केसांच्या समस्या जसे की केस गळती, केस लवकर पांढरे होणे यावर घरोघरी माहीत असलेला हमखास उपाय म्हणजे महाभृंगराज किंवा भृंगराज तेल. केसांशिवाय इतर आरोग्यासाठी सुद्धा त्याचे कित्येक फायदे आहेत.
आयुर्वेदात सुद्धा केसांच्या अनेक समस्यांवर महाभृंगराज तेल सुचवले जाते.
भृंगराज हे दमट वातावरणाच्या ठिकाणी वाढणारे एक झुडूप आहे.
या झाडाच्या पानांपासून हे तेल तयार केले जाते. या झुडुपाला दोन प्रकारची फुले लागतात, पांढरी आणि पिवळी.
म्हणजेच या झाडाच्या दोन जाती असतात.
या दोन्ही जातीच्या झाडांपासून जरी तेल काढणे शक्य असले सहसा पांढरी फुले येणाऱ्या जातीचे झाड हे तेल काढण्यासाठी वापरले जाते.
हे वर्षानुवर्षे वापरात असलेले भृंगराज तेल अनेक पोषक द्र्व्यांने परिपूर्ण असते.
यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशीयम ही खनिजे आणि व्हिटामिन ‘डी’ आणि ‘ई’ हे जास्त प्रमाणात असतात.
या गुणधर्मांमुळेच ते केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
यामुळे केस गळणे, केस अकाली पांढरे होणे, कोंडा या सारख्या अनेक समस्या दूर होतात.
पण या व्यतिरिक्त सुद्धा भृंगराज तेलाचे काही महत्वाचे फायदे आहेत.
हे महाभृंगराज तेल केसांच्या समस्यांवर कसे गुणकारी आहे, त्याचे इतर, तुमच्या एकूण आरोग्यासाठी फायदे काय आहेत आणि ते तयार कसे केले जाते हे सगळे या लेखात तुम्हाला वाचायला मिळणार आहे.
१. केसांची वाढ चांगली होते
महाभृंगराज तेलाचा डोक्याला मसाज केल्याने हेयर फॉलीकल्सना होणाऱ्या रक्त पुरवठ्यात वाढ होते.
यामुळे केसांची वाढ लवकर होते.
तुमच्या केसांना जर वाढ कमी असेल आणि लांबसडक केस हवे असतील तर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा या तेलाने डोक्याला हलक्या हाताने मसाज करावा.
असे नियमितपणे केल्याने केसांची वाढ नक्कीच सुधारेल.
२. केस गळती थांबते
केसांची गळती होण्यामागे अनेक कारणे आहेत वातावरण, पाणी, फॅमिली हिस्ट्री.
पण याचबरोबर सगळ्यात मोठे कारण म्हणजे स्ट्रेस.
भृंगराज तेलाच्या नियमित वापराने डोके शांत राहायला मदत होते. यामुळे मनावरचा ताण सुद्धा कमी व्हायला मदत होते.
जर तुमच्या केस गळतीचे कारण स्ट्रेस असेल तर भृंगराज तेलाच्या नियमित मसाजचा फायदा होईल.
महाभृंगराज तेलामध्ये जास्त प्रमाणात असणाऱ्या व्हिटामिन ‘डी’ आणि ‘ई’ यामुळे सुद्धा केसांचे आरोग्य सुधारते.
यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि त्यांचे गळणे, तुटणे कमी होते.
३. कोंडा कमी होतो
केसात होणारा कोंडा हे एकप्रकारचे फंगल इन्फेक्शन आहे.
महाभृंगराज तेलामुळे फंगसची वाढ थांबण्यासाठी फायदा होतो.
कोरड्या स्काल्पचा त्रास असेल तर कोंडा व्हायचे प्रमाण वाढते.
भृंगराज तेलामुळे डोक्याच्या त्वचेला म्हणजेच स्काल्पला गरजेचे असलेले पोषण मिळते.
यामुळे कोंडा नाहीसा व्हायला मदत होते.
केसात जर कोंडा असेल तर त्याचबरोबर होणारा अजून एक त्रास म्हणजे डोक्याला जास्त प्रमाणात खाज येणे.
भृंगराज तेलाच्या नियमित वापराने ही तक्रार सुद्धा नाहीशी होते.
४. अकाली केस पांढरे होत नाहीत
भृंगराज तेलामध्ये असणाऱ्या हरीतकी आणि जटमंसी या दोन घटकांमुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहयला मदत होते.
अकाली केस पांढरे होत नाहीत. जर तुमच्या बाबतीत केस लवकर पांढरे होण्याची फॅमिली हिस्ट्री असेल तर भृंगराज तेलाच्या नियमित वापराने फायदा होतो.
यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केसांना भृंगराज तेल लावले पाहिजे.
५. स्काल्पचे संरक्षण
बाहेरची हवा, धूळ, प्रदूषण हे सगळे स्काल्पला चिकटून राहून त्यातून बरीच इन्फेक्शन्स उत्भवण्याची शक्यता असते.
यामुळे मग केसात कोंडा होणे, डोक्याला खाज येणे यासारखे त्रास होऊ शकतात.
भृंगराज तेलामध्ये ऍन्टी बॅक्टेरीयल गुणधर्म असतात.
यामुळे या तेलाच्या नियमित वापराने स्काल्पचे आरोग्य सुधारते व इन्फेक्शनपासून सुरक्षा मिळते.
६. केसांना पोषण मिळते
केसांच्या आरोग्यासाठी व्हिटामिन ‘ई’ अत्यंत महत्वाचे असते.
यामुळे केसांच्या सगळ्या समस्या दूर होऊन केस निरोगी आणि आरोग्यपूर्ण व्हायला मदत होते.
महाभृंगराज तेलामध्ये व्हिटामिन ‘ई’ जास्त प्रमाणात आढळते.
यामुळे केसांना योग्य ते पोषण मिळते. भृंगराज तेलाचा नियमित वापर केल्याने केस मजबूत होतात आणि त्याचबरोबर त्यांना नैसर्गिक शाईन सुद्धा येते.
७. लिव्हरसाठी चांगले
लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे केसांच्या आरोग्याइतकेच या भृंगराज तेलाचे इतरही काही फायदे आहेत.
या झाडाच्या पाल्याचा रस हा लिव्हरच्या (यकृत) आरोग्यासाठी चांगला असो.
या रसाच्या सेवनाने डीटाॅक्झिफीकेशन व्हायला मदत होते.
८. त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले
त्वचेच्या विविध तक्रारींवर भृंगराज तेल गुणकारी आहे.
याच्या नियमित वापराने त्वचा टवटवीत दिसायला मदत होते व त्वचेवर आलेल्या सुरकुत्या, फाईन लाईन्स कमी व्हायला मदत होते.
९. डोकेदुखीपासून आराम मिळतो
भृंगराज तेल डोके शांत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी व्हायला मदत होते.
जर डोकेदुखी ही ताण-तणाव (स्ट्रेस) यामुळे असेल तर या तेलाच्या विशेष फायदा होतो.
डोके दुखत असताना ज भृंगराज तेलाने मसाज केला तर डोक्याला थंड लागून शांत वाटते व डोकेदुखी सुद्धा कमी होते.
डोकेदुखीवर उपाय म्हणून भृंगराज तेलाचे दोन थेंब नाकात सुद्धा घातले जातात.
१०. डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले
भृंगराज तेलामध्ये असणाऱ्या व्हिटामिन ‘ई’ मुळे त्याचा डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदा होतो.
यामुळे डोळे आरोग्यपूर्ण व्हायला मदत होते आणि डोळ्यांच्या संबंधी किरकोळ तक्रारी दूर होतात.
११. शांत झोप लागण्यास उपयुक्त
भृंगराज तेलाच्या मालीशाने डोक्यावरचा ताण कमी होऊन डोके शांत व्हायला मदत होते.
यामुळे चिडचिड, स्ट्रेस कमी होते. याचा परिणाम अर्थातच झोपेवर होतो.
भृंगराज तेल झोपण्यापूर्वी डोक्याला लावल्यास डोके शांत होऊन गाढ झोप लागण्यासाठी मदत होते.
तुम्हाला जर लवकर झोप लागत नसेल किंवा काही कारणाने मध्ये अधे जाग येऊन झोप अपूर्ण राहत असेल तर भृंगराज तेलाचा निश्चितच फायदा होईल.
१२. स्मरणशक्ती वाढवते
भृंगराज तेलाचा जर अश्वगंधा सोबत वापर केला तर त्याचा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो.
वाढत्या वयातील मुलांसाठी याचा फायदा होतोच पण त्याचबरोबर वृद्धांसाठी सुद्धा याचा उपयोग आहे.
मित्रमैत्रिणींनो, हे बहुगुणी महाभृंगराज तेल तुम्ही बाजारातू तयार विकत आणू शकता पण जर तुम्हाला हे तेल घरी करायचे असेल तर त्याची सुद्धा कृती सोपी आहे.
तुम्हाला यासाठी फक्त भृंगराज रोपाची पाने लागतील.
महाभृंगराज तेल घरच्याघरी करण्यासाठी भृंगराजची पाने उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यावीत.
त्यानंतर हि सुकलेली पाये खोबरेल किंवा तिळाच्या तेलात घालून तेलाची बरणी परत उन्हात साधारण ३ दिवसांसाठी ठेवावी.
३ दिवसांनी तेलाचा रंग बदलून तेल हिरवे दिसायला लागले की भृंगराज पानांना अर्क त्यात उतरला असे समजावे आणि हे तेल वापरण्यासाठी घ्यावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.