर सैनिकी जिप, १०५ मिमी. हॉवीत्झर तोफ त्याच्या सगळ्या टीम सह उचलून नेण्याची ह्या हेलिकॉप्टर ची क्षमता आहे. भारताचा हिमालयीन भाग हा हेलिकॉप्टर चालवण्याच्या दृष्ट्रीने खूप खडतर मानला जातो. अश्या भागात दोन वेगवेगळे रोटर असलेलं चिनुक भारताच्या रसद पुरवठ्यामध्ये खूप सहजता आणणार आहे. चिनुक सी एच ४७ हेलिकॉप्टर त्याच्या कामगिरीमुळे भारतीय सैन्याचा आकाशातला उजवा हात बनल्यास आश्चर्य वाटायला नको.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय