आपण जेव्हा शरीराच्या फिटनेसचा विचार करतो, तेव्हा मसल्स बनवणं, तरुणांसाठी सिक्स पॅक एब्स बनवणं हाच विचार असतो.
पण फिटनेसचा विचार करताना शारीरिक आरोग्या बरोबर मानसिक आणि आपल्या मेंदूच्या आरोग्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो.
आपला मेंदू, हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट असताना, त्याच्या सलामतीकडे लक्ष नाही दिलं तर चांगलं आरोग्य आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चांगलं आयुष्य आपण कसं मिळवू शकू??
नव्या-नव्या गोष्टी शिकण्या पासून, व्यक्तिमत्त्व विकासाकडे सुद्धा जो लक्ष देतो तो आपसूकच इतर शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतो, हे तुम्ही आजूबाजूला नजर टाकली तर सहज जाणवेल…
शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सहा टिप्स आम्ही या लेखात सांगणार आहोत, मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की, या फॉलो केल्या तर शारीरिक आरोग्याबरोबर तुमच्या मेंदूचे आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवायला तुम्हाला मदत होईल.
शारीरिक, मानसिक आणि मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सहा टिप्स
१) आपल्या आहारात भरपूर फळं आणि भाज्यांच्या समावेश करा: आपल्या मेंदूची कार्यक्षमता चांगली ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात.
भरपूर प्रमाणात फळं आणि भाज्या आहारात असतील तर अँटीऑक्सिडंट्स ची कमतरता राहत नाही.
हे अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या कार्यक्षमते बरोबरच बऱ्याचशा आजारांमध्ये सुद्धा संजीवनी ठरतात.
शिवाय आहारात मिठाचे प्रमाण जास्त नसावे याचीही काळजी घेतली पाहिजे.
एका अभ्यासानुसार आहारात जास्त मीठ असणे, हे मेंदूच्या आरोग्यासाठी घातक असते.
२) फॅट्स वाढतील असा आहार टाळावा: मेदयुक्त खाण्याने, मेंदूच्या हायपोथॅलॅमस रिजन च्या कार्यप्रणाली मध्ये बिघाड होतो.
ओबेसिटी म्हणजे अति वजन असलेल्या व्यक्तींमध्ये डिप्रेशन येण्याच्या जास्त शक्यता असतात.
शरीरात अति फॅट्स असल्यास अँटी डिप्रेसंट औषधांचा प्रभाव होणे सुद्धा कठीण जाते.
हेही एका अभ्यासातून सिद्ध झालेले आहे.
३) उत्तेजक पदार्थ किंवा हौस म्हणून केले जाणारे व्यसन टाळावे: उत्तेजक पदार्थ, दारू किंवा सिगारेट चे व्यसन हे मेंदूच्या आरोग्यासाठी घातक असते.
मद्य आणि तांबकुजन्य पदार्थ केंद्रीय मज्जासंस्थेवर म्हणजेच central nervous system वर आघात करतात. ज्यामुळे कालांतराने न्यूरॉलॉजिकल आजार होण्याची शक्यता वाढते.
४) शारीरिक दृष्ट्या क्रियाशील राहा: रोज कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम केल्याने शरीरात रक्ताभिसरण सुरळीत होते.
यामुळे मेटॅबॉलिझम संतुलित राहून ओबेसिटी चा त्रास दूर सरता येऊ शकतो.
यामुळे वृद्धावस्थेत डिमेन्शिया होण्याचा धोका सुद्धा टाळला जाऊ शकतो.
५) चिंता, ताण-तणाव यांपासून दूर राहा: लहान वयातच समरणशक्ती कमी होण्याचे कारण म्हणजे तणावपूर्ण जीवनशैली…
ताण तणाव जास्त असल्यास लक्ष केंद्रित सुद्धा कठीण होते.
याचा परिणाम शारीरिक, मानसिक आरोग्यावर म्हणजे एकूणच व्यक्तिमत्त्वावर होतो.
ताण-तणाव कमी करण्यासाठी काय करावे याबद्दल चे लेखन तुम्ही मनाचेTalks वर नियमितपणे वाचू शकाल.
https://manachetalks.com/8924/chinta-kalji-bhiti-tanav-dur-thevnyasathi-kay-krave-manachetalks/
६) मेंदूला नेहमी सक्रिय ठेवा: नेहमी नवनवीन कौशल्ये शिकत राहणे, बुद्धीला चालना देतील अशा गोष्टी करत राहणे यामुळे मेंदूच्या कार्यप्रणाली मध्ये सतत सुधारणा होत राहते, मेंदू मधील न्यूरॉन्स सक्रिय राहतात.
यासाठी ब्रेन ट्रेनिंग एक्सझरसाईझ, वेगवेगळी पझल्स सोडवत राहणे या गोष्टींची मदत घेता येते.
या सहा गोष्टी नीट लक्षात घेतल्या तर, शारीरिक आणि मानसिक तसेच मेंदू चे आरोग्य चांगले ठेऊन निरामय जीवन जगणे अजिबात अवघड जाणार नाही.
मेंदू आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा हिस्सा. बाळाच्या जन्मापासून ते पाच वर्षाचं होईपर्यंत मेंदूच्या विकासाचा जो टप्पा असतो तो खूप महत्त्वाचा असतो.
त्यासाठी या काळात लहान बाळाला बौद्धिक उत्तेजना देणं हे आई-वडिलांचं एक महत्त्वाचं टास्क असतं. यामुळे त्या बाळाच्या मेंदूचा विकास नीट होतो.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
मेंदू तल्लख आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी ६ टिप्स खुप फायद्याच्या आहेत, मला आवडल्या मनापासून धन्यवाद 🙏 आणि मनाचे talks टीम ला या उपक्रमाला खुप साऱ्या शुभेच्छा 🌹