वाळवंटी जमीन असलेलं दुबई इतकं बलाढ्य कसं बनलं?…..

मागे एका लेखात आपण इस्रायल हा देश कसा कठीण परिस्थितीतून तावून सुलाखून एक बलाढ्य देश बनला याची माहिती घेतली. आज आपण दुबई बद्दल बोलू.

युनायटेड अरब इमिरेट्स मधलं हे एक शहर. अवघ्या २० वर्षांपूर्वी केवळ वाळवंटाची भूमी असलेला हा देश एक जागतिक केंद्र कसा बनला? हा इतिहास नक्कीच रोचक असणार…

दुबई हे पूर्ण जगातले तीन नंबरचे ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे.

इंटरनॅशनल पॅसेंजरच्या ट्राफिक चा विचार केला तर दुबईचे एअरपोर्ट हे जगातले सर्वात व्यस्त (world’s busiest airport by international passenger traffic) एअरपोर्ट आहे.

२० वर्षांपूर्वी दुबईकडे आपल्या देशाचं स्वतःच म्हणावं असं अन्न, पाणी, सोनं असं काहीही नव्हतं. मग इतक्या अल्प काळात दुबईकडे इतका पैसे आला कसा!!

या प्रवासाची लक्षात घ्यावी अशी सुरुवात होते हिज हायनेस ‘शेख मोहोम्मद बिन राशिद अल् मखतुम्’ यांच्यापासून. हे दुबईचे राजा, पंतप्रधान त्यापेक्षाही दूरदृष्टी ठेवणारे नेता आहेत.

असा दूरदृष्टी असणारा नेता देशाला लाभावा हे त्या देशाचे भाग्यच…

जगात सर्वांनाच काय वाटतं, कि दुबईकडे पैसे येतो तो त्यांच्या तेलामुळे पण दुबईकडे पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसमुळे मिळणारा रिव्हेन्यू हा ५ टक्क्यांपेक्षाहि कमी आहे.

येथे राज्यकर्त्यांची दूरदृष्टी कामाला आली ती इथे. योग्य वेळ असतानाच त्यांनी आपली इकॉनॉमी पूर्णतः शिफ्ट केली.

देशाची अर्थव्यवस्था फक्त कच्च्या तेलावर अवलंबून असून भागणार नाही. त्यासाठी वेळीच अर्थव्यवस्था सगळ्या अंगांनी मजबूत केली पाहिजे हे ओळखून देशाच्या इकोनॉमीला टुरिझम बेस्ड इकॉनॉमी बनवण्यावर भर दिला. पर्यटनाला चालना देण्यासाठी इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे, हे ओळखुन त्या दिशेने काम चालू केले.

दुबई मॉल, बुर्ज खलिफा, पाम आयलंड, अंडरवॉटर ब्रिज, अंडरवॉटर टेनिस खेळण्याचे स्टेडियम, जगात बोटावर मोजण्यासारखे असलेल्या सेव्हन स्टार हॉटेल मधले एक हॉटेल ‘बुर्ज अल् अरब’ इथे दुबईत आहे. काहीतरी वैशिष्ठ्ये असलेले कित्येक स्टक्चर्स हे दुबईत आहेत.

सरकार, राजकर्ते याच्यावर देशाला घडवायची जवाबदारी असते, तसेच लोकांमध्ये शिस्त असणं, नियम पळाले जाणं, हे हि तितकंच महत्त्वाचं…

आपल्याकडे बरेचदा काही ठिकाणं असतात, जिथे एखादी जुनी कार धूळ खात पडलेली असते. पण दुबईमध्ये अशी गाडी कुठे दिसली तर तिला लगेच दंड बसतो.

गाडी धुतली आणि जमिनीला खराब करून सोडून दिले हा प्रकारही तिथे होत नाही. यासाठी लोकांनी स्वतः शिस्त पाळणं आणि शिस्त पाळली गेली नाही तर प्रशासनाकडून नियमांची अंमलबजावणी नीट होणं या गोष्टी जिथे जुळून येऊ शकतात तो देश नक्कीच अशी आश्चर्यजनक प्रगती करेल.

२३ मे २०१६ ला हिज हायनेस ‘शेख मोहोम्मद बिन राशिद अल् मखतुम्’ यांच्या हस्ते जगातल्या सर्वात आद्ययावत असलेल्या 3D प्रिन्टिंग बिल्डिंगचं उदघाटन झालं.

१५० किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणाऱ्या पॅसेंजर ड्रोन बनवण्याची तयारी सुद्धा प्रगतीपथावर आहे. कमीत कमी ह्यूमन इंटरॅक्शन असलेलं ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’ सुद्धा इथेच बनलं.

जमिनीची कमतरता असलेल्या दुबईत मानवनिर्मित आयलंड बनवले गेले. कच्च्या जमिनीत बांधकाम करणे शक्य होत नाही तर तंत्रज्ञानाच्या मदतीने तेही केले. म्हणजे कुठल्याही अशक्यप्राय गोष्टीला शक्य बनवण्यामागे हा देश लागला.

हिज हायनेस ‘शेख मोहोम्मद बिन राशिद अल् मखतुम्’ यांनी दुबई 10 X प्रोग्रॅम लॉन्च केला. देशात होणारे सर्व काही १० पटींनी वेगवान, १० पटींनी मोठे, १० पटींनी सक्षम असावे यासाठी हा अभ्यासपूर्ण प्रोग्रॅम यांनी लॉन्च केला.

बघा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, नाहीतर आपल्याकडे मतपेटी भरण्यासाठी एक पार्टी सांगते आम्ही अकाउंट मध्ये पंधरा लाख टाकू, मग त्यावर दुसरी सांगते आम्ही पंच्याहत्तर हजार टाकू, हे सगळं का होतं कारण जशी प्रजा तसा राजा.

आपण जे ऐकून खुश होऊ ते आपले राज्यकर्ते आपल्याला सांगून मोकळे होतील. अशी दूरदृष्टी असणारे राजकर्ते हेच देशाचं भविष्य घडवणार!! बरोबर ना!!

दुबई- एका स्वप्ननगरीची निर्माणगाथा हे प्रणय गुप्ते लेखीत पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय