‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ आपल्या कोणत्या गरज पूर्ण करू शकेल?

‘एक देश एक कार्ड’ या उद्देशाने ‘मेक इन इंडिया’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा भाग म्हणून बरेच वर्ष संकल्पित असलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) हे बहुउद्देशीय प्रवासी कार्ड ४ मार्च २०१९ पासून अस्तित्वात आले आहे. सध्या वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करताना त्याचा मोबदला सामान्यतः रोख रकमेने करण्यात येतो. याचे व्यवस्थापन करणे त्रासदायक व खर्चिक आहे. रोकडविरहित व्यवहार आपणास वेगवेगळ्या कार्डस् च्या माध्यमातून करावे लागत आहेत. यावर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने स्वतःची वेगळी कार्ड पेमेंट व्यवस्था चालू केली. याचे तंत्रज्ञान हे आयात केलेले असून हे कार्ड फक्त त्याच व्यवस्थेसाठी वापरता येत असे.

सन २००६ मध्ये राष्ट्रीय शहरी वाहतूक मंत्रालयाने सर्व शहरात आणि भविष्यातील स्मार्ट सिटीत कोणकोणत्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतील त्याचा उपभोग घेण्याचा मोबदला कसा देता येऊ शकेल याचे एक राष्ट्रीय धोरण जाहीर केले होते. त्यात देशभर सर्वत्र एकच कार्ड प्रवासासाठी आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व सोयी सुविधांचा वापर करण्यासाठी करता येईल का? असे सुचवून त्यातील संबंधित व्यवस्थेत महसूल वाटप प्रमाण कसे असावे? यासंबंधी विचार विनिमय करण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात केली.

त्यात सर्व सार्वजनिक वाहतूक संस्थाना प्रतिनिधित्व देण्यात आले होते. यातील विविध सार्वजनिक वाहतूक संस्थाना त्यांच्या हिश्श्यातील न्याय्य रक्कम त्वरित मिळणे आवश्यक होते. या कमिटीने केलेल्या महसूल विभागणीच्या शिफारसी विचारात घेऊन अशा प्रकारचे कार्ड निर्माण करण्याची प्राथमिक जबाबदारी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) यांच्याकडे देण्यात आली त्याची व्यवस्थित अंमलबजावणी आणि महसुलाची विभागणी करण्याचे काम नॅशनल पमेंट कॉर्पोरेशनकडे (NPCL) देण्यात आले. त्यांनी निर्माण केलेल्या रूपे (Rupay) या पूर्ण भारतीय पेमेंट गेटवेच्या माध्यमातून त्वरित पेमेंट केले जाईल. या कार्डचे व्यवस्थापन सरकारच्या निवारा आणि शहर वाहतूक व्यवस्था मंत्रालय (MoHUA) करेल.

अन्य कोणत्याही प्रीपेड, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड प्रमाणेच हे कार्ड असून त्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या बँकेच्यामार्फत हे कार्ड तिन्ही प्रकारात मिळू शकेल. सध्या स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक यासह २५ बँका, पेटीएम पेमेंट बँकेस हे कार्ड देण्याची परवानगी दिली आहे. हे कार्ड देशभरातील सर्व मेट्रो, बीआरटी, सिटी बस, रेल्वेची उपनगरी सेवा व इतर अनेक ठिकाणी वापरता येईल. देशभरातील रस्त्यावर देय असलेला पथकर (toll) यातून भरता येईल. पार्किंगचे शुल्कही यातून देता येऊ शकेल. याशिवाय दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी आणि ए. टी. एम. मधून पैसे काढण्यासाठीही ते वापरता येईल. विविध प्रकारचे मासिक पास सिझन तिकीट याद्वारे काढता येऊ शकतील. थोडक्यात हे कार्ड आपल्या देशभरातील प्रवासातील सर्व गरजा पूर्ण करू शकेल याशिवाय दुसऱ्या कार्डाची गरज पडणार नाही. या कार्डात स्वागत आणि स्वीकार या स्वयंचलित क्रिया असून ज्याद्वारे हे कार्ड मान्य होऊन त्यातील पेमेंट संबधीत संबंधितांना केले जाते.

ही संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे भारतीय बनावटीची असून कार्डात काही रक्कम वेगळी साठवलेली असते तीचा वापर ऑफलाईन पेमेंट करण्यासाठी होऊ शकतो. हे कार्ड जास्तीतजास्त ठिकाणी मान्य करण्यात आले तर बरेचसे रोख व्यवहार कमी होण्यास मदत होइल. अन्य कोणत्याही प्रीपेड, क्रेडिट आणि डेबिट कार्डाप्रमाणे हे कार्ड सुरक्षित असून यातील एखादा व्यवहार ग्राहकास मान्य नसेल तर संबंधित बँकेने तो त्यांनीच केला आहे किंवा ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे आणि यासंबधीची तक्रार निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. या कार्डाचा वापर अधिकाधिक लोकांनी करावा म्हणून यासोबत कॅशबॅक ऑफर्स आहेत.

संदर्भ: विकिपीडिया

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय