मिनिमलिस्टिक लाइफस्टाइल म्हणजे काय?

योगायोग असा ना कालच या विषयवार एक लेख वाचला आणि त्याचा आज लगेच अनुभव आला… बरेच दिवसांपासून जमलं नाही म्हणुन बायकोने घराची आवरा आवरी काढली… पूर्वी आई ची गडबड असायची आणि आता बायकोची…

काय आहे हा विषय?

आपण हौस म्हणून… किंवा पुढे कधी गरज पडेल म्हणुन अथवा अजून काही कारणाने सतत वस्तूंची खरेदी करीत असतो… यातल्या किती वस्तु आपण खरेच वापरतो?

या वस्तुंनी घरातले माळे, कपाटे खचाकच भरलेले असतात… माळे किंवा कपाटेच कशाला?

स्वयंपाक घरात किंवा कपडयांच्या कपाटात डोकवले तरी लक्षात येते.. या पैकी कीती वस्तूंचा वापर आपण खरेच करतो?

एटी-ट्वेण्टी थिअरी सगळ्या गोष्टींना लागु होत असते… म्हणजे काय तर आपल्या २० टक्के वस्तु आपण ८० टक्के वेळेस वापरतो….

दुर कशाला आपल्या कपड्यां कडे पहिले तरी या थिअरी ची कल्पना येऊ शकते… हेच स्वयंपाक घरातील भांडी असो किंवा घरातील अजून काही सामान याना लागु होते…

याचा साधा सरळ अर्थ असा वीस टक्के वस्तुं वर आपण आनंदात संसार च नाही तर आयुष्य जगु शकतो… असे असूनही उरलेल्या ८० टक्क्या करता अट्टाहास चालु असतो….

घरातील कीती तरी वस्तु वर्ष भर वापरलेल्या नसतात? वर्ष भर गरज नाही पडली म्हणजे खरे तर निरुपयोगी ना…. पण आपण ती वस्तु काढत का नाही?

आपल्या भारतीय स्वभावात एखादी गोष्ट टाकून देणे जमत नाही. मग ती गोष्ट जीर्ण, जुनी असो, बिनकामाची असो, बिघडलेली असो वा तुटकीफुटकी असो.

बहुतांश गोष्टींमध्ये आपली भावनिक गुंतवणूक झालेली असते. काही पाश्चात्त्य देशांप्रमाणे ‘यूज अँड थ्रो’ ही संकल्पना आपल्याकडे तितकीशी रुजलेली दिसून येत नाही. आमचा स्वभाव कशातही गुंतत जातो… निर्जीव वस्तु वर पण जीव लावतो… भावना असाव्यात पण त्या मुळे कीती जमवावे?

एका अभ्यासा प्रमाणे घरात माणशी जास्तीत जास्त शंभर वस्तुंची गरज असते… म्हणजे चौकोनी कुटुंबात जास्तीत जास्त चारशे?? शर्ट किँवा इतर कपडे…

जुने मोबाईल, दिवे, मुलांची खेळणी… चपला, बूट, घड्याळे, ही काही उदाहरणे… स्वयपाक घर म्हणजे या सगळ्या वर कडी असते..

चार जणांच्या घराला ताटे वाट्या किँवा चहाचे कप कीती लागावेत? इतकेच काय अनेक प्रकारची चहाची, दुधाची किँवा दह्याची भांडी असतात… चमचे, फुल पात्र, पेले तर विचारायची सोय नाही… शाकाहारी घरात फोर्क आणि नाईफ चे काय काम?

समजा असले काम तरी खरेच का आपण ब्रिटिश साहेबा सारखे काट्या चमच्याने जेवतो? तवा कढई बद्दल तर न बोललेलेच बरे… या सगळ्या खरेदीत कीती पैसा अडकवला?

इकॉनॉमिक्स च्या नियमा प्रमाणे ROI म्हणजे Return on Investment कीती आले?

आपणच आपले working capital ब्लॉक करतो हे लक्षातच येत नाही? वस्तु जमवण्याच्या मानसशास्त्रा चा एक नियम आहे… आणि तो सगळयांनाच लागु पडतो…

YOU BUY THE THINGS WHICH YOU REALLY DON’T REQUIRE, FOR THAT YOU DON’T HAVE SPARE MONEY AND YOU BUY TO SHOW THEM WHOM YOU DON’T LIKE…

एका खोली पासून संसार सुरु करून आज जर का ४-५ खोल्यांचे घर कमीच पडत असेल तर विचार नको का करायला? भावनेने गुंतत असताना अडगळ आणि वारसा याना वेगळे करायलाच हवे…

अडगळीतून बाहेर पडलो तरच वारसा जपता येईल हे लक्षात घेणे महत्वाचे… नसता आजची खरेदी उद्याची अडगळ नाही झाली तर नवल? यालाच म्हणतात मिनिमलिस्टिक लाइफस्टाइल

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय