लहानपणी, शाळेत एक इंग्रजी म्हण शिकवली जायची, ‘An apple a day keeps the doctor away.’
याचा अर्थ असा की सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी इतके फायदेशीर असते की ते रोज खाल्ल्याने कोणतेच आजार, रोग होत नाहीत.
आणि त्यामुळे दवाखान्याची पायरी चढायची वेळच येत नाही.
खरेतर सगळीच फळे, ताज्या भाज्या आरोग्यासाठी या न त्या प्रकारे चांगल्या असतात.
या ताज्या भाज्यांचे, फळांचे वेगवेगळे फायदे आम्ही नेहमीच तुम्हाला अशा लेखांतून देत असतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात योग्य ते बदल करून जास्तीतजास्त आरोग्यपूर्ण आयुष्य जगता येईल.
आजारी पडल्यावर उपचार घेण्यापेक्षा आजारी पडूच नये, यासाठी आहारात बदल, काही पदार्थांचा समावेश करणे इष्ट ठरते.
आज या लेखात आपण अशाच एका अत्यंत महत्वाच्या फळाबद्दल बोलणार आहोत.
हे फळ म्हणजे सफरचंद.
सफरचंद आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.
तब्येतीच्या अनेक तक्रारी सुद्धा नियमितपणे सफरचंद खाल्ल्याने दूर होतात.
त्यासाठी बरीच कारणे असतात. या लेखात आपण तीच बघणार आहोत.
सफरचंदात कोणती पोषकद्रवे असतात आणि आपल्या शरीराला ती कशाप्रकारे लाभदायक असतात.
१. पौष्टिक फळ
सफरचंद हे एक पौष्टिक फळ असू त्यात फायबर, व्हिटामिन आणि मिनरल्स हे जास्त प्रमाणात आढळतात.
आपल्या आहारात या तीन गोष्टी आपल्याला जास्तीतजास्त मिळतात ते ताज्या भाज्या आणि फळांमधून.
आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी योग्य प्रमाणात व्हिटामिन आणि मिनरल्स आहारातून घेणे गरजेचे असते.
याची जर आहारात कमतरता झाली तर तब्येतीच्या लहान-मोठ्या तक्रारी सतत येत असतात.
सफरचंदात antioxidants सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात.
एका मध्यम आकाराच्या सफरचंदात ९५ कॅलरी असतात.
कॅलरीजमुळे आणि जास्त फायबरमुळे एक सफरचंद पोटभरीचे होते.
सफरचंदात असणाऱ्या या पौष्टिक द्रव्यांचा शरीराला काय फायदे होतात हे आपण पुढील मुद्यात बघूच.
२. ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक
सफरचंदात फ्लावोनॉईड जास्त प्रमाणात असतात.
हे फ्लावोनॉईड ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असते.
सफरचंदात असणाऱ्या फायबरमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि ब्लड प्रेशर सुद्धा नियमित राहायला मदत होते.
कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर जास्त असेल तर ह्र्दयविकारांचा धोका वाढतो.
त्यामुळे सफरचंद खाऊन हे दोन्ही आटोक्यात राहिल्याने ह्रदयाचे एकूण आरोग्य सुधारते.
३. कॅन्सरचा धोका कमी होतो
सफरचंदात antioxidants जास्त प्रमाणात असतात. Antioxidants हे free radicals पासून आपल्या शरीरातील पेशींचे रक्षण करतात.
यामुळे शरीरातील पेशी आरोग्यपूर्ण राहतात आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
सफरचंदात जास्त प्रमाणात असणाऱ्या फ्लावोनॉईड सुद्धा शरीरात कॅन्सरच्या गाठी तयार होण्यापासून रोखते.
सफरचंद नियमितपणे खाल्ल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर, गुदद्द्वाराचा कॅन्सर या कॅन्सरच्या प्रकारांचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
४. वजन कमी करण्यास फायदेशीर
सफरचंदाम्ध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात. फायबरमुळे पोट लवकर भरते.
फायबर पचायला वेळ लागत असल्याने, आहारात जर त्यांचे प्रमाण अधिक असेल तर थोड्या थोड्या वेळाने भूक लागण्याचे प्रमाण कमी होते.
यामुळे पोट सतत भरल्याची भावना निर्माण होते आणि दोन जेवणांच्या मध्ये जे खायची सवय असते ती अपोआप बंद होते.
यामुळे दिवसभरात घेतल्या जाणाऱ्या कॅलरीचे प्रमाण कमी होते व वजन आटोक्यात राहते.
५. हाडांच्या आरोग्यासाठी लाभदायक
सफरचंद नियमितपणे खाल्ल्याने बोन-मिनरल डेन्सिटी सुधारते.
जितकी ही बोन-मिनरल डेन्सिटी जास्त तितकी हाडे जास्त मजबूत आणि आरोग्यपूर्ण.
हाडांची बोन-मिनरल डेन्सिटी कमी झाल्यास ती कमकुवत होत जातात आणि लहानशा पडण्याने किंवा धक्क्याने सुद्धा तुटू शकतात.
हाडांच्या या कमकुवत होण्याला ओस्टीओपोरॉसीस असे म्हणतात.
जसे जसे वय वाढत जाते तसा याचा धोका वाढतो.
पण सफरचंदाचा आपल्या आहारात नियमितपणे समावेश केल्याने ओस्टीओपोरॉसीस होण्याची शक्यता कमी केली जाऊ शकते.
६. मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक
सफरचंदाचे नियमितपणे सेवन हे आपल्या मेंदूचे आरोग्य सुधारते.
याचे श्रेय परत सफरचंदात जास्त प्रमाणात असणाऱ्या antioxidants ना आहे.
यामुळे free radicals चा आपल्या मेंदूच्या पेशींवर होणारा परिणाम कमी होते,
त्यावरचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतो ज्यामुळे वाढत्या वयाबरोबर सुद्धा मेंदूच्या पेशी आरोग्यपूर्ण राहतात.
यामुळे वाढत्या वयातल्या तक्रारी जसे की लक्षात कमी राहणे या येत नाहीत.
लहान मुलांना सुद्धा सफरचंद खाल्ल्याने वाढीसाठी फायदा होतो.
७. अस्थमा कमी होतो
सफरचंद नियमितपणे खाल्ले तर त्याचे लाभ आपल्या शरीरातील वेगवेगळ्या संस्थांना होत असतात.
सफरचंदाचा उपयोग अस्थमाचा त्रास कमी करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो.
८. डायबेटीस नियंत्रणात ठेवतो
फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे सफरचंदामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासाठी मदत होते.
मधुमेह असणाऱ्यांनी जर सफरचंद खाल्ले तर त्यांना साखर वाढण्याचा धोका नसतो, पण पोट भरल्याची भावना सुद्धा येते.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सफरचंदाचे फायदे वाचल्यावर तुम्हाला सुद्धा पटले असेलच ना?
की खरेच An apple a day keeps the doctor away?
सफरचंद चवीला सुद्धा चांगले लागते त्यामुळे त्याचा समावेश आपल्या रोजच्या दिवसात आपण नक्कीच करू शकतो.
सकाळी नाश्त्याच्या वेळी एखादे सफरचंद खाल्ले जाऊ शकते.
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्यामध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा इतर काही फास्ट फूड खाण्यापेक्षा सफरचंद हा एक आरोग्यपूर्ण पर्याय आहे.
जर तुम्ही ऑफिसमध्ये दुपारी सफरचंद खाण्यासाठी नेत असाल, तर त्यासाठी आमच्याकडे एक छोटी टीप सुद्धा आहे, कापलेल्या सफरचंदाच्या फोडी काळ्या पडू नयेत म्हणून त्यावर लिंबू चोळायचे!
पण सफरचंदाचे हे फायदे लक्षात घेऊन ते आपल्या आहारात घेताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे सफरचंदामध्ये फायबर खूप प्रमाणात असतात.
फायबर प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने अपचन, गॅस यासारखे त्रास होऊ शकतात. म्हणूनच आरोग्यासाठी चांगले असते म्हणून प्रमाणाबाहेर सफरचंद खाऊ नये, कारण त्याचे विपरीत परिणाम होण्याची सुद्धा शक्यता असते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.