स्वप्न

मुग्ध मनाच्या नयनातील
कुणी टिपावे भाव-विभोर,
शिळ घालतो वेडा वारा
अवचित येई वळवाची सर||
गंधाळलेला वारा स्पर्शूनी जाया
रोमांच देऊनी जागवी काया,
मंतरलेल्या स्वप्नामध्ये वाट पाही रे
तुझीच व्हाया||
स्वप्नातील तो स्पर्श जादुई
होई मजला तुझाच भास,
नेई भरकट दूर मनास
तर कधी भिरभिरे तो आसपास||
भुलूनी त्या काळोखी अजुनी
अलगद करिते मीच प्रवास,
वाट पाहती तुझीच नयने
म्हणती मजला तूच हवास||
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खूप छान…👌👌